ब्लॉगसाइट काय आहे ?
ब्लॉगिंग हा स्वत: ला व्यक्त करण्याचा आणि संप्रेषण करण्याचा, इतरांशी माहिती सामायिक करण्याचा चांगला मार्ग आहे. जेव्हा आपण लिहितो,मग ती कथा असेल, कविता असेल ते लिहिताना आपल्या मनात शब्द येऊ लागतात आणि यामुळे आपल्या आत्मविश्वास वाढतो जो आपल्या बोलण्याच्या कौशल्यांमध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित होतो.
वेगवेगळ्या विषयावर ब्लॉग च्या माध्यमाने सतत लिहत राहणे आणि ते प्रकाशित करणे यालाच ब्लॉगिंग असे म्हणतात.
तुम्हाला ज्या विषयाचे ज्ञान आहे, तुमची आवड, छंद, तुमची रुची असलेल्या कोणताही क्षेत्र हा तुमच्या ब्लॉगसाठी एक उत्तम विषय असु शकतो
ब्लॉग तुम्ही कोणत्याही विषयावर लिहु शकता, व्यवसाय, तंत्रज्ञान, प्रवास. इ.
तुम्हाला जर बातमीशी संबधित साइट बनवायची असेल तर तुम्ही ब्लॅागरवर तुमचे बातमीपत्र सादर करू शकता.
ब्लॉग एक अशी ऑनलाईन जागा आहे जिथे आपण आपल्या विचारांना कोणत्याही भाषेतील लेख आणि चित्रांच्या माध्यमाने इंटरनेटवर प्रकाशित करू शकतो. ब्लॉग वर कोणत्याही प्रकारचा लेख लिहिला जाऊ शकतो. ब्लॉग वर तुम्ही वैयक्तिक जीवनातील प्रसंग, उपयुक्त माहिती तसेच लोकांना ज्या गोष्टी वाचण्यात आवड असेल त्या गोष्टी तुम्ही लिहू शकता.
आणि ही लिहिलेली माहिती तुम्ही सोशल मिडीयावर शेअर करू शकता.
तुमची लिखाणाची पध्दत व तुम्ही देत असणारी माहिती विशेष असेल तर गुगलपण याची दखल घेते व तुमच्या नावासह प्रसिद्धी देते.
म्हणजे तुम्ही लिहिलेली माहिती जर फक्त तुमचीच असेल तर, कोणीही गुगलवर सर्च केल्यास तेथे त्याला तुमची साइट दिसते.
ब्लॉगरवर ब्लॉग लिहिणे खूप सोपे आहे कारण ब्लॉग लिहिण्यासाठी कोणतीही प्रोग्रामिंग भाषा माहित असणे आवश्यक नाही म्हणूनच बहुतेक ब्लॉगर्सना ते आवडते. वेबसाईडचा इंटरफेस अगदी सोपा आहे आणि काही निवडक पर्यायांद्वारे अगदी कमी वेळेमध्ये येथे प्रकाशित करू शकतो. म्हणूनच जर तुम्ही ब्लॉगिंग सुरवात करणार असाल तर ब्लॉगर सेवेचा अवश्य वापर करा.