उन्हाळी लागणे आणि लघवीचा त्रास

 उन्हाळी लागणे आणि लघवीचा त्रास ! 


फेसबुक लिंक http://bit.ly/2O5eBNQ
आपल्या घरातल्या मोरीची आणि शरीरातल्या मूत्रसंस्थेची तुलना करून पहा. मोरी धुण्यासाठी फिनेल वगैरे सर्व गोष्टी वापरल्या पण मूळ पाणीच उपलब्ध नसेल तर?..अर्थातच ती स्वच्छ होणारच नाही. तसेच काहीसे आपल्या मूत्रसंस्थेचे आहे. उन्हाळ्यात घाम अधिक येतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे या दिवसात लघवीत क्षारांचे प्रमाण अधिक असते.

उन्हाळी लागणे आणि लघवीचा त्रास !

त्यामुळे मूत्रसंस्थेच्या तक्रारींचे प्राथमिक कारण शरीरात पाणी कमी जाणे हे असते.’उन्हाळ्यात मुतखडय़ाचा त्रास अनेकांना उद्भवतो. लघवीतले क्षारांचे घटक, खर निघून जाण्यासाठी पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मूत्रनलिकेत खडा अडकून पोट दुखण्याचा त्रास होऊ शकतो. २५ ते ५० वयोगटातल्या पुरूषांमध्ये प्रॉस्टेट ग्रंथींना सूज येऊन लघवीला आग आणि जळजळ होण्याची तक्रार दिसते. स्त्रियांमध्ये लघवीला आग होण्याबरोबरच ठणका लागणे, कळ येणे, क्वचित लघवीतून रक्त जाणे अशी लक्षणेही दिसू शकतात. याला बोली भाषेत ‘उन्हाळी लागणे’ असे म्हणतात.
उन्हाळीच्या विकारात मूत्रमार्ग रचनेत कोणताही दोष नसतो. स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाची लांबी कमी असते. त्याचबरोबर मूत्रमार्ग आणि जननमार्ग एकाच ठिकाणी उघडतात. गुदमार्गातील जिवाणू जननमार्गात प्रवेश करत असतात. तिथून हे जिवाणू मूत्रमार्गात जातात आणि मूत्रदाह निर्माण करतात. ज्या रुग्णात स्थानिक प्रतिबंधक शक्ती कमी असते, त्यांना हा त्रास होतो. काही रुग्णांमध्ये जननमार्गाचे काही आजार असतील, तर त्यामुळेही उन्हाळीचा त्रास होऊ शकतो.
त्याबरोबर मूत्रमार्गाचा संसर्गही होऊ शकतो. लहान मुलांनाही ‘शू’च्या जागी आग होण्याचा त्रास होतो.’उन्हाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती थोडीशी मंद झालेली असल्यामुळे भूक कमी होते. खाण्यात काही अबरचबर आले की पोट बिघडते. पोट बिघडले की लघवीच्या तक्रारीही वाढतात. आतडय़ात ई- कोलाय नावाचे जीवाणू असतात. पोट बिघडते तेव्हा हे जीवाणू उपद्रवी बनतात. या जीवाणूंनी उत्सर्जित केलेल्या विषारी द्रव्यांचा मूत्रसंस्थेवरही परिणाम होतो. मूत्रमार्गाला सूज आलेली असली तर त्या ठिकाणी जीवाणूंना वाढण्याचीसंधीच मिळते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासाठीही ते कारणीभूत ठरतात.
प्रतिबंधासाठी=  पाणी पिणे अर्थातच गरजेचे. काहींना घाम अधिक येतो तर काहींना कमी.
पण सर्वसाधारणपणे चोवीस तासांत शरीरात तयार होणाऱ्या मूत्राचे प्रमाण कमीत कमी दोन ते अडीच लिटर असावे या हिशेबाने द्रवपदार्थ घ्यावेत. माठातले वाळ्याचे पाणी प्यायले तरी चांगले.,शहाळ्याचे पाणी उत्तम,नीरा देखील लघवी वाढवणारी असते परंतु ती शुद्ध असावी.,कलिंगडाचा रस.

डॉक्टरांकडे केव्हा जावे

लघवीला होणारा त्रास अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवलेले चांगले. उन्हाळी लागल्यावर काहींना लघवीतून रक्त जाण्यासारखे लक्षण दिसत असले तरी लघवीतून रक्त जाण्याची इतर कारणेही असू शकतात. त्रास नेमका कशामुळे होतो आहे याबद्दलची शंका दूर करण्यासाठी डॉक्टरांकडे जावे. मूत्रमार्गाचा संसर्ग असल्यास त्यावर वेळीच उपचार होऊ शकतील.
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম