दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

 दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल? 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च -२०२४ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत. 
२७ मे रोजी दुपारी १ वाजता निकाल जाहीर होईल. 
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल -

🌐 या वेबसाईटवर पाहा निकाल :

👉 https://mahresult.nic.in

👉 http://sscresult.mkcl.org

👉https://sscresult.mahahsscboard.in

वरील पैकी कोणत्याही लिंकवर टच करा कि तुम्ही अधिकृत साइटवर पोहचाल. 

कसा पाहाल निकाल? 

स्टेप 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या. 

स्टेप 2 : होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 

स्टेप 3 : तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नांव नोंदवा.

स्टेप 4 : स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा. 

स्टेप 5 : निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट आऊट घ्या. 

ठीक १ वाजता निकाल जाहीर होईल. 

एसएमएसवर चेक करा दहावीचा निकाल

एसएमएस (SMS) वर निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम फोनमधील मेसेज बॉक्स ओपन करा.
त्यानंतर MHSSC (स्पेस द्या) सीट नंबर किंवा रोल नंबर टाईप करा.
 मग हा टाईप केलेला मेसेज 57766 या क्रमांकावर सेंड करा.
यानंतर तुम्हाला मेसेजवर तुमचा निकाल पाहता येईल.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম