मासे व दुध कधीही खाऊ नये
आपण आहारामध्ये मांसाहारी म्हणून माशाचा वापर करतो.केसांच्या आरोग्यासाठी तसेच आपले डोळे निरोगी रहावेत यासाठी माशाचे सेवन अत्यावश्यक आहे.तसेच दूध सुध्दा शरीरासाठी पोषक तत्त्व आहे. दरदिवसाला १ ग्लास दूध प्यायल्यास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते.पण मासा व दुध एकत्र करून कधीही खाऊ नये.मासे हे प्रोटीन आहे तर दूध हे दुग्धजन्य पदार्थ आहे. प्रथिने आणि दुग्धजन्य पदार्थ शरीरात गेल्यानंतर एकमेकांशी स्पर्धा करतात. दुधासोबत मासे खाल्ल्याने पाचक एंझाइम्सचा अपव्यय होतो आणि माशांमधील प्रथिने चयापचय आणि शोषून घेण्याची शरीराची क्षमता कमी होते.दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पोटाच्या वेगळ्या कप्प्यात पचतात, ज्याला 'कफा' म्हणतात.
कफ ही पचनशक्ती आहे जी चरबीच्या पचनासाठी जबाबदार असते. आयुर्वेद सुध्दा सांगतो की, दुध व मासे एकत्र खाऊ नये त्यामुळे समस्या निर्माण होतात.शरीरावरती निश्चितच अनिष्ट असा परिणाम होत असतो. दूध थंड प्रवृत्तीचं असतं म्हणून ते गरम पदार्थांबरोबर घेऊ नये. मासाही गरम असल्याने दही किंवा दुधाबरोबर खाऊ नये. याने एलर्जी होऊ शकते.मासे खाल्यानंतर दूध आजिबातही पिऊ नये. किंवा दुधाचा कोणताही पदार्थ खाऊ नये.खाल्यास 'स्किन ऍलर्जी' म्हणजे आपल्याला त्वचेची ऍलर्जी निर्माण होते. बऱ्याच जणांना तर अंगावरती कोड उठतात. त्वचारोगाला दुसरं नाव आहे विटिलिगो. यात त्वचेच्या काही भागांवरील पिंगमेंटेशन निघून जातं आणि अंगावर पांढरे चट्टे दिसू लागतात.ज्या दिवशी तुम्ही मासे खाता त्या पुर्ण दिवशी दुधाचे सेवन करू नये. याचे कारण असे की मासे जो पर्यंत पचत नाहीत व चांगल्या प्रकारे ते आतड्यातून खाली उतरत नाहीत तोपर्यंत तरी दुध टाळावे. कारण कातडीरोग "हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. तुमची इम्युन सिस्टीम तुमच्या मेलनिनच्या विरोधात अँटीबॉडीज तयार करायला सुरुवात करते.""अँटीबॉडीज ज्या भागात हल्ला करतात त्या भागातील मेलनिनचं नुकसान होतं, आणि आपल्या त्वचेवर चट्टे दिसू लागतात."
हल्ली हॉटेल मध्ये दूध वापरून माशांचे पदार्थ तयार केले जातात.ते निश्चितच आरोग्यास अपायकारक आहेत.
Tags
आरोग्य