वाजपेयींचे अजरामर भाषण- ‘मृत्यू से डर नही लगता, बदनामी से डर लगता है’

वाजपेयींचे अजरामर भाषण- ‘मृत्यू से डर नही लगता, बदनामी से डर लगता है’     

    माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे संसदेतील भाषण केवळ विरोधकांसाठीच नव्हे तर सभागृहातील सर्व सदस्यांसाठी एक मोठी पर्वणीच असायची. वाजपेयींनी संसदेत अनेक भाषणे केली आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘मृत्यू से डर नही लगता, बदनामी से डर लगता है’ हे होय.  
देशात १९९६च्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिराच्या मुद्दयावर भाजपने सर्वाधिक १६१ जागा जिंकल्या होत्या. परंपरेने भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,  तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी वाजपेयी यांचा दावा मान्य करत त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देखील दिले. वाजपेयींना याची कल्पना होती की बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ उभा करणे वाटते तितके सोप नाही. तरी शपथविधी झाल्यानंतर अन्य पक्ष त्यांना पाठिंबा देतील असा विश्वास त्यांना होता आणि त्या विश्वासापोटीच केंद्रात पहिले भाजप सरकार स्थापन करण्याचे वाजपेयींचे स्वप्न होते.
राष्ट्रपतींनी वाजयेपींना पंतप्रधानपदाची शपथ दिल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली होती. वाजपेयींनी अकाली दल, शिवसेना यांच्यासारख्या पक्षांना एकत्र आणले पण बहुमताचे संख्याबळ त्यांना जमवता आल नाही. अशा परिस्थितीत वाजपेयींनी एक दिवस आधीच म्हणजे शपथ घेतल्याच्या 13व्या दिवशीच राजीनामा दिला. वाजपेयींनी काहीही झाले तरी सरकार स्थापन करू हा मार्ग न स्विकारता ते स्वत:च्या मुल्यांवर ठाम राहिले. भारताच्या राजकीय इतिहासात 13 दिवसांचे सरकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो तो या वाजपेयींच्या या निर्णयामुळेच. वाजपेयी भलेही सरकार वाचवू शकले नाहीत पण चुकीच्या मार्गाने सरकार वाचवण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल संपूर्ण देशांना त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने केलेल्या लाचखोरीचे प्रकरण संपूर्ण देशाने पाहिले होते. वाजपेयींना तेव्हा फोडाफोडीच्या राजकारणाचा अथवा अनैतिक मार्गाचा वापर करता आला असता. पण वाजपेयींनी स्वत:ची मुल्ये सोडली नाहीत.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव तर्फे अटलजीना भावपुर्ण श्रध्दांजली
सोबत -youtube वर video  पहा.
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛
Video लिंक-https://youtu.be/_1n_OIp3EOs


वाजपेयींचे अजरामर भाषण- ‘मृत्यू से डर नही लगता, बदनामी से डर लगता है’

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম