Trending

पेडका किल्ला

 पेडका किल्ला 


दि १६ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक 
अौरंगाबाद जवळ हा किल्ला असुन  ठराविक पर्यटक व शिवप्रेमीनाच हा किल्ला माहिती आहे.अजिंठा-सातमाळा डोंगररांगांमधील ह्या किल्ल्यांची निर्मिती मुख्यत्वे टेहळणीसाठी झाल्याचे दिसते.हा किल्ला दुर्लक्षित असला तरी स्वराज्यात या किल्याला महत्त्व होते.कन्नड तालुक्यात गौताळा अभयारण्याच्या दक्षिण सीमेवर वसलेला हा डोंगरी किल्ला.कन्नड ह्या तालुका ठिकाणाहून आतमध्ये जेऊरकडे जाणाऱ्या मार्गावर पेडकावाडी गावातून एक रस्ता पेडकावाडी धरणाकडे जातो. ह्या धरणाच्या पश्चिमेकडे चालत राहिले की किल्ल्याच्या दक्षिणेकडील दोन सोंडांच्या मधल्या घळीतून पाउलवाट वर किल्ल्याकडे आपल्याला नेते. छोट्याशा चढाईनंतर एक पठार लागते. तीन वेगवेगळ्या उंचीवर तयार झालेल्या पठारांमुळे किल्ल्याची विभागणीही तीन भागात झाली आहे. ह्या पठारावरून अजून घळीतून पुढे चालत गेल्यावर डोंगराच्या एका सोंडेवर काही दगडी पायऱ्या चढत गेल्यावर उन्हा-पावसाला तोंड देत उभे असलेले पडके पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार लागते.

पेडका किल्ला
प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या असलेल्या छोट्या पठारावर दोन पाण्याची टाकी, म्हसोबाची घुमटी आणि काही चौथरे सोडून इतर काहीच अवशेष आज शिल्लक नाहीत. तिथून चढून वरच्या भागात एक बांधीव तळे आणि त्याच्या काठावर २-३ मोठ्या गुहा लागतात. म्हसोबाच्या देवळीच्या बाजूने किल्ल्याच्या दुसर्‍या टप्प्यावर चढून गेल्यावर आपल्याला खालच्या बाजूला मोठ तळ व त्यामागिल ३ गुहा दिसतात. या गुहा २ खांबांवर तोललेल्या आहेत. गुहा प्रशस्त असून साफसफाई न केल्याने त्या रहाण्या योग्य नाहीत. या परीसरात २-३ ठिकाणी शेंदुर फासलेले दगड असून त्याच्या जवळ त्रिशुळ उभे करून ठेवलेले आढळतात.चौथी गुहा असावी पण तिचे फक्त अस्तित्व जाणवते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,ह्याच भागात बुरुज व त्याजवळ काही चौथऱ्यांचे अवशेष आणि पीराचे ठाणे दिसते. जंजाळा आणि वेताळवाडी किल्ल्यांसारखाच तळे आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवली गेलेली आहे.  ह्या भागात अजून २-३ पाण्याचे साठे सोडले तर अक्षरशः काहीही पुरावशेष आज शिल्लक नाहीत.देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे त्याकाळात राजधानीकडे येणार्‍या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली होती. यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्व कमी झाले. त्यामुळे टेहळणीसाठी बनवलेल्या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले व आडमार्गावर असल्यामुळे यातील काही किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले.हे दुर्दैव या किल्याच्या नशिबी आल्याने हा किल्ला दुर्लक्षित राहिला आहे

_____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_____________________________
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম