शरीरात घुसून उपचार करणारे सुक्ष्म रोबो
दि. १ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/2PJjX1B
मानवाच्या मनात नैसर्गिकपणे करुणा आणि भावना असतात. त्यामुळेच आपण यंत्रमानवाला आपले सहकारी म्हणून निवडायचे झाल्यास त्यांच्यात आणि आपल्यात काही साम्य असावे, अशी आपली अपेक्षा असणार. मानवी रोबो (ह्युमनॉइड रोबो) म्हणजे मानवांप्रमाणे दिसणारे, हालचाल करू शकणारे, निर्णय घेण्याची क्षमता असलेले रोबोज! या रोबोमध्ये असलेल्या सेन्सर्सच्या आधारे त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेता येतो, तर अॅक्चुएटर्सच्या साह्याने ते हालचाली करू शकतात. असे रोबो आणीबाणीच्या प्रसंगांत मानवासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. ते शाळेतील विद्यार्थ्यांशी छान संवाद साधू शकतात; तसेच हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि विशेष मुलांशीही ते संवाद साधू शकतात. आरोग्यसेवेसाठी विकसित केलेले मानवी रोबोज डॉक्टरांना आणि रुग्णांना उपचारादरम्यान मदत करत आहेत. प्रामुख्याने मानवी रोबोची जबाबदारी ही शस्रक्रिया सहायक (सर्जिकल असिस्टंट) अशी असते आणि त्रास किंवा ताण कमी करण्यासाठीही त्यांची मदत होते. चिनी वैज्ञानिकांनी सुक्ष्म रोबोंना आता ‘डॉक्टर’ बनवले आहे जे उपचारात मदत करतील. मानवी शरीरातील अनेक भाग असे आहेत जिथे पोहोचणे कठीण जाते. अशा भागांमधील एखाद्या आजारावर उपचार करणेही अवघड होते. आता हे रोबो अशा भागांमध्येही जाऊन आजाराचे निदान करून योग्य उपचारात मदत करू शकतात. या सुक्ष्म रोबोंना रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून संचलित करता येऊ शकते.संशोधकांसाठी मानवी रोबोज क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), कम्प्युटर व्हिजन, न्युरोसायन्स, स्पीच रेकग्निशन यात संशोधनाला मोठा वाव आहे. मानवी रोबो विकसित करण्याची शाखा ही बहुआयामी आहे. ती फक्त सायन्स व इंजिनीअरिंगशीच संबंधित नाही, तर त्याला सामाजिक, न्यायिक आणि नैतिक असे विविध पैलू आहेत.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🏉 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ™ 🏉
______________________________
Tags
नविन संशोधन