शुक्राणूंची संख्या (स्पर्म काउंट) कशी वाढवावी?
जगभरात शुक्राणू संख्या आणि गुणवत्ता कमी होत असल्याचा तक्रारी वाढत आहे. शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी काही खास उपाय अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
ब्राझीलच्या साओ पाओलो विद्यापीठाने २००३ मध्ये केलेल्या अध्ययनात असे समोर आले की कॉफी ही शुक्राणू वहनासाठी चांगली असते. ७५० पुरूषांवर ही चाचणी करण्यात आली. त्यात असे समोर आले की शुक्राणूंच्या वहनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे त्या व्यक्तींकडून गर्भधारणेचा दर अधिक होता. दुसऱ्या एका अभ्यासानुसार असे समोर आले की, दररोज केवळ ३ कप कॉफीच प्यायला हवी. अधिक कॉफी प्यायल्याने अंडाषयापर्यंत जाऊन फर्टीलाइज करण्यात शुक्राणू कमी पडतात.
३४.५ अंश सेलिअल्समध्ये शुक्राणूचे उत्पादन होते. हे मनुष्याचा शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते. या संदर्भात २००७मध्ये तीन वर्षांचा अभ्यास करण्यात आला. यातील ११ पैकी पाच व्यक्तींनी गरम पाण्याने अंघोळ करणे थांबवले त्यामुळे त्यांच्या शुक्राणूंच्या प्रमाणात वाढ झाली. ती सुमारे ५०० टक्के होती.लसूणच्या वापराने सर्वांनाच आराम मिळतो. घरातील प्रत्येक मोठी व्यक्ती लसूणचा सहभाग अन्नात करण्यात सांगत असते. तसेच लसूण स्पर्म काऊंट वाढवण्यास देखील मदत करतो. दररोज सकाळी दोन लसणाच्या पाकळ्या ताज्या पाण्यासोबत घेतल्याने स्पर्म काऊंट नक्कीच वाढेल. तसेच यामुळे तुमचे लिव्हर देखील सुदृढ राहते.
कोरा लिंक http://bit.ly/3migwMQ Anil patil यांनी दिलेले उत्तर