विनोदी गावाची नावे

विनोदी गावाची नावे 

प्रत्येक गावाचे नाव हे त्याची आोळख असते. गावाला नाव नसेल तर त्याला आोळखणार तर कसे? पण काही गावाची नावे ही खुप विचित्र,विनोदी असतात.काही नावे वाचली तर हसु येते किंवा विचित्र वाटते. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या अनेक भागात ही नावे आपली आोळख टिकवुन आहेत. गावांची नावे अनेक प्रकारची आहेत  काही गावांची नावे ही खूप गंमतीशीर, विचित्र वाटतील अशी आहेत. जसे की  वांगी, भाकरी, विहीर, कन्नड, साखर, गुळपोळी,  सावली, सापे, पावणे, ढोणे, अशी अनेक गंमतीशीर गावांची नावे आहेत.

विनोदी गावाची नावे

वानगीदाखल ही नावे पहा, दिवा, दहिगाव, झाडघर, आंबेघर,

 सांगली जिल्ह्यात तर दुधाच्या पदार्थावरून दुधारी, दहयारी, ताकारी, तुपारी ही गावे आहेत.तर झाडावरून गावाची नावे पहा - पिंपळाची झाडे असणारे पिंपळगाव, करंजी असणारे करंजफेण, वडगाव (वड), म्हाळुंगे (म्हाळुंग), वेखंडवाडी (वेखंड), बेलेवाडी (बेल), हळदी (हळद), कवठेगुलंद (कवठे), शेंद्री (शेंद्री), फणसवाडी (फणस), रुई (रुई), आल्याचीवाडी (आले), पळसंबे (पळस),

 महाराष्ट्रातील गंमतीशीर गावांची नावे

भंडारा जिल्यातील गावे:-- लोभी, टांग, पाहुनी, चांदी, सोनी, ताई, पाऊनगाव, सासरा.

गोंदिया जिल्यातील गावे :-- पुजारी टोला,उष्ण टोला, धोबी टोला, बाजार टोला, महारी टोला, महाजन टोला, भुसारी टोला, टेकडी टोला, डोंगरी टोला, बोरी टोला, चिंच टोला,चुतिया.

चंद्रपूर जिल्यातील गावे :-- धाबा, सावली, टिटवी, मंगी.

गडचिरोली जिल्यातील गावे :-- पेकिंग कसा, घोट, परकी, लगाम, झेंडा, लंका वेन, रमेश गुडम, बिडी.

ठाणे जिल्यातील गावे:--अननस.कोन, गाणे, फिरंगपाडा, भोकरी, वळ, हिवाळीआवळे, चाविंद्रे, चाणे, डुंगे, डोहळे, पाये, 

रायगड जिल्यातील गावे :--रामराज, सहान.

सिंधुदुर्ग जिल्यातील गावे:--पुरळ, मागवली,आई ,भांडकुली, . या शिवाय कोकणात कोण, गाणे, नाचणे, डेट नावाची गावे आहेत.

जळगाव जिल्यातील गावे:-- टिटवी,चोरगाव,पाल,लोणी,वाकडी,उंदिरखेडा, वेळ, कका, लंगडा आंबा,उंदीरखेड.

पालघर जिल्यातील गावे - आंबटपाडा, आपटी, केळघर, गांजे, गुंडाळी, दांडा

धुळे जिल्यातील गावे:--लकड्या हनुमान, वारूळ, विसरणे, भांडणे, धाडणे, खट्याळ, कुत्तरखांब, हट्टी,बुडकी विहीर.

नंदुरबार जिल्यातील गावे-- काठी, वैरी, कात्री, शहाणे, लंगडी भवानी, खोल विहीर,खेकडा.

नासिक जिल्यातील गावे :--भेलपुरी, रगतपुरी, इगतपुरी.लुल्ले-गरबडे.,नागडे

अहमदनगर जिल्यातील गावे:--दाढ, कृष्णधवल, गाभणवाडी, खर्डा,धांदरफळ.

पुणे जिल्यातील गावे:--नवलाख उंबरे, चादर, साखर,तक्रारवाडी, विहीर, लोणी, मांजरी ,घोळ, राहू, अंथूरणें, नाव्ही,राख.

सातारा जिल्यातील गावे:--शेणवडी, वनवास माची,मढे, आंधळी, अटक,

कोल्हापूर जिल्यातील गावे :--लोळणे, साजणी, इंगळी,डुक्करवाडी, नागवे,

सोलापूर जिल्यातील गावे:--कुत्रेवाडी, आगलावेवाडी,धोत्री, वांगी बार्शी - गुळपोळी , इंचगाव,

औरंगाबाद जिल्यातील गावे:--लिहा, नक्षत्रवाडी,कन्नड  

जालना जिल्यातील गावे:--नळ विहिरी,चिकनगाव, माहेर भायगाव,माहेर जवळ.

परभणी जिल्यातील गावे:--डाकू पिंपरी,सोस, कुऱ्हाडी ,वरणगाव, पुरणगाव ,दहिगाव ,तुपगाव ,दहिवडी

हिंगोली जिल्यातील गावे:--पिंपळाचोऱ्या, इंजनगाव,वरुड वक्रपान

.नागपूर जिल्यातील गावे  : सुंदर, नक्षी, खिडकी, चिंचकाढा, सोनाली ,सातनवरी

नांदेड जिल्यातील गावे:--हुंडा, सुजलेगाव.

लातूर जिल्यातील गावे:--कोपरा, तोंडचिरा,कोपरा, वरवंटी, जाऊ,नणंद, काळमाथा.

उस्मानाबाद जिल्यातील गावे:-- इडापीडा,ताकविकि,.हगलूर, गोंधळवाडी.

बीड जिल्यातील गावे:-- सांडस, पुडी, काडी.

अकोला जिल्यातील गावे:-- हात, कोळसा, हातरुन, कट्यार, दहातोंडया, जमुना.

वाशीम जिल्यातील गावे:--कोतवाल, दिल्ली, जयपूर, हरला.

अमरावती जिल्यातील गावे:-- बैलमारखेडा,भातकुली , ऐकताई, थुगाव, दाढी, तेलपाणी.

यवतमाळ जिल्यातील गावे:-- गाडी.

वर्धा जिल्यातील गावे:-- सावली, फुकटा,गारपीट, जुनापाणी.






.


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম