तापमान नियंत्रणासाठी वृषण सैल वा घट्ट होतात.
बरयाचजणाना हा प्रश्न पडतो की, असे का होते की,वेगवेगळ्या वेळी वृषण सैल किंवा घट्ट पडतात पुरूषांना थंडीच्या दिवसात जाणवते असते की, वृषण घट्ट पडले आहेत.तर उन्हाळ्यात वृषण सैल पडलेले दिसते.पण का?
आपले मानवी शरीर हे वेगवेगळ्या हवामानात अनुकूल तापमान ठेवण्याचे कार्य करत असते.वृषणाभोवती मुष्क असते, मुष्क म्हणजे वृषणाचे रक्षण करणारी त्वचेची पातळ पिशवी. वृषणांच्या रक्षणाखेरीज त्यांच्या तापमानाचे नियंत्रण करण्याचे कार्य मुष्कामुळे होत असते. मुष्कपर्युदर प्रावरणी(थरांनी बनलेले) मुष्कावरण (पांढऱ्या चिवट तंतुमय आवरण) या मुष्कामधील असलेल्या पटलांमुळे वृषणांचे तापमानाचे नियंत्रण होते.वृषणामध्ये दोन बीजकोष असतात. या दोन्ही बीजकोषाचा आकार सारखाच असतो असं नाही. पोटात जिथे मूत्राशय असतं, त्याच्या मागच्या बाजूला दोन वीर्यकोष असतात. बीजकोषात पुरुषबीजं तयार व्हायला लागतात. पुरुषबीजं बीज कोषातून बाहेर पडून बीजवाहक नलिकेतून वीर्यकोषात जातात. वीर्यकोष व त्याच्या शेजारील प्रोस्टेट ग्रंथीमधून वेगवेगळे स्त्राव स्त्रवतात आणि ते वीर्यकोषात साठवले जातात. त्यात एक चिकट पांढरा पदार्थ तयार व्हायला लागतो त्यालाच वीर्य असे म्हणतात. तयार झालेले वीर्य शिश्नातून बाहेर पडते.मुष्कावरण त्वचेच्या लगत असते त्याचे दोन वृषणांमध्ये पडदा तयार होऊन मुष्काचे दोन भाग पडतात व त्याच्या प्रत्येक भागामध्ये एक वृषण असतो. यांशिवाय मुष्कावरणामध्ये अरेखित स्नायूंचे दोन थर असतात. हा डॉरटोस नावाचा स्नायू हवेतील तापमानाच्या बाबतीत संवेदनशील आहे.जेव्हा बीजकोषाजवळील तापमान थंड असते, त्यावेळेस वृषण आकुंचन पावतात, तर जेव्हा तापमान जास्त असते त्यावेळेस वृषण प्रसरण पावतात. कारण शुक्राणू तयार होण्यासाठी बीजकोषाला एका विशिष्ट तापमानाची गरज असते. आकुंचन आणि प्रसरण या क्रियांवर आपले नियंत्रण नसते. शरीराच्या तापमानापेक्षा वृषणाचे तापमान कमी असते. या स्नायूच्या होणाऱ्या कार्यामुळे थंडीच्या दिवसात व सकाळच्या गारव्याच्या वेळी मुष्क संकुचित होऊन वृषण अंगालगत आणले जाऊन घट्ट पडलेले दिसतात तर उन्हाळ्यात मुष्क सैल पडते व वृषण अंगापासून बरेच दूर राहतात. वृषणाचे तापमान वाढल्यास विकृत अथवा मृत शुक्राणुंचे उत्पादन वाढते.म्हणुन निसर्गाने केलेली ही रचना अद्वितीय आहे.