नावाचा महिमा

नावाचा महिमा

 हल्ली मुला-मुलींची कोणतीही आणि कशीही नावे ठेवली जाऊ लागली आहेत. वास्तविक प्रत्येक नावाला विशिष्ट अर्थ असतो. त्यामुळे मुला-मुलींची नावे साजेशी, अर्थपूर्ण असायला हवीत. त्याचा विचार करता काही नावे अनर्थकारक तर काही अर्थहीन असल्याचे दिसून येते.
नावाचा महिमा
काही स्त्रियांची नावे पुल्लींगी तर काही पुरुषांची नावे स्त्रीलिंगी असेही प्रकार दिसतात. नावांच्या अर्थाविषयी पुरेशी माहिती नसल्यानेच हे घडते. उदाहरणादाखल काही नावे आणि त्यांचे अर्थ देत आहोत.
 
नाव अर्थ
वृषाली   चांडाळीण
अमिषा   मांसाचा तुकडा,
आश्लेषा   अलिंगन देणारी
श्लेष्मा   शेंबूड
अंकिता                            कोणाच्या तरी ताब्यात असणारी, पारतंत्र
निषाद  पारधी
श्वेताी   पांढरी, कोडभरलेली
चारुशिला सुंदर दगड
सुशीला     चांगला दगड
मिथुन     जोडपे,मैथुन
अनिता     अनित म्हणजे रहित
प्रियंका                                अंक म्हणजे मांडी.जिची मांडी सर्वांना         प्रिय आहे अशी
सुचिता
     
चांगली चिता

काही नावे अर्थहीन असतात. ती असलेल्यांना अर्थ विचारला तर ते कानावर हात ठेवतात. अशी काही नावे विचारात घेऊ. अनुष्का, नीना, निकिता (हे रशियन भाषेतील पुल्लिंगी नाव आहे, मराठीत हे स्त्रीचे नाव आहे). लैलेश, सुष्मिता (सुस्मिता हवे), तनिष्का, अनुभा, सुहेल, सानिका, कतरिना, साईना.

 मुलीचे नाव ठेवताना निदान ते स्त्रीलिंगी असावे एवढे तरी भान ठेवायला हवे. पण मुलीचे नाव पुल्लिंगी आहे हे अनेकांना कळत नाही. सामान्यपणे स्त्रीचे नाव उकारान्त असते. पण तसे असू नये असा संकेत आहे. त्यानुसार नावे कशी असावीत याची काही उदाहरणे.मुलांमध्ये लहानपणी चिंटय़ा, पिंटय़ा, गोटय़ा, बाळ्या, किंच्या, गटय़ा ही नावे ठीक असतात. पण ती मोठी झाली, शिकली. इंजिनिअर, डॉक्टर, मोठे अधिकारी, प्राध्यापक झाली तरी त्या नावाने कसे हाक मारणार? म्हणून मुला-मुलींची नावे अर्थपूर्ण ठेवावीत.

उदा. काळ्या मुलीचे नाव गौरी, तिरळ्या मुलीचे नाव सुनेत्रा, बटबटीत डोळ्याच्या माणसाचे नाव कमलनयन, जाडजुड बाईचे नाव पुष्पलता या नावाची आणि व्यक्तीची सुसंगती लागत नाही. काही नावे लहानपणी ठीक असतात. उदा. बेबी म्हणजे लहान मूल. पण ती मोठी झाली, तिला मुले झाली तरीही बेबीताई, बेबीआत्या, बेबीमावशी इतकेच काय बेबीआजी म्हटले जाते तेव्हा कपाळावर हात मारून घ्यावा असे वाटते.

साहित्य, दूरदर्शन मालिका, चित्रपट यातून सध्या चुकीची, अशुद्ध, निरर्थक नावे रुढ होत आहेत आहेत. ज्योति हे मुलीचे नाव म्हणून इतके रुढ झाले आहे की ते पुल्लिंगी असून त्याचा अर्थ सुर्य असा आहे हे सांगूनही खरे वाटणार नाही. हेमामालिनी हे नटीचे इतके प्रसिद्ध झाले आहे पण ते अशुद्ध आहे. खरे तर ते हेममालिनी असे पाहिजे. कारण ते श्रीसूक्तातील आहे. तसेच जयाप्रदा हे नाव चुकीचे असून ते जयप्रदा हवे.

मृणालऐवजी  मृणालिनी नाव हवे. याच पध्दतीने स्नेहलचे स्नेहला, मृदुलचे मृदुला, रेणुऐवजी रेणुका, रुपलऐवजी रुपाली, सुहासऐवजी सुहासिनी, प्रीतमऐवजी प्रितिमा, वेदान्तीऐवजी वेदवती असा नावात बदल व्हायला हवा. याशिवाय नावे शुध्द  स्वरूपात लिहिली जातील याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

बाबु, गजरा, सारंगी, सारंग, शिल्पा, जेमित, रेनेसा अशी अनेक अर्थहीन आणि तुच्छतादर्शक नावे सांगता येतील.

अशुद्ध नावे     शुद्ध नावे

सुनिता        सुनीता

दिपक        दीपक

सुशिला        सुशीला

चारुशिला        चारुशीला

नितीश        नीतिश

शरश्चंद्र        शरच्चंद्र

घनःश्याम        घनश्याम

मेघःश्याम        मेघश्याम

नेहा         स्नेहा

हरिष        हरीश

प्रितीश        प्रीतीश

रिद्धी        ऋध्दी

सुष्मिता        सुस्मिता

शनैश्वर        शनैश्चर

प्रल्हाद        प्रलहाद

प्रणोति        प्रणीति

सुचिता        शुचिता

ऋषिकेश        हृषिकेश

मेघा        मेधा

रुता        ऋता

मंदा        मंदाकिनी

नावाचा महिमा


_________________________________
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম