ब्रूसली चा मुत्यु कसा झाला?

ब्रूसली चा मुत्यु कशाने झाला 


एका ठोश्यात माणुस आडवा होणार म्हणजे होणारच.आणि हे करणारा पडदयावरचा कलाकार म्हणजे ब्रूसली.चित्रपट नाही कळेना का पण ब्रसलीची फाईट बघण्यासाठी पाब्लिक चित्रपट पाहायला जात असे. एक बुक्की मारली तर मोठयात मोठा माणुस आडवा होणार.ती फेमस बुक्की म्हणजे ब्रूसली ची फेमस कराटे स्टाईल बुक्की. कराटेत सगळ्यात जलद माणूस म्हणून कोणी नाव काढले तर एकच नाव पुढे येईल ते म्हणजे मार्शल आर्टचा बादशाह ब्रूस ली…
ब्रुस लीचे वास्तविक नाव ली जॅन-फॅन होते.त्याची आई जर्मन तर वडील चायनीज होते.
१९६२ साली झालेल्या एका फाईटमध्ये त्यांनी केवळ ११ सेकंदात १५ बुक्क्या आणि १ लात मारण्याचा रेकॉर्ड केला होता. आत्तापर्यत तेवढ्या जोरात आणि तेवढ्या गतीने कोणीही हा रेकॉर्ड तोडू शकले नाही. हा सामना फक्त ११ सेकंदच चालला होता.. ब्रूस ली सारखी फिटनेस आणि एनर्जी आजपर्यंत कुणातही पाहिली गेली नाही. असे सांगितले जाते की, ब्रूस ली इतका फास्ट होता की, लाइटचा स्विच ऑन केल्यावर बल्ब पेटण्याआधीच तो बेडवर लेटलेला असायचा.
त्याच्या संपूर्ण व्यावसायिक आयुष्यात ब्रूस ली हा केवळ एक वेळा मार्शल आर्ट स्पर्धेत हरलेला आहे. बाकी संपूर्ण आयुष्य तो अपराजित राहिला. ब्रूस लीचा वेग आणि हालचाल एवढी तीक्ष्ण होती कि तांदुळाचा एक दाना हवेत फेकून तो चॉपस्टिकने हवेतच पकड असे. येवढच काय तर ब्रुस ली तुमच्या हातातील शिक्का मुठ्ठी बंद करायच्या आधीच बदलवून दुसरा ठेवत असे.
त्याने शरीरात ज्या ग्रंथिमुळे घाम तयार होतो ती ग्रंथीच ब्रूस लीने शस्त्रक्रिया करून काढून टाकली होती.ब्रूस ली याने हॉलीवूडमधील ८ सिनेमात काम केले त्यापैकी ३ सिनेमे त्याच्या मृत्यूनंतर प्रसिध्द झाले. ब्रूस ली एवढे जलद होते कि त्यांचे फाईट सीन दाखविण्याकरिता विडीओ स्लो मोशन मध्ये दाखवायचं काम पडत असे. कॅमेरा करिता ब्रूस लीला त्या काळात चित्रित करणे अशक्यच राहायचे.
विकेपिडिया नुसार ब्रूस ली चा मृत्यू 1973 मध्ये Enter The Dragon सिनेमाच्या शूटींगवेळी त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ली गोल्डन हार्वेस्ट स्टुडिओमध्ये काम करत होता. तेव्हा अचानक बेशुद्ध झाला. नंतर त्याला औषध देण्यात आलं. थोडा वेळ त्याला बरं वाटलं. पण हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
आजपर्यंत त्याच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं गेलेलं नाही.
ब्रूसली चा मुत्यु कसा झाला?
त्याच्या मुत्यु बद्दल अनेक प्रवाद आहेत.
एक प्रवाद असा आहे की, ब्रूस ली यांचा मृत्यू डोके दुखीच्या गोळया अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे झाला होता. ह्या गोळ्यामुळे त्यांच्या मेंदूचा आकार १३% ने वाढला होता.त्याच्या मृत्यूच्या ऑफिशिअल रिपोर्टमध्ये लिहिले होते की, त्याचा मृत्यू आकस्मिक दुर्घटनेमुळे झाला. त्याला Celebral Edema नावाचा आजार झाला होता. ज्यात व्यक्तीच्या मेंदूवर सूज येते.
दुसरा प्रवाद असा की,त्याने एका अमेरिकन महिलेशी लग्न केलं होतं. नंतर त्याला दोन मुलं झाली. जेव्हा ब्रूस ली चा मृत्यू झाला तेव्हा त्याचं शरीर त्याच्या रूममध्ये नाही तर त्याच्या पत्नीच्या रूममध्ये होते.
काही लोकांनी असाही दावा केला होता की, त्याला स्लो पॉयजन दिलं जात होतं. त्यामुळे त्याच्या शरीरात ट्रेस केलं गेलं नाही.
काही लोक तर यामागे अमेरिकेचा हात असल्याचंही सांगतात. त्यांचं असं मत आहे की, अमेरिकेकडून चीनच्या या आंतरराष्ट्रीय हिरोचं यश पाहवलं गेलं नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या एजंटला ब्रूस ली ची पत्नी केलं आणि त्याची हत्या केली.
या सर्व दाव्यांमध्ये कथांमध्ये किती तथ्य आहे देव जाणे.
____________________________
  
 
 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম