सर्वात महाग कॉफी चक्क प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवली जाते !

सर्वात महाग  कॉफी चक्क प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवली जाते ! 

फेसबुक लिंक http://bit.ly/2OQTQpk
जगात चहा बरोबर कॉफीचेही शौकीन भरपूर आहेत.चहाच्या खालोखाल कॉफीला पंसती दिली जाते. कॉफी पिणारा एक विशिष्ट वर्ग आहे.त्यांना चहापेक्षा काॅफी आवडते.कॉफी पिऊन आपल्याला ताजेतवाने वाटते. ज्या कॉफींची गुणवत्ता जेवढी जास्त, तेवढीच या कॉफींची किंमत जास्त असते. पण तुम्हाला हे माहीत आहे का ? जगातील सर्वात महागडी कॉफी ही प्राण्यांच्या लीदपासून म्हणजेच विष्ठेपासून बनलेली असते. इंडोनेशियाची कॉफी लुवाक किंवा चिविट कॉफी ही सर्वात महागडी कॉफी मानली जाते. या प्रकारची एक कप कॉफी जवळपास १०० डॉलरपर्यंत असू शकते. चला तर मग जाणून घेऊया, या जगातील सर्वात महागड्या कॉफीबद्दल काही विशेष माहिती..            
कोपी लुवाक
जगातील सर्वात महागड्या कॉफींमधील एक ‘कोपी लुवाक’ ही आहे. ही कॉफी पिण्यासाठी खूपच मस्त लागते. पण या कॉफीला बनवण्याची प्रक्रिया खूपच चकित करणारी आहे. कॉफी कोपी लुवाक जिची चव घेण्यासाठी लोक जगभरातून इंडोनेशियामध्ये येतात. लोकांच्या म्हणण्यानुसार, या कॉफीची जो एकदा चव घेईल, त्यानंतर त्याला दुसरी कोणतीही कॉफी आवडणार नाही. इंडोनेशियामधील पाम सिवेट नावाच्या एका मांजरीच्या प्रजातीच्या मदतीने ही जगातील सर्वात महागड्या कॉफींपैकी एक कॉफी तयार केली जाते. हा प्राणी बेरी खातो, पण बेरीच्या बिया पचवू शकत नाही आणि या बियांना आपल्या विष्ठेद्वारे बाहेर फेकून देतो. याच बियांना सुकवून ‘कोपी लुवाक’ नावाची ही महागडी कॉफी तयार केली जाते. ही कॉफी खूप दुर्मिळ असते, त्यामुळे या कॉफीची किंमत खूप जास्त असते. या कॉफीची किंमत जवळपास ९०० अमेरिकन डॉलर प्रतिकिलो म्हणजेच जवळपास ४७,००० रुपये प्रतिकिलो एवढी किंमत आहे.

सर्वात महाग  कॉफी चक्क प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवल्या जाते !

पाम सिवेट’ हा प्राणी कोपी लुवाकला मिळणाऱ्या मोठ्या किंमतीमुळे इंडोनेशियामध्ये पाळला देखील जातो. पाम सिवेटला पिंजऱ्यामध्ये ठेऊन खूप कॉफी बीन्स खायला दिल्या जातात. पोट भरून खाणे खाल्ल्यानंतर काही तासांनी पाम सिमेट आपली विष्ठा बाहेर टाकून देतो. त्यानंतर त्याला पाळणारे शेतकरी पाम सिवेटच्या विष्ठेला जमा करतात.
यानंतर या विष्ठेमध्ये असलेले कॉफीचे बीज वेगळे केले जातात. या विष्ठेमधून वेगळी करण्यात आलेली कॉफी बीन्सला भाजले जाते. भाजल्यानंतर ही कॉफी आकर्षक पॅकेटद्वारा बाजारामध्ये आणली जाते, युरोप आणिअमेरिकेच्या बाजारामध्ये जाईपर्यंत ही कॉफी खूप महाग होते.अशाप्रकारे प्राण्यांच्या विष्ठेमधील पदार्थांपासून जागातील या सर्वात महागड्या कॉफी बनवल्या जातात. या कॉफींची मागणी देखील बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे त्यांची किंमत अजूनच वाढते.

ब्लॅक आयव्हरी ब्लँड कॉफी

त्तर थायलंडमध्ये बनवण्यात येणारी ब्लॅक आयव्हरी ब्लँड कॉफी हत्तीच्या विष्ठेमध्ये असलेल्याबियांपासून बनवली जाते. ही कॉफी जगातील सर्वात महागड्या कॉफी ब्रॅन्डस् मधीलच एक आहे. याच्या एक किलो कॉफीची किंमत ११०० डॉलर म्हणजेच ६७१०० रुपये आहे. या कॉफीला बनवण्यासाठी हत्तींना कॉफीचे बीज खाण्यास दिले जातात. हत्ती हे कच्चे लेगम्स म्हणजेच शेंगा खातात आणि त्याला पचवतात आणि लीद म्हणजेच विष्ठा बाहेर फेकतात. त्यानंतर त्याच विष्ठेमधून कॉफीचे बीज काढले जाते.एक किलो कॉफी मिळवण्यासाठी एका हत्तीला जवळपास ३३ किलो कॉफीचे कच्ची फळे खायला दिले जातात. हत्तीच्या विष्ठेमधून बीज काढण्याचे काम हत्तींचे प्रशिक्षित ट्रेनर करतात. हे बीज काढल्यानंतर त्यांना उन्हामध्ये सुकवले जाते. याप्रकारे जगातील सर्वात महागडी कॉफी ब्लॅक आयव्हरी ब्लँड ही तयार करण्यात येते.याची खास गोष्ट ही आहे की, या कॉफीमध्ये कडूपणा जराही नसतो. पचनक्रियेच्या दरम्यान हत्तीचे एन्जाइम कॉफीच्या प्रोटीनला तोडून टाकते. प्रोटीन तुटल्याबरोबरच कॉफीचा कडूपणा जवळपास संपतोच आणि याप्रकारे जगातील सर्वात महागडी कॉफीमध्ये गणली जाणारी ही एक कॉफी तयार केली जाते.

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ➰
______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম