स्मशानातील हॉटेल
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे एक अनोखे रेस्टॉरंट असुन त्याचे नाव लकी रेस्टॉरंट असे आहे. हे रेस्टॉरंट स्मशानात आहे.खुप वर्षापुर्वी हे कब्रस्थान होते ,आता त्याचा वापर होत नसला तरी येथे दफन करण्यात आलेल्या कबरींच्या आजूबाजूलाच टेबल आणि खुर्च्या आहेत.येथे येणारे ग्राहक अवतीभोवती असणाऱ्या कबरीसोबतच चहा नाष्टयाचा आस्वाद घेतात.
१९५० च्या सुमारास या ठिकाणी के. एच. मोहमद यांनी लहानशी चहा टपरी सुरू केली होती. हळुहळू त्यांनी टपरीभोवती टेबल खुर्ची टाकुन व्यवसाय सुरू केला.लोकांनीपण प्रतिसाद दिला व येथे चहा नाष्टयासाठी लोक गर्दी करू लागले. नंतर मोहमद यांनी ही जागा कृष्णन् कुट्टी नायर यांना विकली.
येथे असणाऱ्या कबरीबाबत लोंकाना काही वाटत नाही.येथे एकुण २६ कबरी असुन दररोज सकाळी कबरीला फुले हार घालुन पुजा केली जाते.
अनेक लोकांना हे रेस्टॉरंट नावाप्रमाणेच लकी वाटते व येथे आल्यानंतर त्यांची कामे होतात अशी श्रध्दा असल्याने खुप लोक या हॉटेल मध्ये येऊन चहा नाष्टयाचा आस्वाद घेतात.
काहीना येथे आल्यामुळे मानसिक शांतता मिळते म्हणुन अनेकजण रात्री उशीरा येथे येतात.हे हॉटेल सकाळी ८ ते रात्री १२ पर्यन्त चालू असते.
या हॉटेलला प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन यांनी भेट दिली होती.व एक चित्र दिले होते ते हॉटेल मालकांनी तेथे लावले आहे.
तुम्ही कधी अहमदाबादला गेलात तर या लकी रेस्टॉरंटला जाऊन चहा नाष्टयाचा आस्वाद घ्या.