म्हणुन मुघल जनानखान्यात खोजे(हिजडे)ठेवत असत

 म्हणुन मुघल जनानखान्यात खोजे(हिजडे)ठेवत असत

इतिहास पाहिला तर -खोजे सुलतानाच्या पदरी चाकरी करत असत. बादशहा,अमीर उमराव त्यांना आपल्या बेगमच्या कक्षाभोवती अंगरक्षक म्हणून रुजू करायचे. अनेक खोजानी आपल्या शौर्याच्या जोरावर मुघल सैन्यामध्ये मोठमोठी पदे देखील भूषवली होती.असे इतिहास सांगतो.उदाहरण पाहायचे झाल्यास मलिक काफुर याच्याकडे पाहिले जाऊ शकते. हा तो खोजा होता ज्याने दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी ह्याच्यासाठी संपूर्ण दख्खन स्वत: ताब्यात घेतले होते
म्हणुन मुघल जनानखान्यात खोजे(हिजडे)ठेवत असत
भारतावर मुघल शासकांनी प्रदिर्घ काळ राज्य केले.त्या काळात अनेक लग्न करण्याची,बायका ठेवायची प्रथा होती.सामान्य माणूस सुध्दा दोन लग्न सहज करत असे.तर राजे लोक आठ आठ लग्न करीत असत.मात्र मुघल बादशहा याची अधिकृत चार पाच लग्न झालेली असली तरी सुद्धा हजारो बायका आपल्या पदरी बाळगत असत.अकबराच्या तर ४००० स्त्रिया होत्या असा इतिहासात उल्लेख आहे.या स्त्रियासाठी स्वतंत्र महाल किंवा वाडा असे.यालाच "जनानखाना" म्हणतात. किंवा हरम म्हणतात.जनानखाना हा मुसलमान समाजातील बादशहा,सुलतान,अमीर, उमराव अशा श्रीमंत आणि उच्चपदस्थ लोकांच्या घरांतच विशेषतः दिसून येत असे.'जना' म्हणजे स्त्री. तेंव्हा 'जनाना' किंवा 'जनानखाना' म्हणजे जिथे स्त्रिया राहतात ती जागा. यालाच 'हरम' असे सुद्धा म्हणतात.
उपस्त्रीयांचे परपुरुषांशी संबंध येऊ नयेत म्हणून पातशाहाच्या महालात स्त्रियांना पुरुषांपासून वेगळ्या अशा ठिकाणी ठेवले जात असे.बादशाहच्या आई-बहिणीं,मुलगीपासून ते गुलाम उपस्त्रीपर्यंत सगळ्या बायका या जनानखान्यात असत.अबुल फजल लिहितो की अकबराच्या काळात ५,००० स्त्रिया हरम मध्ये होत्या.मुघलांच्या हरम मध्ये वेगवेगळ्या भागांतून आलेल्या, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या असंख्य स्त्रिया असत. त्यांना अतिशय सुरक्षिततेत आणि खाजगीपणे 'पडद्यात' ठेवलेले असे.या खोजापासुन बादशहाच्या महिलांना कोणताही लैंगिक धोका नव्हता.त्याचबरोबर या महिला बाहेरील कोणा पुरुषाबरोबर संबंध ठेवु नयेत म्हणून हे खोजे या महिलावर लक्ष ठेवत असत.
या जनानखान्यांनात बादशाह आणि त्याच्या कुटुंबातील पुरुषांव्यतिरिक्त इतर पुरुषांना प्रवेश नसे.परपुरुषच काय, त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर त्या मुलांना सुद्धा हरमात जाण्यास परवानगी नसायची.अबुल फझल ने 'आईन-ई-अकबरी' मध्ये लिहिले आहे की, हरमाची सेवा करण्यासाठी अकबराने त्याच्या अतिशय विश्वासू माणसांना ठेवले होते.मुघल हरम चारी बाजुनी भिंतींनी बंदिस्त असायच्या आणि आतमध्ये इमारती असायच्या.प्रत्येक खोल्यांना पडदे असायचे. सगळ्या इमारतींच्या मधोमध मोठे अंगण असायचे.जनानखान्याच्या व्यवस्थेकरिता स्त्री अधीक्षकाची नेमणूक केलेली असे.काही वेळा सुलतानाच्या मर्जीतली विश्वासू स्त्री या अधीक्षकाद्वारे जनानखान्यावर नजर ठेवीत असे. जनानखान्याच्या रक्षणाचे काम हिजडे लोकांकडेही सोपविले जात असे. त्यांना "खोजे" म्हणत.म्हणजेच खच्ची केलेले पुरुष असत.खोजे मुद्दाम ठेवले जात असत.मुघल जनानखान्यात किंवा हरम मध्ये सर्व सुविधा असायचे.बागबगीचे,कारंजे, लहान लहान दुकाने.प्रत्येक स्त्रीला स्वतःची खोली असायची.प्रत्येक इमारतीत शौचालयांची व्यवस्था असायची.जेवण हे मुघलांच्या माखताब (खास जेवणघर) मधून यायचे.
म्हणुन मुघल जनानखान्यात खोजे(हिजडे)ठेवत असत
जरी बादशहाने अनेक बायका ठेवल्या असल्या तरी, बादशहाचा व या बायकांचा प्रत्यक्ष संबंध क्वचित येत असे.साहजिकच जनानखान्यातील बायका सेक्स बाबतीत असंतुष्ठ राहात असत.मग जनानखान्यात जर इतर पुरुष ठेवले तर आणखी लफडी होतील अशी भीती असे, यासाठी हे खोजे ठेवण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून जगभरात आहे.या मुघल स्त्रियांना पडद्यातच राहावे लागे.जेंव्हा तीर्थक्षेत्र, किंवा पर्यटन किंवा स्वारी(लढाई) साठी जावे लागायचे तेंव्हा त्यांना पालखी मधून जावे लागे त्यांच्या आसपास अन्य पुरुषा ऐवजी हे खोजे असायचे.मुघलाच्या काळात तरूणांना बळबळजबरीने खोजा बनवल जायचे.त्याप्रमाणे जनानखाना राखण्यासाठी तृतीयपंथी नंपुसक लोक कमी पडतात म्हणून सशक्त तरूणानाच नपुसंक केल जायचे.काही वेळा गुलाम म्हणून खरेदी केलेल्या तरूणांची, पराजित शत्रुपक्षातील निवड केली जात असे. हकीमानी शारीरिक चाचणी घेऊन पुर्णपणे खोजा झाल्याची खात्री पटल्यानंतरच  त्यांना जनानखान्यात प्रवेश दिला जात असे. जनानखान्यात किमान २५ नंपुसक खोजे सेवेत असायचे या प्रत्येकाची कामे ठरवुन दिलेली असायची त्याच्या मुख्य खोजाला "दरोघा" म्हणत.त्याला महालात मोठा मान होता.जनानखान्यातील कुठला खोजा चुकला तर तो थेट राजा सरदाराकडे तक्रार कराीत असे.यामुळे दरोघाला जनानखाना वचकुन असायचा.इतकेच काय बेगमाही त्याला घाबरायची.हरमचा जो मुख्य अधिकारी असायचा त्याला 'नाजिर', 'नाजिर-इ-महल', 'ख्वाजा-सेरा' म्हणायचे.कधी कधी जनानखान्यात आडोसा पकडुन दासी व खोजाचे चाळे चालायचे.यात जर तो खोजा रंगेहाथ सापडला तर व्याभिचाराचा गुन्हा म्हणून थेट मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असे.
म्हणुन मुघल जनानखान्यात खोजे(हिजडे)ठेवत असत
हरमचा व्यवहार व घडामोडी लिहीण्यासाठी 'नवीस' ठेवलेला असे. त्यामुळे जसं मुघल दरबाराचे 'दप्तर' असायचं तसंच हरम दप्तरही असायचं.

खोजाची निवड करण्यासाठी सशक्त तरूणांची बैलाचे निर्बीजीकरण करतात तसे  निर्बीजीकरण करायचे.दहापैकी  पाचजण निर्बीजीकरण करताना दगावयचे.तर पाच मधले आजारी पडून 3 जण काही महिन्यात मरायचे आणि फक्त दोन जण आयुष्यभर खोजा बनून राहायचे.अशी ही अमानुष पध्दत होती. त्या काळात हिजड्याचा व्यापार तेजीत होता गुलामापेक्षा, हिजड्याची किमंत इतर गुलामापेक्षा तीन ते चार पट जास्त असे.एखाद्या राजाचा पराभव झाला तर हजारो सशक्त तरूणाना जबरदस्तीने हिजडे केले जायचे. जहागीर बादशहाने आपल्या 'तुजुक ए जहागिरी' मध्ये असे लिहले आहे की, त्या काळात भारतात बंगाल कडील भागात शेतकरयाच्या शेतसारा कर न दिल्यान तिथले सरदार व जमीनदार शेतकऱ्यांच्या मुलाची बीज फोडून सरदार सुभेदाराना द्यायची पध्दत आहे.हळूहळू ती पध्दत इतर प्रांतामध्ये पसरत असुन त्या भागातील मुले आपली शक्ती गमावत आहेत.ही पद्धत

बंगालच्या बाहेर जोर पकडत चालली होती. हि पध्दत बंद करण्याच फर्मान जहागीर बादशहाने काढले होते.कारण याचा परिणाम शेतीवर होत असे यामुळे शेतकी उत्पन्न ढासळायचे.राज्याचा कर वसुल करण्याच्या पध्दतीपैकी हि एक पध्दत रूढ असल्याने या फर्मानाचा उपयोग झाला नाही. औरंगजेबाने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्यामध्ये दारू जुगार आणि अशा खोज्यांची बीज फोडण्याची पध्दत बंद करण्याची होती.ओरंगजेबाच्या काळात जेंव्हा त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने गोवळकोंड्या मध्ये एकाच वेळी बावीस हजार पुरूषांची बीजे फोडली होती.जहागिर बादशहाच्या दरबारात सय्यदखान चुगताई या पराक्रमी सरदाराकडे बाराशे नंपुसक होते असे खुद्द जहागिरनेच लिहुन ठेवल आहे. त्या काळात हिजड्याना मोठ्या प्रमाणावर मागणी होती.त्या काळात कोणताही श्रीमंत सरदार असो तो मेला की, त्याची सगळी दौलत सुलतान सरकार जमा करायचा.त्याच्या एक एक लहान लहान वस्तू पासून मोठ्या जमिनी,मालमत्ताचा हिशोब घेतला जाऊन त्या सरदारांच्या कुटुंबातील लोकांना बेदखल केल जात असे, सरदाराच्या जनानातील स्त्रिया अक्षरशः रस्त्यावर यायच्या, तेव्हा त्यांना दुसरा कोणीतरी सरदार आपल्या जनान्यात ठेवु न घ्यायचा.

मुघलाच्या काळात नाझीर व 'ख्वाजा सरस' नावाचे काही हिजडे मनसबदार आणि सुभेदार अश्या मोठ्या पदावर पोहचले होते.या नाझीर व ख्वाजा सरस याना 'ऐतमखान'असे बिरूद होते.बाबर आणि हुमायूची सेवा केलेल्या अश्याच एका ऐतमखानला दिल्लीचा सुभेदार म्हणून अकबराने नेमणुक केली होती.असा इतिहास आहे. 

इतिहासातील प्रसिद्ध खोजे

अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूर हा समलिंगी होता. खिलजी आणि सेनापती मलिक कफूर हे समलिंगी असल्याचे दाखले आहेत.बाराव्या शतकातील सुलतान बल्बनचा वजीर इमरूद्दीन रेहन हा पण खोजा होता. 

सुलतान उस शर्क म्हणजेच वजीर ख्वाजा जहान मलीक सर्वार नावाचा निग्रो हिजड्याला सुलतान महंमदने १३९४ मध्ये मलीक उस शर्क या बिरूदासह जोनपूरचा सुबेदार म्हणुन पाठवले होते. 

कुतुबुद्दिन मुबारक व खिलजीचा जवळचा मित्र खदोशा हे हिजडेच होते.बाबर आणि हुमायूची सेवा केलेल्या अश्याच एका ऐतमखानला दिल्लीचा सुभेदार म्हणून अकबराने नेमणुक केली होती. 

ओरंगजेबाने त्याचाकडील हिजड्याचा प्रमुख असलेल्या बख्तबरखान याला हजारी मनसबदारी केल होत. 

या जनाना संस्कृतीची पद्धत  राजस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात रूजली गेली.अनेक रजपुत राजेलोकांनी याच पालन केल.पण मराठयानी असली पद्धत अवलंबली नाही.

हरम यासंबंधी बाबर ची मुलगी आणि हुमायूनची बहीण गुलाबादन बेगम हिने या हरम वर एक पुस्तक लिहिले आहे शिवाय 'लाईफ ऑफ इंडियन रूलर्स' या पुस्तकात विस्तृत माहिती दिली आहे. 

- अनिल पाटील पेठवडगाव

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম