प्रिन्स शिवाजी -दुर्दैवी राजकुमार

 प्रिन्स शिवाजी - दुर्दैवी राजकुमार

 प्रिन्स शिवाजी म्हणजे कोल्हापूरचे छ. रा. शाहू महाराजांचे द्वितीय चिरंजीव.ते अत्यंत साधे व जनमानसात वावरणारे होते. राजघराण्याची कोणतीही झूल त्यांच्या अंगावर किंवा वागण्यात आढळत  नव्हती.साधेपणा, ऋजुता आणि सुजनत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होते. ते उदारमतवादी होते.त्यांचा विवाह सासवड येथील शंकरराव जगताप यांच्या कन्या जमना उर्फ इंदुमतीदेवी यांच्याशी ६ जुन १९१७ रोजी झाला होता.

प्रिन्स शिवाजी -दुर्दैवी राजकुमार
प्रिन्स शिवाजी

प्रिन्स शिवाजी, कोल्हापूर
प्रिन्स शिवाजी
त्यांना शिकारीचा छंद होता.रानडुक्कर हे खाचखळगे ,नदी नाले ,ओढ्यातून भरधाव जाण्याची त्याची प्रवृत्ती असते त्यामुळे पळकाढण्यास हे जनावर अतिशय चपळ असते. तत्वतः शिकारकर्त्यालाही त्याच्या तोंडाची चपळता अंगी बाळगणे गरजेचे असते ते केवळ उत्कृष्ट अश्र्वरोहकच साध्य करू शकतो.अगदी तुडुंब जलप्रवाहातुनही हा प्राणी पैल तीरावर सहजरीत्या पोहचू शकतो . हा प्राणी अतिशय ताकदवान आणि लढवैया असून त्याची मुसंडी भल्याभल्यांना कापरे फोडते. 
रानडुक्कराला हाकारयाच्या साह्याने उठविले जाते.रानडुकरे जंगलाच्या पूर्णपणे बाहेर पडल्यावर व शिकारकर्त्याच्या आटोक्यात आल्यावर घोडेस्वार सर्व बाजूंनी त्याचा पाठलाग करत असत.कळपातील मोठा नरच मारायचा हा सर्वसाधारण नियम असे ,म्हणून कळपातील नर बाजूला फोडून त्याचाच पाठलाग करायचा प्रघात असे. रानडुकरा च्या  वाटा ठराविक पण अतिशय अवघड असतात .घोडेस्वार आपला पाठलाग करीत आहेत असे समजल्यावर हा प्राणी हवालदिल होऊन जंगलाकडे धाव घेतो.प्राणावर मुकणाऱ्या रानडुकराच्या शिकारीसाठी चपळता ,मनगटी बळ आणि घोड्याची गती आणि डुकराच्या वेगाचा तंतोतंत अंदाज घेऊन भरधाव पाळणाऱ्या दीड इंचाच्या कठीण कातडीत भाला घुसवावा लागे.हि शिकार अत्यंत धाडसाची आणि प्राणघातक असत. डुक्कर पळेल त्यापेक्षा वायुवेगाने घोडा चालऊन त्याच्या पुढे जाऊन ,डाव्या हातात लगाम पकडून ,उजव्या हातातल्या भाल्याच्या विष माखलेल्या टोकाने स्वतः च्या शक्तीने आणि डुकराच्या मुसंडीच्या वेगाचा फायदा घेऊन त्याच्या दागडा सारख्या अंगात भाला भोकसायचा,म्हणजे प्रसंगावधानाची आणि धाडसाची कमाल या शिकारीत असे. भाल्याचे पाच पाच ,सहा सहा फाळ अंगात घुसलेले असूनही डुक्कर वाऱ्यासारखे  पळतात.याखेरीज भाला मारण्याच्या ऐन क्षणाला रानडुक्कर जरा बाजूला सरले आणि स्वाराच्या आणि त्याच्या मधल्या आवश्यक त्या अंतरात वाढ झाली तर स्वाराचा तोल जाऊन भाला जमिनीत रोवला जायचा आणि त्यात मिळालेल्या धक्यामुळे स्वाराचा तोल जाण्याचा संभव असे. 
प्रिन्स शिवाजी - दुर्दैवी राजकुमार
प्रिन्स शिवाजी
छत्रपतींच्या घराण्यात शिकारीचा छंद प्रारंभा पासून पाहायला मिळतो.प्रिन्स शिवाजी यांना शिकारीची आवड होती. घोड्यावरून रानडुकराची शिकार करण्यात ते पटाईत होते. ते रायबाग, हुपरी, शिरोळ, अंबाघाट, राधानगरी, कुंभोज येथे शिकारीसाठी जात असत. 

या शिकारी मध्ये थेट डुकरास गोळी न घालता, धावत्या घोडयावरून भाल्याने डुकराची शिकार करत असत. त्यावेळी हातकणगले जवळ नेज, बाहुबली, कुभोंज परिसरात विपुल प्रमाणात जंगल होते. रानडुकराचाही वावर भरपुर होता. या रान डुकराची शिकार करणयाच्या हेतुने प्रिन्स शिवाजी आपल्या साथीदारासह १२ जून १९१८ रोजी नेज (ता. हातकणंगले) येथे शिकारीस गेले होते.

सोबत मातोश्री व चुलते बापुसाहेब महाराज  कागलकर हे होते. वेळ सकाळची होती. ते पानावर बसणार तोच एक रानडुक्कर उठले.प्रिन्स गडबडीने  पानावरून उठले. व हातात भाला घेउन घोडयावरून त्या  डुक्कराचा पाठलाग करू लागले.मागोमाग साथीदार होतेच. बरोबरच्या साथीदाराना मागे टाकुन महाराज पुढे गेले.धावत्या घोड्यावरून शिकार करत असताना रानडुकरावर दोन्ही हातानी भाला फेकत असता भाला सावजावर फेकला इतक्यात घोडा दगडाला ठेचकाळला. युवराज तोल जाऊन खाली पडले पण पाय रिकिबित अडकल्याने घोडयाबरोबर फरफरत गेल्याने डोके दगडावर आपटुन जखमी झाले. डोक्याला जबरदस्त मार लागला होता.पाय घोड्याच्या रिकिबीमध्ये अडकला गेल्याने ते फरफटत गेले घोडा भरधाव होता. तोल गेल्याने त्यांचे डोके खाली व पाय रिकिबित अडकल्याने सावरता आले नाही.घोडया बरोबर दगड धोंडयातुन ते फरफटत जाउ लागले. एेनवेळी साथीदारही काही करू शकले नाही. डोके फरफटत गेल्याने ते जबर जखमी झाले.लगेच त्यांना गाडीत घालुन हातकणगले मार्गे मिरजेला डाॅ वाॅनलेस यांचेकडे  नेले. पण त्यांचा रात्री मुत्यु झाला. ही घटना १८ जुन १९१८ साली घडली.

प्रिन्स शिवाजी - दुर्दैवी राजकुमार
ज्या  ठिकाणी ही दुर्दवी घटना घडली तेथे प्रिन्स शिवाजी यांची छत्री उभारण्यात आली. सध्या या ठिकाणी त्यांचे मंदिर आहे. आता या ठिकाणी गाव वसले असून त्या गावास "शिवपुरी"म्हणतात. हातकणगले-कुंभोज रोड़वर(बाहुबली- नेज फाटा) हे गाव आहे.

प्रिन्स शिवाजी, कोल्हापूर
नेज-कुंभोज रस्त्यावर शिवपुरी येथील प्रिन्स शिवाजी मंदिर
शिवपुरी येथे पिराजीराव  बापुसाहेब घाटगे कागलकर यांच्या देखरेखेखाली प्रिन्स शिवाजी यांचे मंदिर बांधणेत आले.मंदिर दगडी असुन मंदिरात "प्रिन्स शिवाजी" यांचा पांढरा शुभ्र अर्धपुतळा आहे.शेजारी त्यांच्या पत्नी "इंदुमती राणीसाहेब" यांचीही लहान समाधी आहे. 
प्रिन्स शिवाजी, कोल्हापूर
मंदिरातील प्रिन्स शिवाजी यांचा पुतळा

दुर्दैवी राजकुमार - प्रिन्स शिवाजी, कोल्हापूर
राणी इंदुमतीदेवी यांची समाधी

हे मंदिर बांधण्यासाठी १२००० रूपये खर्च आल्याची कोनशिला मंदिरात आहे.
प्रिन्स शिवाजी, कोल्हापूर
मंदिरातील कोनशिला
त्यांच्या स्मरणार्थ  रा. छ. शाहू महाराज यांनी कोल्हापूरात "प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस" या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात केली.

 मंदिराच्या दिवाबत्ती व देखरेखेसाठी करविर संस्थान छ. शाहु महाराज यांचेकडुन जमिनी इनाम देण्यात आल्या आहेत. 

सध्या येथील परिस्थिती दयनीय असुन परिसरात अनेकांनी अतिक्रमण केल्याचे दिसते. मंदिराची देखभाल नंदकुमार पाटील हे पाहतात.त्यांना मासिक फक्त २० रूपये पगार दिला जातो.तो अगरबत्ती साठी सुध्दा पुरत नाही. त्यांची तिसरी पिढी हे काम करत असुन आजही ते इमानेइतबारे तुटपुंज्या पगारावर निष्ठेने मंदिराची देखभाल करतात.कोल्हापूर येथील छत्रपती घराण्यातील कोणीही इकडे येत नसल्याचे मंदिराची दुरावस्था होत असुन पावसाळ्यात मंदिरात पाणी झिरपते. 

प्रिन्स शिवाजी यांच्या पत्नी श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांची (१९०६-१९७१) जीवनकथा फार करुण आहे. प्रिन्स शिवाजी नेज कुंभोजजवळ शिकारीप्रसंगी मृत्युमुखी पडले. त्यांना अवघे एक वर्षांचे वैवाहिक जीवन लाभले. शाहू महाराजांना या घटनेचा फार चटका बसला.  त्यांनी घरातील व बाहेरच्यांचा विरोध पत्करून इंदुमतीराणींना शिकविले. १९२५ साली त्या मॅट्रिक झाल्या. दिल्लीला मेडिकल कॉलेजला त्यांचा प्रवेश निश्चित झाला होता, परंतु त्यांना तिथे जाता आले नाही. त्यांनी कोल्हापूरात काही शिक्षणसंस्थांची उभारणी केली.

हे मंदिर पाहुन व त्या अल्पायुषी राजकुमाराची जीवनकहाणी एेकुन मन हेलावल्याशिवाय राहत नाही. 

-अनिल पाटील,पेठवडगाव

9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম