Trending

सहाशे वर्षांपासून सुरू आहे 🕓 घड्याळ

सहाशे वर्षांपासून सुरू आहे  🕓 घड्याळ 


दि. ६ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3rSOx6m
प्राग : झेक प्रजासत्ताकची राजधानी प्रागच्या जुन्या वसाहतींमध्ये एक अत्यंत जुनाट असे घड्याळ आहे. त्या घड्याळाकडे एक नजर गेली की ती तिथेच खिळून राहील इतके ते आकर्षक आहे. हे एक खगोलीय घड्याळ असून ते ओल्ड टाऊन हॉलच्या दक्षिणेकडील भिंतीवरलावलेले आहे. ते गेल्या 607 वर्षांपासून सुरूच आहे हे विशेष!🕓
   
🕓हे घड्याळ सन 1410 मध्ये लावण्यात आले होते. ते जगातील तिसरे सर्वात जुने खगोलीय घड्याळ आहे, जे आजही सुरू आहे. ते जितके आकर्षक आहे तितकाच त्याचा इतिहासही मोठा आहे. या घड्याळात एक अॅस्ट्रॉनॉमिकल डायल, तीन काटे, एक सोलर प्लेट, फिरणारी एक राशी प्लेट आणि अनेक चित्रे आहेत. 

सहाशे वर्षांपासून सुरू आहे  🕓 घड्याळ

या घड्याळाबाबत काही दंतकथाही जुळलेल्या आहेत. असे म्हटले जाते की सन 1410 मध्ये मास्टर हानूस याने या घड्याळाची निर्मिती केली. ते पाहून प्रागचे लोकप्रतिनिधी प्रभावित झाले. आपल्याच शहरात असे एकमेवाद्वितीय घड्याळ असावे असे त्यांना वाटले. दुसर्या शहरातही असे घड्याळ निर्माण होईल, अशी भीती त्यांना वाटू लागली आणि त्यामुळे त्यांनी एका रात्री मास्टर हानुसला आंधळे केले. याघड्याळातील अॅस्ट्रॉनॉमिकल डायल दिवसाचा काळ आणि आकाशातील सूर्य-चंद्रांच्या स्थितीचे प्रतीक आहे. त्याच्या केंद्रातील गडद निळे ठिकाण पृथ्वीचे प्रतीक आहे. वरील निळा भाग आकाशाचे प्रतिनिधित्व करते.🕓

____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🕓 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ™
______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম