तुम्हाला कोणी सांगितल,की संघात मुस्लिम नाहीत म्हणुन


 तुम्हाला कोणी सांगितल,की संघात मुस्लिम नाहीत म्हणुन 


💥 आहेत,  संघात पण मुस्लिम आहेत.

__________________________

Facebook link http://bit.ly/3nAzxcK
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटले की प्रत्येकाच्या मनात जी प्रतिमा उमटते ती म्हणजे संघ हा कट्टर हिंदूत्ववादी संघटना आहे अशी. पण याला छेद देणारा हा लेख वाचताच तुम्हाला समजेल की संघ फक्त हिंदुपुरता मर्यादित नाही.आजपर्यंत टीकाकारांनी रंगवलेला संघ हा कट्टर प्रतिमेचा होता. भारतातच या संघटनेविषयी गैरसमज निर्माण होण्याचे कारण म्हणजे राजकारण!
एखाद्याला बदनाम करायचे म्हटले की,त्याविरुद्ध काहीही गरळ पसरवली जाते.संघाच्या बाबतीत हेच घडत आहे.ब्राम्हणांची संघटना म्हणुन हिणवलेल्या संघात मुस्लिम पण आहेत हे सांगितल्यावर चटकन विश्वास बसणार नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ… राष्ट्र या शब्दातुन कुठेही कुठल्या धर्माचा उल्लेख होत नाही किंवा स्वयंसेवक या शब्दतूनही नाही होत. मग संघ नक्की कुणाचा???
 हिंदू या शब्दाची कल्पना  ही संघाने कुठल्याही उपासना पद्धत्तीशी कधीच जोडली नाही ! जो या देशाला , भूमीला पितृस्थानी , मातृस्थानी मानतो आणि त्यासाठी समर्पित होण्यासाठी कटिबद्ध होतो तो सारा हिंदूच आहे अशी संघाची धारणा आहे . अर्थात या कल्पनेतील हिंदू हा विश्वातील कुठल्याही भूभागात राहत असला तरी मनाने , अंतरंगाने येथील संस्कृती आणि परंपरेशी जोडलेला राहतो
तो सर्वांचा आहे,संघात सर्व धर्माचे,जातीचे लोक आहेत.पण संघ प्रचार करण्यात नाही तर कार्य करण्यात आघाडीवर असल्याने या बाबी ऊघड करत नाही,त्याची त्याला गरज नाही.संघात मुस्लिम संख्या थोडी असली तरी बुध्दिवादी आहे.संघात ठळक नावे असलेले मुस्लिम पाहुया.

तुम्हाला कोणी सांगितल,की संघात मुस्लिम नाहीत म्हणुन

झाकीर मन्सुरी, उद्योजक मध्यप्रदेश

झाकीर यांच्या मातोश्री बडवणी नगरपालिकेत भाजपच्या नगरसेविका होत्या. ते लहानपणापासूनच शाखेत जात. ते संघाचे जिल्हाप्रमुख आहेत.

शिया पंथीय असलेले मन्सुरी रोज नित्यनियमाने नमाज अदा करतात. भारतीयांनी शाकाहार अवलंबावा असं त्याचं मत आहे. राम मंदिर व समान नागरी कायदा या साठी ते आग्रही आहेत.

फैज खान, माजी राज्यशास्त्र प्राध्यापक, रायपूर

ब्रह्मचारी असलेल्या फैज खान यांनी पूर्णवेळ गोरक्षक म्हणून काम करण्यासाठी आपल्या प्राध्यापकीचा राजीनामा दिला.ते राष्ट्रीय गोरक्षक प्रकोष्ट चे संस्थापक आहेत. गाईचे महत्व आपल्या अवधी आणि संस्कृत सुभाषितांतून ते सादर करतात. आपल्या ३ ते ९ दिवसांच्या गौकथा कार्यक्रमात ते पुराणातील कथा गीते गातात आणि संघविचारांचा प्रचार ही देशभर करतात.२०१८ मध्ये लडाख ते कन्याकुमारी अशी पदयात्रासुद्धा त्यांनी गौरक्षणासाठी केली होती.
आणि हो भाविक मुसलमानांप्रमाणे ते रमजान ही पाळतात. मुस्लिम समुदायाला खोटी भीती घालन्याचा कार्यक्रम काही मीडिया मुद्दाम करतो आहे याची त्यांना खात्री आहे.

तुम्हाला कोणी सांगितल,की संघात मुस्लिम नाहीत म्हणुन

डॉ गुलरेज शेख, उज्जैन
डॉ. शेख हे राष्ट्रीय मुस्लिम मंच या RSS च्या संघटनेचे उज्जैन शहराचे प्रमुख आहेत. यांचे वडील, पत्नी, दोन भाऊ हे ही डॉक्टर आहेत. त्यांचे वडीलही संघाच्या वनवासी कल्याण आश्रम या संघटनेत होते.
बरं संघात आल्यामुळे त्यांनी इस्लामला सोडचिट्ठी दिली का? नाही.. डॉ रमजान पाळतात आणि रोजे शाखेत सोडतात. त्यांनी बऱ्याच मुसलमान तरुणांना संघात आणलं आहे.त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय मुसलमानांचं नुकसान तुष्टीकरणाच्या राजकारणाने झालं आहे.

शबाना आझमी, शिक्षिका, लखनौ. (राष्ट्रीय मुस्लिम मंच, अवध)

तीन चार वर्षांपूर्वी लखनौ येथे संघाच्या महिराज सिंग यांच एक व्याख्यान होतं. त्यात ते पैगंबरांच्या तत्वज्ञानाविषयी माहिती सांगत होते. त्यांचं ते प्रभावी भाषण, सर्वसामान्य मुस्लिम किंवा मौलवी यांच्यापेक्षा महिराज यांना इस्लामविषयी असलेली माहिती श्रद्धाळू मुस्लिम असलेल्या शबाना यांना भावली व त्या संघाकडे आकर्षित झाल्या.
तुम्हाला कोणी सांगितल,की संघात मुस्लिम नाहीत म्हणुन

एके दिवशी लखनौवरून अजमेरला जाणाऱ्या मुस्लिम भाविकांच्या बसला अपघात झाला. तिथे स्वयंसेवकांनी केलेलं मदत कार्य पाहून त्यांनी तात्काळ संघात जायचा निर्णय घेतला.
त्यांच्या अभ्यासानुसार तिहेरी तलाख आणि बहुपत्नीत्व ह्या दोन्ही गोष्टी इस्लाम विरुद्ध आहेत. डॉ शेख यांच्या प्रमाणे त्याही रामंदिराविषयी आग्रही आहेत.

जी. यस. गिल(अतिरिक्त महाधिवक्ता, जयपूर).

मूलतः डाव्या विचारसरणीचे असलेले गिल हे डाव्या संघटने मार्फत जे काही कामगार चळवळीचं काम चालत होते त्यावर नाखूष होते. दत्तोपंत ठेंगडी यांच देशी अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांचे हक्क या बाबतीतले विचार ऐकुन ते संघात सामील झाले. ऑपरेशन ब्लु स्टार नंतर संघाने हिंदू शीख सलोखा ठेवण्यास जी मदत केली त्याच गिल कौतुक करतात.
ते आणि त्यांचा मुलगा दोघेही संघात जातात. संघाची समान नागरी कायदा वरील भूमिका त्यांना मान्य नाही पण राम मंदिर, तलाख, बहुपत्नीत्व या भूमिकांना त्यांचा पाठिंबा आहे
.
तुम्हाला कोणी सांगितल,की संघात मुस्लिम नाहीत म्हणुन

सी आय आयझॅक, निवृत्त इतिहास प्राध्यापक, केरळ

प्राध्यापक १९७५ पासून अभाविप आणि संघाशी निगडित आहेत. संघ हा तथाकथीत पुरोगाम्यांपेक्षा नक्कीच जास्त निधर्मी आहे असं आयझॅक यांना वाटतं. शाखेत जाणे आणि चर्च मध्ये जाणे या दोन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्याचा भाग आहेत. संघाच्या सामाजिक कार्यात ते आपल्या पत्नीसोबत सहभागी असतात. त्यानां अल्पसंख्याक ही संकल्पना मान्य नाही. त्यांच्या मते आपण सर्व भारतीयच आहोत, भारतमातेचे पुत्र आहोत.
ते समान नागरी कायदा , राम मंदिर यांचे समर्थक आहेत..

मोहमद अफझल, उद्योजक दिल्ली.

अफझल यांचा कल लहानपणापासूनच संघाकडे होता. त्यांच्या पत्नी शबाना ह्या सुध्दा संघाच्या राष्ट्र सेवा समितीच्या सदस्या होत्या.
अफझल यांना स्वधर्मीयांकडून बऱ्याचदा धमक्या येतात. तुष्टीकरण नाहीं तर समानसंधीमुळे समाज पुढे जाईल यावर त्यांचा विश्वास आहे.

इनयात कुरेशी, शेतकरी इंदोर

कुरेशी यांच्या वडीलांनी ही जवळपास पन्नास वर्षे संघाचं काम केलं. आणि कुरेशी यांनी तोच वारसा चालवत आपल्या मुलालाही शाखेत पाठवलं.
कुरेशी यांचा परिवार हज यात्राही करून आलाय, शिवाय स्थानिक मशिदीच्या सल्लागार समितीत ही ते आहेत. ते म्हणतात की कुराण किंवा हतीद मला माहित आहे , माझं शाखेत जाणं इस्लाम विरोधी नाही. मी पाच वेळा नमाज अदा करतो आणि संघाने नेहमी इस्लामचा आदरच केला आहे.
हे होते मुस्लिमच नाही तर इतर धर्मीय संघ कार्यकर्ते! यांच्या सह अगणित स्वयंसेवकांना धर्मापेक्षा राष्ट्र महत्वाचं वाटतं.

💠अनेक मुस्लिम व्यक्ती, स्वयंसेवक असून राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या कार्याशी जोडल्या गेल्या आहेत.जसजसे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सर्व सामान्य मुसलमानांच्या परिचयात आधिकाधिक येईल,तसेतसे अधिकाधिक मुसलमान संघाच्या जवळ येतील,कारण डाव्या, पुरोगामी माध्यमधुरीणांनी मुसलमानांची केलेली दिशाभूल,मुस्लिमांना हळूहळू लक्षात येईल.संघ हिंदू समाजाचे संघटन करतो त्यामुळे हिंदू विचारात सांगितलेल्या एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ती ! या तत्वावर संघाचा पूर्ण विश्वास आहे . त्यामुळे कोण कुठल्या प्रार्थना स्थळात आपला देव शोधतो आणि भजतो याला महत्व नाही तर सार्वजनिक जीवनात तो देशहिताला प्राधान्य देतो की नाही हे संघाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
गेल्या काही दिवसात मुस्लिम समाजाची मानसिकता जाणीवपूर्वक बद्दलवण्याचे प्रयत्न काही राष्ट्रविरोधी शक्ती योजनाबद्ध पद्धत्तीने प्रयत्न करत आहेत. संघाची भूमिका परिस्थिती निरपेक्ष असते त्यामुळे देशाच्या सर्वांगीण अंतिम हिताला संघाने नेहमीच प्राधान्य दिले आहे . भुवया उंचावून प्रश्न विचारणाऱ्या मंडळींनी , स्वयंसेवकाना संभ्रमित करण्यात वाकबगार असणाऱ्यांनी एकच मंत्र लक्षात ठेवावा संघाचा मंत्र आहे राष्ट्रहित सर्वतोपरी ! या मंत्राला अनुसरून संघाचे सर्वोच्च अधिकारी निर्णय करतात , तसे वागतात आणि स्वयंसेवक त्यांना अनुसरतात ! म्हणून संघ वर्धिष्णू आहे आणि त्यामुळेच राष्ट्रहित पण सुरक्षित आहे ! 
तर वरील ऊदाहरणावरून लक्षात येईल की,संघ सर्व धर्मियाना सामावुन घेतो.पण संघाला स्तुति,प्रचारकी थाट याचे वावडे असलेने या बाबी समाजासमोर येत नाहीत.देशावर जेव्हा जेव्हा काही विपदा येते तेव्हा तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे येऊन आपले योगदान देत असतो पण यासाठी संघ कधीही पत्रकबाजी, प्रचार व जाहिरात करत नाही. 
स्वयंसेवकांना थोडंसं पाठबळ देऊन समाज कार्यासाठी सर्व ठिकाणी पाठवतो. अशा निस्वार्थी लोकांनी उभारलेल्या संस्था फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थान व जगभर पसरल्या आहेत.

या संस्था निस्वार्थी सेवा भाषा, प्रांत, धर्म यांच्यात भेदभाव न करता कार्य करतात. अशा संस्थांचा वार्षिक अहवाल बघितला तर कळते की त्यांचे administrative ( पगार, ऑफिस फर्निचर, प्रवास , खाणे पिणे) या गोष्टी वर खरच् खूपच कमी असतो. कारण सर्वच कार्यकर्ते स्वतःच्या खिशातून पैसे वापरतात. संघ एक देशप्रेमी विचारधारा आहे आणि त्यावर हिंदू नसणारयांचा पण विश्वास आहे. 

__________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম