अक्करमाशी मराठा व बारामाशी मराठा म्हणजे कोण?
मराठा समाजात वरिष्ठ व कनिष्ठ स्तर दिसुन येतो.काही ठिकाणी ११ माशी (अक्करमाशी) असा उल्लेख असा येतो.आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहोत असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवावरून व व्यावहारिक गोष्टींवरून रजपुतांचे व मराठयांचें मिश्रण पुष्कळ अंशी झालें आहे असें दिसतें. कांही मराठयांची आडनांवेंहि रजपूत दिसतात. उदाहरणार्थ - अहिरराव चांडेल, गुजर, कदम, कलचुरे, लाड, पवार, साळुंखे, शेलार, शिसोदे, यादव वगैरे. त्यांच्या रीतीभाती (उदाहरणार्थ, पुनर्विवाह न करणें, जानवें घालणें, पडदापद्धत, न्हाव्यामार्फत लग्ननिश्र्चय, मेजवानीच्या प्रसंगीं न्हाव्यानें पाणी देणें) रजपुतांप्रमाणें वाटतात. रजपूत राजघराण्याचे मराठे घराण्यांशीं शरीरसंबंध झालेले आहेत. अनहिलवाड येथील प्रसिद्ध राजा सिद्धराज जयसिंग याची आई गोवाकदंब घराण्यांतली मुलगी होती. शिवाजी महाराज यांचा आजा लखुजी जाधव, देवगिरीचे रामदेव यादव यांच्या वंशातले होते. मराठयांचा पिढीजाद धंदा लढण्याचा म्हणून म्हणतात. सांप्रत ते जहागीरदार, जमीनदार, दरबारी नोकर, व शेतकी करणारे आहेत. कित्येक मराठे संस्थानिक आहेत. त्यांच्यांत मुख्य दोन वर्ग आहेतः (१) अस्सल म्हणजे शुद्धबीजाचे व (२) इतर; यांत कुणबी व माळी या जातींचा समावेश होतो. तिसरा एक वर्ग आहे, तो म्हणजे दासीपुत्रांचा. त्यांनां लेकावळे, अक्करमासे अथवा शिंदे असें म्हणतात. अस्सल मराठयांत मुलामुलींचीं लग्नें करण्याच्या वेळी फार विवक्षणा करावी लागते. तरी अस्स्ल मराठयाची मुलगी श्रीमंत कुणब्याच्या घरीं व श्रीमंत कुणब्याची मुलगी अस्सल मराठयांच्या घरीं असलेलीं अशीं कित्येक उदाहरणें दाखवितां येतील.
👉कोरा लिंक : http://bit.ly/3ForB6u Anil patil यांनी दिलेले उत्तर