माझी पत्रकारिता
मनाची संवेदनशिलता मरु न देणे आणि सकारात्मकता जपून ठेवणे हे पत्रकारितेतील सर्वात मोठे आव्हान आहे. पत्रकारितेच्या या प्रवासात मी अनेक अनुभवांना सामोरे गेलो. प्रत्येक वेळी संवेदनशिलता आणि सकारात्मकतेची कसोटी लागली. पत्रकारितेचे ग्लॅमर भल्या भल्यांना वाहवत नेते. मोहाच्या क्षणी कमजोर न पडता आपले उद्दिष्ट साध्य करणे अवघड असते.पत्रकारिता हा व्यवसाय आणि उपजीविकेचे साधन म्हणून स्विकारणे आणि छंद म्हणून किंवा एक मिशन म्हणून स्विकारणे या दोन्ही बाबतीत फायदे आणि तोटे वेगवेगळे असतात.पत्रकार हा एक असा व्यक्ती असतो जो समाजात घडत असलेल्या वेगवेगळया घटना,प्रसंगांविषयी, भ्रष्टाचाराविषयी वेगवेगळया माध्यमांचा आधार घेऊन माहीती गोळा करत असतो आणि समाजातील लोकांपर्यत ती पोहचविण्याचे काम करत असतो. पत्रकाराने कोणत्याही सामाजिक,राजकीय दबावांना तसेच प्रलोभनांना बळी न पडता तटस्थपणे समाजासमोर सत्य बातमी मांडायला हवी.
पुरस्कार बातमी दै 'पुण्यनगरी'
मी २००२ पासुन २००८ पर्यंत दै पुण्यनगरी, दै महासत्ता मध्ये पत्रकार म्हणुन शेळेवाडी ता राधानगरी येथे असताना काम केले.ग्रामिण भागाचे विकासाचे प्रश्न असो वा चांगल्या घटना त्या जिल्हा आवृत्त्यांमध्ये दबून जातात. ग्राामीण पत्रकारितेला स्वतंत्र स्थान देण्याच्या दृष्टीने मॅनेजमेन्टशी भांडलो पण त्यांनी दाद दिली नाही. पत्रकारितेने माझे नाव कदाचित खूप मोठे केले नसेल, माझ्या संवेदनशिलता जपण्याच्या आणि सकारात्मक पत्रकारितेच्या हट्टाने या क्षेत्रात मला थोडे वेगळे पाडले पण त्याचे दुःख आता जाणवत नाही. कारण अनुभवातून आलेले शहाणपण त्यापेक्षा जास्त महत्वाचे वाटते. या क्षेत्रात चाललेले राजकारण जवळुन बघितले अनुभवले.आणि २००८ ला मी पेठवडगाव येथे आलो आणि माझी पत्रकारिता संपली. पत्रकार म्हणून काम करताना कोणाला खुश वा नाराज करण्यासाठी लिहिले नाही, प्रसंगी कोणाचा मुलाहिजा ठेवला नाही. ताकदीने सर्व थरांतील जनतेच्या आणि सर्व स्तरांवरील लोकांच्या समस्या प्राधान्याने मांडतानाच प्रत्येकाला न्याय दिला.पत्रकारिता करतेवेळी आपल्या स्वतःचे मत बातमी मध्ये जोडण्याचे टाळल्यास बातमीची विश्वसनीयता अबाधित राहते.असा माझा अनुभव आहे. (पुरस्कार प्राप्त बातमी) ------------------------------- |
(ग्रामीण भागातील सद्यस्थिती) ------------------------ |
(महागाई) ------------------------ |
(अर्थ संकल्पावर लेख) ------------------------------ |
(पुरस्कार बातमी दै 'महासत्ता') |
(पुरस्कार बातमी दै 'सकाळ') ------------------------------- |
(मिरज- पंढरपूर नॅरो गेज रेल्वेचा शेवटचा प्रवास २००८) ---------------------------- |
(नागरी भागात हत्तीचा वावर) --------------------------------- |
(कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणातील खळबळजनक बातमी २००८) -------------------------------------- |
(कोकण रेल्वे गारगोटी भागातुन जाण्याची जुनी मागणी २००७) ---------------------------------- |
(राधानगरी धरण : दरवाज्याचा प्रश्न २००७) ------------------------------------ |
(बळीराजाची फसवणूक) --------------------------------- |
(अंपग शिवाजीची दुर्दम इच्छा शक्ति) ----------------------------------------------- |
(महिला सक्षमीकरण) --------------------------------------- |
(रेल्वे फाटकाचे प्रश्न) -------------------------------------------- |
(कोल्हापूरातुन कुस्ती गायब होतेय) |
२००६ मध्ये राधानगरी धरणावर लेख लिहिले त्यावेळी कोणताही प्रस्ताव न देता सुध्दा अकोला येथील "अंकुर साहित्य संघाने"दखल घेतली व मला महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा शोधपत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवले. मी अनेक विषयांवर बातमीदारी केली,लेख लिहिले.
आजकाल तर डिजिटल मिडियाचा बोलबाला आहे.आत्ताची परिस्थिती पाहता,ते पहिले दिवस राहिले नाहीत याची खंत वाटते.सध्या तर पत्रकाराने जाहिराती आणणे नव्हे ती आणावीच लागते.तरच तो टिकतो.
पत्रकारितेचा बिझनेस
पत्रकाराच्या आडुन हा आता बिझनेस झाला आहे. त्यातून पुढे कमिशन आणि वार्षिक टार्गेट, पॅकेज वगैरे गोष्टी आल्याच.कामे-जास्त फरकानं जवळपास संस्था हाच फंडा राबवतात. माफ करा, पण मी चूकत नसेल तर पण आता समाजसेवा म्हणून किंवा चौकस विचार, चांगली लिखाण शैली वगैरे गोष्टी सर्वच व्यवस्थापनातून हद्दपार झाल्या आहेत.अगदी मोजक्या ठिकाणी फक्त चांगली पत्रकारिता शिल्लक आहे.ती आपण पाहतोच आहे.पत्रकाराला समाजातील एखादा किंवा अनेक समस्याविषयी सहानुभूती असते हा प्रश्न सुटावा यासाठी तो जिवाचे रान करतो पण तो ज्या माध्यमात काम करतो ती व्यवस्था कुणाच्या तरी दावणीला बांधलेली असते मग अशा वेळी पत्रकाराला प्रतिसाद मिळाला नाही तर येणारे वैफल्य कोणत्याच कसोटीवर मोजता येत नाही. आजची बदलती परिस्थिती पाहता पत्रकार आणि पत्रकारिता यांचे हे बदलते स्वरूप हा जगभरातच माध्यमाच्या नीतिमत्तेसंबंधांत दक्ष असणाऱ्यांसाठी चिंतेचाच विषय आहे.
"न खिंचो कमान को,न तलवार निकालो,जब तोप मुकाबील है.. तो "अखबार " निकालो..." हे शाश्वत सत्य आहे.
-अनिल पाटील,पेठवडगाव
9890875498
--------------------------------