पावशा पक्षी

 पावशा पक्षी



Facebook link https://parg.co/UDAN

पावसाळा सुरू होण्यापूर्वी  शेतकरयाचे कान हा आवाज ऐकायला  आसुसले असतात.

पावसाच्या आगमनाची वर्दी देणारा  पावशा! पक्षी. पावसाचा शुभसंदेश घेऊन येणारा पावश्या पक्षी जुन महिन्यात खेडोपाडी  विविध भागांत शीळ घालताना दिसतो. पावशाच्या मंजुळ शीळेने शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांची कामाची लगबग वाढलेली असते. शेतकामांना आता वेग आलेला असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना 'पेरते व्हा, पेरते व्हा' असा संदेश पावशा पक्षी देत असतो.कबुतराएवढा असणार्‍या ‘कॉमन हॉक कुकू’या पक्ष्याचे पावसाळ्याशी नाते जोडले आहे म्हणून त्याला शेतकरी ‘पावशा’असं म्हणतात. 

पावशा हा पक्षी केवळ पावसाचे थेंबच तोंडात झेलतो. त्यावर तो आपली तहान भागवतो. नर पावशापेक्षा मादीचा आवाज थोडा कर्कश असतो. रात्रीही तो आवाज काढत असतो. पावसाळ्याच्या तोंडावर हा पक्षा दृष्टीस पडतो. पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज वर्तविण्याची पुरेशी साधने नव्हती. त्यावेळी शेतकरी निसर्गातील संकेतांवर किंवा पशु-पक्षांच्या हालचालींवर अवलंबून राहत असत. आपल्या मंजूळ आवाजाने पिहूँ पिहूँ असा आवाज काढतो. ‘पेरते व्हा, पेरते व्हा’असे त्याचे आवाहन हा पक्षी शेतकर्‍यांना करतो असा समज महाराष्ट्रामध्ये आहे. 

   पावश्या म्हणतो "पेरते व्हा पेरते व्हा"किती सुंदर रचना केली आहे भगवंताने.

अशा या मंजुळ पक्षाचा आवाज ऐकायचा असेल तर खालील व्हिडिओ पहा. 👇

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম