आगकाडीचा जन्म

 आगकाडीचा जन्म

आज आपण सहज आगकाडीचा वापर करतो.पण पुर्वी चुल पेटविण्यासाठी गारगोटी एकमेकावर घासुन अग्नि निर्माण करावा लागत होता.आणि हे सुलभ नव्हते. १८२७ साली अपघातानेच एक घटना घडली; अगदी ध्यानीमनी नसताना! वैद्यक आणि औषधशास्त्राचं शिक्षण घेतलेला, पण रसायनशास्त्रात विशेष रुची असलेला ब्रिटिश संशोधक जॉन वॉकर काही प्रयोग करण्यात गुंतला होता. एका भांडय़ात अँटिमनी सल्फाइड, पोटॅशियम क्लोरेट, स्टार्च आणि िडक यांचं मिश्रण लाकडी काठीने ढवळून त्याने ठेवलं होतं. थोडय़ा वेळाने जॉन वॉकरचं लक्ष त्या लाकडी काठीकडे गेलं. काठीच्या टोकाला मिश्रणाचा घट्ट गोळा तयार झाला होता. हा गोळा खरवडून काढण्यासाठी त्याने काठी जमिनीवर घासली. आश्चर्य म्हणजे, काठीवर जमा झालेल्या त्या मिश्रणाच्या घट्ट गोळ्याने पेट घेतला.. आणि आपण सध्या ज्या स्वरूपात आगकाडी वापरतो, त्या आगकाडीचा जन्म झाला.

आगकाडीचा जन्म
संशोधक वृत्तीमुळे या घटनेचा अर्थ आणि महत्त्व जॉन वॉकरच्या ताबडतोब लक्षात आलं. या प्रक्रियेमुळे आपल्याला हवं तेव्हा आणि अगदी सुलभपणे अग्नी प्रज्वलित करता येणार होता. वॉकरने मग तीन इंच लांबीच्या लाकडी काडय़ांना ज्वलनशील मिश्रण लावलं आणि पहिल्यावहिल्या आगकाडय़ा तयार केल्या. त्यांना वॉकरने ‘घर्षण आगकाडय़ा’ असं नाव दिलं होतं. या घर्षण आगकाडय़ा पत्र्याच्या लंबगोलाकार डब्यांमध्ये भरून त्याने स्थानिक पुस्तक विक्रेत्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवल्या. घर्षण आगकाडय़ा पेटवण्यासाठी वॉकरने प्रत्येक डबीमध्ये खरकागदाचा तुकडा ठेवला होता. ५० घर्षण आगकाडय़ा असलेल्या एका डबीची किंमत एक शििलग होती.

कालांतराने आगकाडय़ा आणि आगपेटय़ा यांच्यात सुधारणा होत गेल्या; स्वरूप बदलत गेलं आणि आगकाडय़ांमधील घटक पदार्थही बदलले. आपण आज वापरतो त्या ‘सेफ्टी मॅच स्टिक्स’ म्हणजे सुरक्षित आगकाडय़ा १८५५ साली जोहान एडवर्ड लुंडस्ट्रॉम याने केल्या. जोहान लुंडस्ट्रॉम हा स्वीडनमध्ये आगकाडय़ांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा मालक होता. त्याने आगकाडीला लावण्यात येणाऱ्या मिश्रणात लाल फॉस्फरसचा वापर केला.

कोरा लिंक: http://bit.ly/3zaJfIC Anil patil यांनी दिलेले उत्तर

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম