शिरोळ येथील छ. शिवाजी महाराज यांची गादी
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हे तालुक्याचे गांव.म्हटलं तर मोठे खेडेगाव नुकतीच या गावाला "नगरपरिषद" झाली आहे. यामुळे हे गाव आता चारी बाजुने चांगलेच हातपाय पसरू लागले आहे.शिरोळ मध्ये श्री दत्त सहकारी कारखाना पुर्वी गावाबाहेर होता.पण आता कारखान्यापर्यन्त गावविस्तार जाणवतो आहे.
शिरोळ येथील छ. शिवाजी महाराज यांची गादी |
गावात मध्यभागी श्री विठ्ठल मंदिर असुन मंदिराची बांधणी मजबुत दगडी वाडयासारखी आहे.मंदिरातील जुनी लाकडी कलाकुसर पाहण्यासारखी आहे. मंदिरामागे जुनी दगडी विहीर पाहण्यासारखी असुन तिची रचना व शैली तिचा वैभवकाळ जाणवतो. आता तिकडे दुर्लक्ष झाल्याने ती विहीर मोडकळीस आली आहे.
येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल मंदिर येथे दुसऱ्या मजल्यावर गॅलरी असुन तेथील ग्रिलवर "छ. शिवाजी महाराज" यांची प्रतिमा दिसते.पण रंगरंगोटी नसल्याने चटकन लक्ष जात नाही. बारकाईने पाहिल्यास छत्रपतींची अनोखी प्रतिमा दिसते. (फोटो झुम केल्यास दिसते)
झुम केल्यावर🖕 |
मंदिरापासून जवळच आणखी एक दुमजली इमारत असुन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी आहे.याचबरोबर छ. ताराराणी यांचीही गादी आहे.शिरोळ हे गाव पुर्वी विजापूर अखत्यारीत येत होते.नंतर सांगलीकर पटवर्धन, मग कुरूंदवाडकर पटवर्धन यांचेकडेही होते.हे लष्करी ठाणे असल्याने येथे लढाई झाल्याची म्हटले जाते.
या दोन्ही गादया महाराज साहेंबाच्या नित्य वापरातील होत्या.यामुळे या पवित्र गादीची दररोज पुजा केली जाते.गादी शेजारी दोन तोफा पाहावयास मिळतात.शिवप्रेमी येथील गादींचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात.
छ. शिवाजी महाराज यांची आणखि एक गादी कोल्हापूर येथे भवानी मंडप मधील भवानी मंदिर येथे आहे.तेथेही दररोज पुजा केली जाते.त्याची व्यवस्था "छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट" मार्फत केली जाते.
शिरोळ येथील व्यवस्था नेमुन दिलेल्या मानकरी कडुन केली जाते.शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज आल्याची इतिहासात नोंद नसली तरी ती गादी या गावात कधी व केव्हा आली हे सांगता येत नाही. पण कोल्हापूर संबंधित एतिहासिक कागदपत्रात १८८५ मध्ये शिरोळ येथील गादीचा उल्लेख सापडतो. तसेच १९३० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे पुत्र छ. राजाराम महाराज यांनी या इमारतीचा जिर्णोद्धार केला असल्याचा दाखला मिळतो. या गादी बाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
शिरोळ मध्ये अजुनही "विजयादशमी" दसरा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावेळी येथील तोफा उडवल्या जातात.