डॅशिंग खासदार उदयनराजे

 डॅशिंग खासदार उदयनराजे 

राजा म्हटले की, रयतेला सांभाळून घेणारा, त्यांच्या अडीअडचणीला धावून येणारा, मदत करणारा, असा असावा. जनतेचे पाठबळ असलेले नेते राजकारणात फारच दुर्मिळ असतात. समाजकारणी, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जाते. सामाजिक बांधिलकी हे तत्व त्यांनी सुरुवातीपासून अंगिकारले आहे. राजेसाहेबांकडे आलेली व्यक्ती रिकाम्या हाताने परत कधीच जात नाही. अनेकांचे अश्रू पुसण्याचे काम राजेसाहेब करतात.
नावाप्रमाणेच नितीज्ञ, धर्मज्ञ, ध्येयसक्त, ज्ञानी, पराक्रमी असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे खासदार उदयनराजे.
स्पष्टवक्ते, कुणाची भीड न ठेवणारे, सामान्य लोकांच्या अडचणींना धावून जाणारे अशावेळी कोणतीही जातपात, धर्म न बघणारे, भ्रष्टाचारी अधिकारी, वाईट प्रवृत्ती च्या विरोधात उभे राहणारे एकमेव राजकारणी, शिवछत्रपतीचे वंशज खासदार उदयनराजे भोसले.नजर जाईल तेव्हढी प्रजा अन् त्या प्रजेचा एकच राजा म्हणजे खासदार उदयनराजे भोसले.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या कामाची पद्धत सातारकरांसाठी विशेषतः शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना नवीन नाही. एखादे काम हाेत नसेल तर नागरीक उदयनराजेंकडे धाव घेतात. ते काम हाेवू अगर नये परंतु नागरीकांना उदयनराजेंना भेटल्यानंतर दिलासा मिळताे. उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस येथे नागरीकांची गर्दी असते. आपले काम झाल्यानंतर नागरीक उदयनराजेंसमवेत छायाचित्र काढण्यास उत्सुक असतात. उदयनराजेही छायाचित्रसाठी शक्यताे काेणाला नाही म्हणत नाहीत.
उदयनराजेंनी मात्र आपल्याकडे पद असाे अथवा नसाे मी अखेरच्या श्वासापर्यंत तुमचाच राहीन. सेवा करीन असे समाजमाध्यमातून जाहीर केले आहे. त्यांच्या बेधडक स्टाईलचे व्हिडिअाे व्हायरल झालेच आहेत.गोरगरिबांचे उद्धारकर्ते, समस्यांचे मूळ माहित असल्याने आपल्या व्यापक दूरदृष्टीतून समस्या निवारण करणारे लोकव्यासंगी उदयनराजे अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत.

डॅशिंग खासदार उदयनराजे

उदयनराजे यांनी सातारा शहरासाठी व जिल्ह्यासाठी बरेच काम केले आहे. साताऱ्यात खंडाळा तालुक्यातील शिरवळ, खंडाळा व लोणंद येथील औद्योगिक क्षेत्राचा विकास त्यांच्या काळातच झाला. सातारा शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. झोपडपट्टी धारकांना पक्की घरे बांधून देण्यात ते प्रयत्नशील आहेत.दयनराजे यांना सत्तेची दारे नेहमीच उघडी राहिली, याला कारण त्यांचे समाजकारण. प्रत्येक कामात उत्कृष्टता यायला हवी हा त्यांचा आग्रह असतो म्हणूनच राजकारणापलिकडे जाऊन शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक अशा ज्या क्षेत्रात त्यांनी पाय ठेवला तेथे उल्लेखनीय कामगिरी करून दाखविली. 
लोकसभा, विधानसभेची असो महापालिकेची कोणतीही निवडणूक न लढवण्याची घोषणा करणारे उदयनराजे हेच ’किंग’मेकर ठरतात.  विषय जिथे गंभीर तिथे लोकनेते उदयनराजे खंबीर! त्यामुळे कोणतेही प्रश्न सोडविले जातात.
डॅशिंग खासदार उदयनराजे

उदयनराजेंची बिनाधास्त स्टाइल आणि बेधडक स्वभाव अनेकांना आवडतो. त्यात उदयनराजे भाषणाला उभे राहिले की मग त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज सुरु होतो.

🔹 उदयनराजेंचे गाजलेले डायलॉग

⌨️ "यांना काय जमतं? धऱणात पाणी नाय साठलं की तिथं मुतायचं. नाही तर या रामराजेंनी सांगायचं की मी सर्व नीरा देवघर कोळून प्यायलोय"
⌨️ एक युगपुरुष कधीतरी जन्माला येतो ते म्हणजे शिवाजी महाराज, जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. इतर कुणालाही जाणता राजा उपाधी देणं याचाही मी निषेध करतो"
⌨️ पक्षबिक्ष गेला खड्ड्यात, साताऱ्याची जनता हाच माझा पक्ष. उदयनराजे स्वतंत्र आहेत. मी राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला गेलो नव्हतो'
⌨️ "खूप प्रेम करतो तुमच्या सातारकरांवर माना अगर न माना. फरक पडणार नाही…तेव्हा आणि आजसुद्धा… स्टाईल इज स्टाईल"
⌨️ एक बार जो मैने कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की भी नही सुनता, स्टाईल इज स्टाईल"
⌨️ चुकीला माफी नाही आणि उदयनराजेकडून तर अजिबात नाही...कोणीही आणि कोणताही पक्ष असू द्या..कोणीही कितीही मोठा असला तरी चुकीला माफी नाही
⌨️ "अजून काय केस होणार आणि काय...लोकांसाठी केसेस छाताडावर झेलण्याची माझी तयारी आहे"
⌨️ आमच्या मुसक्या बांधण्याची मजल आज नाय उद्या नाय आणि भविष्यकाळात कुणाची नसणार…कॅमेऱ्यात सांगतोय…परत सांगितलं नाय म्हणून सांगायचं नाय
⌨️ "मला हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसंच राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही"
⌨️ "माझ्याविरोधात ब्र शब्द काढला तर ध्यानात ठेवा मी बांगड्या घातलेल्या नाहीत आणि घालणार नाही. कोणी काहीही बोलायचं आणि मी ऐकून घ्यायचं असं कोणी सांगितलं"

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম