तीस हजार वर्षांपासूनचे तामिळनाडूतील नांदते गाव..!
https://parg.co/Uoxo
या गावात गेल्या वर्षीही उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी लोहयुगातील भांड्यांचे तुकडे, पाषाण युग व उत्तर पाषाण युग (इसवी सन पूर्व 30 हजार ते दहा हजार) या काळातील दगडी हत्यारेही सापडली होती. त्यानंतर तामिळनाडू सरकारने या ठिकाणी आणखी उत्खनन करून संशोधन करण्याचा निर्णय घेतला.♍ पत्तरई पेरमबुदूरमध्ये तीन महिने हे उत्खनन आणि संशोधन सुरू होते. वेगवेगळ्या बारा ठिकाणी खोदकाम करून दोनशेपेक्षाही अधिक वस्तू शोधण्यात आल्या. उत्तर पाषाण युगापासून आतापर्यंत हे गाव वसलेले आहे, असे यावरून दिसून आले. हे गाव उत्तर आणि दक्षिण भारत जोडणार्या मुख्य रस्त्यालगतच असल्याने ते असे नांदते राहिले असावे, असे पुरातत्त्व संशोधकांना वाटते.♍◯◯◯◯◯
Tags
जनरल नॉलेज