जेव्हा निघते बुलेटची स्वारी,वाट देते दुनिया सारी

 

जेव्हा निघते बुलेटची स्वारी,वाट देते दुनिया सारी

बुलेटची शान आणि बुलेट असणाऱ्यांचा एक वेगळाच मान असतो. त्यामुळे या बुलेटला मोठी मागणी असल्याचं पहायला मिळतं.

जेव्हा निघते बुलेटची स्वारी,वाट देते दुनिया सारी

ती जर नाही मिळाली तर मोटरसायकल प्रेमी एक आस कायम बाळगून असतो.ती म्हणजे एकदा तरी बुलेट फिरवायची.मग काय बुलेट असणाऱ्याकडे वशिला लावुन बुलेट घेऊन एक फेरी मारायची.तिच्याबरोबर फोटो काढून घ्यायचे हा उद्योग अजुनही काहीजण करताना दिसतील.

बुलेटचा रूबाबच न्यारा

कारण बुलेट चालवायचा एक वेगळाच रूबाब आहे.बुलेट एक शानकी सवारी म्हणून तरुण वर्गात कमालीची  आवडती  मोटार सायकल आहे.

वजनदार भरभक्कम दणकट मोटरसायकल म्हणजे "बुलेट".हिचा आवाजच तिचा वेगळेपणा दाखवुन देतो.आजही रस्त्यावरून "धाकधाक" आवाज करत बुलेट निघालेली दिसली की,आपसुक सगळयांच्या नजरा तिच्याकडे वळतात.

चाळीस वर्षापूर्वी देखील या बाईकची लोकप्रियता काही कमी नव्हती. या बाईकची प्रिंट मीडियातील जाहिरात वाचली तर याची कल्पना नक्की येईल."जेव्हा निघते बुलेटची स्वारी,वाट देते दुनिया सारी" अशी केली जात असे. पुरुषांची आवडती बाईक असे या बाईकचे वर्णन केले होते.

बुलेट पूर्वी मोजक्याच घरी दिसायची.(आत्ताही ठरविक घरीच बुलेट आहे.) गावातल्या प्रतिष्ठीत घराणी म्हणजे पाटील देशमुखांकडे तसेच पोलिस स्टेशनमधल्या पिळदार मिशीतल्या बलदंड ठाणेदाराकडे 'वजनदार' बुलेट असायची. 'फोर स्ट्रोक'आवाज ऐकून कुणावरही 'इम्प्रेशन' पडत होते.त्याकाळी आत्ताएवढा इतर मोटारांच्या आवाजाचा गोंगाट नसल्याने दुरवरूनही बुलेटचा आवाज आोळखु येई.पूर्वीही भारतीयांनी या बाईकला खूपच चांगला प्रतिसाद दिला होता. आताही देताच यात वादच नाही.

बुलेटची क्षमता

बुलेटला ३५० सीसीचे भलेमोठे इंजिन असते.या गाडीची लांबी रुंदी इतर मोटरसायकलच्या तुलनेत जास्त असते.भलीमोठी पेट्रोल टाकी असते.पुर्वी ही मोटरसायकल कीकस्टार्ट प्रकारात येत होती.पण चालू मोटरसायकली बटणस्टार्ट प्रकारात येतात.या गाडीला किक मारताना हलक्या पायाने मारून चालत नाही.नाहीतर बॅक आलीच म्हणुन समजा. Royal Enfield हि जगातील पहिली कंपनी आहे जिने ४ स्ट्रोक इंजिनचा वापर मोटरसायकल करिता सुरु केला. १९९० साली Enfield India ने डीझलपासून चालणारे मोटरसायकल इंजिनची निर्मित केली ज्याचे नाव Taurus हे होते. परंतु या मोटरसायकलला बाजारात जास्त यश मिळाले नाही. त्यामुळे २००२पासून डिझेल इंजिन मोटरसायकल निर्मिती बुलेटने बंद केली.भारतामध्ये टूव्हीलर मध्ये रेअर डिस्क ब्रेकचा पहिला प्रयोग करणारी कंपनी Royal Enfield आहे. १९६५ मध्ये भारत सरकारने आपल्या देशातील पोलीस आणि सैन्यास चांगल्या मोटरसायकल देण्याचा विचार सुरु केला. त्याकरिता सगळ्यात चांगली गाडी म्हणून बुलेटची निवड झाली. Royal Enfieldचा वापर आजही भारतीय सैन्याकरिता केल्या जातो. बुलेटला एक प्रकारचा दमदार असा आवाज असतो.हिच बुलेटची खरी आोळख आहे.या गाडीचा पिस्टन over square असतो. त्यामुळे या गाडीच्या पिस्टन चा स्ट्रोक जास्त असतो आणि बोर कमी असतो.एका सिलिंडर प्रमाणे. स्ट्रोक जास्त असल्यामुळे पिस्टन ला सिलिंडर हेड मध्ये १ राऊंड पूर्ण करण्या साठी जास्त वेळ लागतो,यामुळे बुलेट चा आवाज इतर गाड्यांच्या तुलनेत जास्त मोठ्याने येतो.या गाडीच्या मागे सायलेन्सर पासुन तुम्ही २ फुटावर जर उभे असाल तर हिचा स्ट्रोक तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही.

अशा या बुलेटचे खरे पाळण्यातले नाव म्हणाल तर "रॉयल एनफिल्ड" असे आहे. Royal Enfield चा लोगो तोफ होता आणि त्यांची टॅगलाईन होती तोफी सारखी दिसणारी व बंदुकीच्या गोळी सारखी चालणारी. Made like a gun goes like a bullet.हिला बंदुकीच्या गोळीची उपमा दिल्याने "बुलेट" हे नामकरण झाले.

अशा या कंपनीची सुरुवात म्हणावी तर रॉयल एनफिल्ड ही कंपनी ब्रिटिश कंपनी आहे.हिची स्थापना १९०१ साली ग्रेट ब्रिटनमधील रेडीच या ठिकाणी Albert Eadie आणि Robert Walker Smith यांनी केली होती. या पूर्वी एनफिल्ड या नावाने ते १८५१ पासून शिवणकाम करायची मशीन, सुई, सायकलचे सुटेभाग आणि ब्रिटिश सैन्यासाठी शस्त्रे बनवत होते.त्याला प्रचंड मागणी पण होती.पण काही कारणाने पहिल्या महायुद्धाच्या काळात Albert  Eadie यांनी स्वतःचे सगळे अधिकार १९०७ साली BSA या कंपनीस विकले.मग BSA या कंपनीने महायुद्धात सैन्यासाठी दणकट अशा बुलेट बनवून दिल्या.

जेव्हा निघते बुलेटची स्वारी,वाट देते दुनिया सारी

पुढे १९४१ ते १९४५ या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एनफिल्ड मोटर मनुफॅक्चर या कंपनीने पुन्हा रॉयल एनफिल्ड या मोटरसायकल कंपनीला ताब्यात घेतले.१९५५ साली मद्रास मोटर कंपनी सोबत करार करून पहिला "एनफिल्ड इंडिया लिमिटेड" या नवीन कंपनीचा कारखाना भारतात मद्रास येथे उघडला. त्यानंतर भारतात त्याचा प्रवास सुरू झाला.१९७१ साली मुख्य कंपनी रॉयल एनफिल्ड बंद करण्यात आली. तरी भारतातील "एनफिल्ड इंडिया लिमिटेड"चा प्रवास सुरूच होता. १९९४ साली एनफिल्ड इंडिया लिमिटेड या कंपनीला भारतीय कंपनी एशर मोटर लिमिटेड या कंपनीने खरेदी केली.१९९९ साली रॉयल हे नाव लावण्यास कंपनीला परमिशन मिळाली आणि सध्या भारतातच नव्हे तर इतर बरेच देशात या कंपनीचा प्रवास चालू आहे.

या मोटरसायकलला ३५० सीसीचे इंजिन असल्याने साहजिकच मायलेज कमी म्हणजे १ लिटरला ३५ ते ४० किमी एवढे आहे.(जुनी मॉडेल तर फक्त २५) यामुळे पण सामान्य माणूस हा पांढरा हत्ती घेताना दहावेळा विचार करतो.म्हणुन याबाबतीत ही मोटरसायकल काहीशी मागे पडते. तरीही आज या बुलेट मोटरसायकलची क्रेझ टिकून आहे.

- अनिल पाटील,पेठवडगाव

9890875498


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম