अजबच! या गावात राहायचे तर अपेंडिक्स काढुन राहावे लागते

 अजबच! या गावात राहायचे तर अपेंडिक्स काढुन राहावे लागते

अंटार्क्टिकामध्ये व्हिलास लास एस्ट्रेलास नावाचे एक गाव आहे.या गावामध्ये राहायचे असल्यास शस्त्रक्रिया करून "अपेंडिक्स" काढुन टाकावे लागते.तरच येथील प्रशासन तुम्हाला राहायला परवानगी देते. 

अजबच! या गावात राहायचे तर अपेंडिक्स काढुन राहावे लागते
हे गाव इतर गावासारखे सामान्य असले तरी या जगावेगळ्या अटीमुळे या गावात येण्यास पर्यटक कचरतात.

सुमारे १५० ते २०० लोकांची वस्ती असलेले हे टुमदार गाव असुन सरासरी तापमान 2.3C (27.8F) आहे, जे अंटार्क्टिकच्या मुख्य भूभागापेक्षा प्रत्यक्षात जास्त उबदार आहे. तर कधीकधी पारा (-४५) असल्याने सर्व गावात बर्फाची दुलई पांघरलेली असते. गावातील रस्ते,गाडया,घरे सर्व काही बर्फाने पांढरे शुभ्र झालेले असते. येथील बरेच लोक चिली या देशाच्या नौसेनेचे वा वायुसेनेचे कर्मचारी आहेत.नैसर्गिक रचनेमुळे आसपास कोणतीही मनुष्य वस्तीनाही.मर्यादित लोकसंख्या असली तरी गावात बॅंक, पोस्ट ऑफिस, शाळा, बझार आदी सोयी आहेत.गावात एकच हॉस्पिटल असल्याने डॉक्टरांची संख्या पुरेशी नाही तशातच शस्त्रक्रिया करणारे निष्णात डॉक्टर नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रूग्णाला एक हजार किमीवर असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते. जो रस्ता मैलोनमैल बर्फाचा आहे. हा प्रवास  खडतर बर्फातुन व वेळखाऊ असतो म्हणुन बाहेरील कोणी व्यक्ति या गावात राहणार असेल तर अपेंडिक्स काढले असेल तरच राहायला परवानगी मिळते. अपेंडेक्टॉमी ही अपेंडिक्स काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया आहे,जी सहसा पोटाच्या उजव्या खालच्या बाजूला आढळते.

अपेंडिसायटिस (सुजलेल्या अपेंडिक्स) वर उपचार करण्यासाठी अपेंडेक्टॉमी सहसा आपत्कालीन आधारावर केली जाते.

 फाटलेल्या अपेंडिक्समुळे पेरिटोनिटिस होऊ शकते, जी संभाव्य जीवघेणी गुंतागुंतीची असते, ही परिस्थिती पाहता सावधगिरी म्हणुन व्हिलास लास गावामध्ये अपेंडिक्स काढुन टाकण्यावर भर दिला जातो.हे अविश्वसनीय परंतु सत्य आहे. 

अपेंडिक्स काढल्याने मानवी शरीरावर फारसा फरक पडत नाही वा धोकाही उदभवत नाही. अशी धारणा असल्याने पुढील अनर्थ टाळण्यासाठी अपेंडिक्स काढले जाते.

जर अपेंडिक्स मध्ये कोणत्या कारणाने इन्फेक्शन झाल्यास मनुष्याचा जीव जाण्याची भीती असते, आणि या गावातील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेची सोय नसल्याने हा जगावेगळा नियम या गावात आहे. 

 त्यामुळे मानवी जीवनात काही अडचणी येत नाहीत असे येथील प्रशासनाला वाटते.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম