ज्या देशात सुर्य मावळत नाही,तेथे रोजे कधी सोडले जात असतात?

ज्या देशात सुर्य मावळत नाही,तेथे रोजे कधी सोडले जात असतात?            

फेसबुक लिंक http://bit.ly/3eJjC9m
मुस्लिम लोक रमजान महिन्यात रोजे ठेवतात म्हणजे उपवास धरतात.यास रमजान’चा अर्थात ‘बरकती’चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्वभाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना.संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, पाच वेळेचा नियमित नमाज, कुराणपठण अन् अल्लाहचे स्मरण,चिंतन करायचे असते.
ज्या देशात सुर्य मावळत नाही,तेथे रोजे कधी सोडले जात असतात?

या तीस दिवसात उपासधारकांच्या तनमनाची शुद्धी होते. म्हणून इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्साधारण महत्त्व देण्यात  आले आहे.रोजा असताना पूर्ण दिवस त्यांना उपवास धरावा लागतो. सूर्य मावळत नाही तोवर हा रोजा असतो.सुर्य मावळल्यानंतर त्या दिवसाचा रोजा समाप्त होतो.

पण जिथे सूर्य मावळतच नाही? तिथे हे लोक रोजा कसे ठेवत असतील?              

रमजान महिन्यात सूर्योदया पासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही खाल्लं जात नाही, पाणीही पिलं जात नाही. सूर्य निघाल्यानंतर पहिले सहरी होते, म्हणजे सकाळच्या अजानपूर्वी सहरी खाऊ शकतात. सहरीनंतर सूर्यास्तापर्यंत काहीही खाणे-पिलं जात नाही. सायंकाळी नमाज पठनानंतर इफ्तारी असते. यादरम्यान लोक अल्लाहची इबादत करतात.सर्वच देशात रोजाची वेळ ही सूर्योदय आणि सूर्यास्त ह्यावर अवलंबून असते.त्यामुळे ती सगळीकडे वेगवेगळी असते.पण काही देशात सुर्य मावळत नाही तेथे किंवा अल्पकाळ सुर्य असतो तेथे म्हणजे ते कधी सहरी खाणार आणि कधी इफ्तार करणार कधी नमाजपठण करणार, कधी तरविह करणार?

फिनलंड आणि स्वीडन हे देखील असेच देश आहेत जिथे सूर्य का खूप कमी वेळेकरिता मावळतो. फिनलंड येथे राहणाऱ्या मुस्लिमांची संख्या इथल्या लोकसंख्येच्या ३ टक्के आहे. इथे वर्षातून ३६५ दिवसांपैकी उन्हाळ्यात ७३ दिवस सूर्य राहतो. तर स्वीडन येथे ६ लाख मुस्लीम वास्तव्यास आहेत.इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार नॉर्दन फिनलंडमध्ये उन्हाळ्याच्या काळात सूर्य केवळ ५५ मिनिटांसाठी मावळतो. येथे दिवससकाळी १:३५ ला सुरु होतो तर १२:४० ला संपतो. म्हणजे येथे राहणाऱ्या मुस्लिमांना फक्त ५५ मिनिटे मिळतात. ज्यात त्यांना जे काही खायचे प्यायचे असेलं ते करू शकतात. म्हणजेच त्यांना २३ तास ५ मिनिटांपर्यंत रोजा ठेवावा लागतो. विचार करा तिथे राहणाऱ्या लोकांना किती ह्याचा किती त्रास होत असेल.जिथे सूर्य मावळतच नाही तिथे लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरून आपली कामे पूर्ण करतात. काही ठिकाणी वेळेनुसार रोजा ठेवला जातो. जे मुस्लीम लैपलंदडमध्ये राहतात त्यापैकी अनेकजण हे मिडिल इस्टच्या टाईम टेबलला फॉलो करतात.एकाच देशात देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी रोजा पाळला जातो.व पवित्र रमजान महिन्याची पुर्तता केली जाते.सेहरी आणि इफ्तार बाबत भारतात सुध्दा मुंबई व दिल्ली च्या वेळेत दोन ते चार मिनिटाचा फरक असतो तो अॅडजस्ट केला जातो.

*●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম