भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक -छ. शिवाजी महाराजांचे शिल्प

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक -छ. शिवाजी महाराजांचे शिल्प

हिंदवी स्वराज्य संस्थापक छ.शिवाजी महाराज यांचे अनेक पुतळे आहेत.पण कर्नाटक येथील गदग जवळ यादवाड या गावी महाराजांच्या हयातीत एका शुर वीरांगनाने त्यांचे एक शिल्प उभारले आहे. 

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक -छ. शिवाजी महाराजांचे शिल्प
धारवाडच्या उत्तरेस १० कि.मी.वर यादवाड नावाचे गाव आहे.हे गाव तत्कालीन बेलवडी राज्यात येत होते. यादवाड नावाच्या गावात ग्राम दैवत मारुती मंदिराच्या जवळ असणारे हे शिल्प सुमारे तीन फूट उंचीचे व दीड फुट रुंद आहे.या शिल्पाचे दोन भाग आहेत,खालच्या भागात महाराजांनी एका मुलाला मांडीवर घेतले आहे.(मामा- भाचेच्या स्वरूपात) व हातात एक वाटी धरून मुलाला दूध पाजत आहेत तर वरच्या भागात शृंगारलेल्या घोड्यावर स्वार झालेली शिवाजी राजांची प्रतिमा आहे. त्याबरोबरच्या व्यक्तींच्या हातात राजचिन्हाचे सूचक राजदंड छत्र,सूर्यपान,आहेत.महारांजाच्या डाव्या हातात ढाल आणि उजव्या हातात तलवार दर्शविलेली आहे.ही तलवार सरळ असून, तिची मूठ मराठा पद्धतीची आहे.

या शिल्पाचा इतिहास असा

बेलवाडी या प्रांतावर त्याकाळी येसाजीप्रभु देसाई या लिंगायत धर्मिय जहागिरदाराचे राज्य होते.राज्याचा आवाका लहान होता.पण स्वतंत्र्य बाण्यामुळे शत्रुही होते.गावात लहान गढी होती.१६७८च्या सुमारास छ शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून महाराष्ट्रात परतत होते. त्यावेळी वाटेत असणाऱ्या लहान लहान राज्यांना शरण येण्यास व खंडणी भरण्यास दुतामार्फत कळवले.पण बेलवडीचे देसाई शरण आले नाहीत.म्हणुन महाराजांनी "बेलवडी" या छोट्या गढीस वेढा घातला.या वेळी या वेढ्याचे काम सखोजी गायकवाड या सरदारावर सोपवून महाराज पन्हाळगडावर आले.इकडे मराठे व देसाई यांच्यात लढाई होऊन येसाजीप्रभू देसाई मारले गेले.यानंतर गढी हाती येईल असे वाटत असतानाच येसाजीप्रभूची पत्नी मल्लाबाईने आपल्या महिला योद्धांच्या मदतीने लढाई सुरूच ठेवली.तिने विलक्षण शोर्याने सुमारे महिनाभर मराठा सैनिकांचा प्रतिकार केला.या युध्दात दोन्हीकडील सैनिक कामी येऊ लागले.पण युद्ध थांबेना म्हणुन काही काळानंतर मल्लव्वाने माघार घेतली आणि तहासाठी विनंती केली.साहजिकच ही बाब राजांना कळवण्यात आली. तोपर्यंत एक स्त्री आपल्या सैन्याशी लढत आहे ही वार्ताही महाराजाना कळाली होती.महाराजांनी तह मान्य केला.व स्व:त तोरगळ मार्गे बेलवडीला आले.मल्लव्वा व तिच्या अल्पवयीन मुलाला महाराजांच्या समोर हजर करण्यात आले. 

सोडे राजा मधुलिंग नायकाची कन्या असलेली मल्लमा ही बालपणापासूनच एक शूर मुलगी होती.आणि लग्नानंतर तिने शूर महिलांची एक महिला सेना तयार केली होती.  एवढ्या लहानशा राज्याने आपल्या सैन्याविरुद्ध केलेला लढा पाहून शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटले.  शिवाजी महाराजांना स्त्रियांबद्दल नेहमीच आदर होता.खडतर लढाईतही त्यांनी मल्लमाबद्दल सन्मान व आदर दाखवला. व मल्लम्माला बहिण मानुन साडी-चोळीचा अहेर केला.शिवाजी महाराज प्रेमाने म्हणाले, "आक्का, तुझ्याशी लढणे ही माझी चूक होती..."  एका शुर विधवेच्या शौर्याचा गौरव म्हणून, महाराजांनी तिच्या मुलाच्या पालनपोषण दूध-भातासाठी "बेलवाडी" गढी किल्ला आणि ताब्यात घेतलेला प्रदेश तिला परत केला.मल्लमाला तिच्या 'शत्रू'कडून म्हणजे शिवाजी महारांजाकडुन असे उदात्तभाव पाहून धक्का बसला आणि तिला मराठा राजाचे मोठेपण कळले. तिने शिवाजी महाराजांना आपल्या भावासारखे मानले महाराजांची आठवण कायम राहावी,यासाठी त्यांनी महाराजांचे दगडी शिल्प कोरले.आणि त्यांची शिल्पे राज्यभर बसवण्याचा निर्णय घेतला.बाकीचे शिल्प कोठे मिळुन येत नाहीत.त्याचे कारणही इतिहासाला माहित नाही.पण यादवाडचे शिल्प शाबुत असुन बहिण भावाचे हे प्रतिक आजही आपले वेगळेपण मिरवित उभे आहे. 

या कथेचा उल्लेख तीन पुस्तकांमध्ये आढळतो. इंन्द्रजित सावंत यांची दोन पुस्तके-शोध भवानी तलवारीचा,आणि शिव समाधीचा शोध आणि बोध, आणि तिसरे आप्पासाहेब पवार, स्टडीज इन इंडियन हिस्ट्री.यामध्ये.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম