म्हणुन मादी मांजराला पण मिशा असतात

म्हणुन मादी मांजराला पण मिशा असतात

 आपण घरात मांजर पाळतो कधी त्याच्याकडे बारकाईने पाहिले आहे का? की मांजराला भरदार मिशा असतात.फक्त नरालाच नव्हे तर मादी मांजराला देखील मिशा असतात. मांजराला मिशा या त्यांचा तोंडाच्या दोन्ही बाजूंना,हनुवटीवर,डोळ्यावर कानात, पुढील पंजाच्या अंगठ्यापाशी असतात.या मिशांचा उपयोग मांजराला खुप होतो.प्राणीशास्त्रामध्ये त्यांना "vibrissae" म्हटले आहे.

म्हणुन मादी मांजराला पण मिशा असतात
मांजराच्या मिशा बाकी केसंपेक्षा जाड असतात आणि त्यांचं मूळ त्वचेत बरच खोलवर असते.या मुळाशी बऱ्याच रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू असतात.त्यामुळे या मिशा अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे त्या हवेची छोटीशी हालचाल सुद्धा टिपू शकतात.मांजराच्या मिशांना हवेतील दाब चटकन  ओळखता येत असल्यामुळें,सावजाची शिकार करत असलेल्या प्राण्याची जागा व हालचाल मांजर अचूक समजू शकतात..मांजरीच्या मिशा अतिशय संवेदनशील असतात. मिशामुळे हवेतील अगदी किंचित हालचालदेखील त्यांना जाणवते.आणि जवळपासच्या वस्तु अगदी अंधारातही मांजरी ओळखू शकतात.

एखाद्या छोट्या जागेत आपण जाऊ शकू का? याचा निश्चित अंदाज मांजराला मिशा मुळे येतो.म्हणजे आपण एखाद्या बोळात मोटरसायकलने जाताना त्याचे हॅन्डल जाते का, याचा जसा अंदाज घेतो तसाच अंदाज मांजरे घेतात.मिशाच्यां स्पर्शातून छोट्या जागेच्या रुंदीचा मांजराला एकदम अचूक अंदाज येतो.थोडक्यात मिशामुळे "बॅलन्स"साधता येतो.सावजाची शिकार करतेवेळी मांजर या मिशा एकत्र मिळून मांजराचा चेहर्या भोवती एक परीघ बनवतात की  त्या परिघामध्ये होणारी छोट्यात छोटी हालचाल पण मांजराला व्यवस्थित समजते. एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका या विश्वकोशात असं म्हटलं आहे, की मांजरीच्या मिशांचा त्यांना किती फायदा होतो हे अजून पूर्णपणे समजलेलं नाही. पण जर का मांजराच्या मिशा कापल्या तर, त्या पुन्हा येईपर्यंत मांजराला एक प्रकारे अपंगत्व येते.

म्हणुन मादी मांजराला पण मिशा असतात
शास्त्रज्ज्ञदेखील मांजरीच्या मिशांसारखं कार्य करणारे रोबोट्स तयार करत आहेत. या रोबोट्समध्ये संवेदक असतील ज्यांमुळं ते अडथळे असतानाही चालू शकतील. आधुनिक रोबोट्समध्ये तसंच इतर काही उपकरणांमध्ये मांजरीच्या मिशांप्रमाणं कार्य करणाऱ्या संवेदकांचा भविष्यात आणखी जास्त उपयोग केला जाईल, असं बर्क्ले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील अली जावी नावाच्या एका प्राध्यापकानं म्हटलं आहे.
जर मांजर रागावले तर मिशा गालाला लागून असतात,मिशा पुढे आलेल्या असतील तेव्हा ते खेळायच्या मुड मध्ये,व शिकारीचा मूड मध्ये असते. 

कोरा लिंक: http://bit.ly/3pfkbwZ anil patil यांनी दिलेले उत्तर

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম