मुत्युनंतर संजय दत्तच्या नावावर संपत्ती करणारी चाहती : निशा पाटील

 मुत्युनंतर संजय दत्तच्या नावावर  संपत्ती करणारी चाहती : निशा पाटील


 हिंदी चित्रपटसृष्टीत संजय दत्त हा यशस्वी अभिनेता आहे. त्याने आजवर १५० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे.याशिवाय त्याला १८ पेक्षा जास्त पुरस्कारही मिळाले आहेत.संजय दत्तच्या आयुष्यावर ‘संजू’ नावाचा चित्रपट आला. रणबीर कपूरने या चित्रपटात संजय दत्तचा रोल साकारलेला होता. बॉक्स ऑफिसवर सुद्धा हा चित्रपट यशस्वी ठरला होता.संजय दत्तचे अनेक फॅन असुन निशा पाटील नावाची एक फॅन मुंबईत राहत होती  २०१८ मध्ये तिचे निधन झाल्यावर संजय दत्तला मुंबई पोलिसांचा फोन आला.

मुत्युनंतर संजय दत्तच्या नावावर  संपत्ती करणारी चाहती : निशा पाटील

पोलिसांनी सांगितलं की, निशा पाटील म्हणून एका महिलेचा मृत्यू झालाअसुन मृत्यूपूर्वी तिने तिची सर्व संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली आहे.हे एेकताच संजय चक्रावला.त्याने प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात जाऊन खातरजमा केली हे खरे होते की निशा पाटील या महिलेने मुत्युपुर्वी आपली सर्व संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली होती. 

कोण होती निशा पाटील

निशा पाटील ही मुंबईत मलबार हिल येथे राहत होती तिला वडिलोपार्जित बरीच संपत्ती मिळाली होती तिचा संजय दत्तकडे आोढा होता.संजयचा प्रत्येक चित्रपट ती पाहत असे.पण निशा सामान्य स्त्री असल्याने संजयची भेट घेऊ शकत नव्हती.निशा पाटील यांनी बँकेला पत्र लिहुन आपल्या मुत्यु पश्चयात आपली सर्व संपत्ती संजय दत्त याला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. अभिनेता संजय दत्तची चाहती असलेल्या असलेल्या निशा पाटील बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांसह एकूण ७२ कोटी रुपये संजयच्या नावे केले होते. १५ जानेवारी २०१८ रोजी दीर्घ आजाराने तिचा मृत्यू झाला.

संजय दत्तला हे सर्व समजल्यावर त्याने मुंबईतील बॅंक ऑफ बडोदा शाखा वाळकेश्वर येथे संपर्क साधुन ती सर्व संपत्ती पाटील कुटुंबाकडेच सोपवली जावी अशी व्यवस्था केली.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম