दु्र्लक्षित मुडागड : हा किल्ला कोल्हापुर पासुन जवळ असुन फारसा कोणाला माहिती नाही
💥 बाजारभोगाव ते पडसाळी पासून जवळ
____________________________
माहिती सेेवा ग्रूप पेेठवडगाव
____________________________
𖣘 दि. ६ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/2PEpuqr
ताम्हणी घाटाच्या अगोदर वरचीवाडी गाव आहे. तेथे मुख्य रस्ता सोडुन, कोल्हापूर जिल्ह्यातील फारसा कोणास माहिती नसलेला, किल्ल्याचे अगदी तुटपुंजे अवशेष शिल्लक असलेला पण सुंदर जंगल भटकंतीचे अपरंपार सौख्य मिळवून देणारा हा किल्ला. कोल्हापूर-कळे-बाजारभोगाव ते पडसाळी हा गडाकडे जाण्याचा मार्ग. पडसाळी या छोटय़ा गावात कोणी वाटाडय़ा मिळाला तरच ही गडयात्रा शक्य होते. पडसाळी गावातून यासाठी जवळजवळ दोन तासांची जंगलयात्रा करावी लागते. गडमाथ्यावर फेरफटका मारण्यासाठी मोकळी जागाच नाही. सगळे जंगलच जंगल. तेही घनदाट. या गडाचा फारसा इतिहास ज्ञात नाही, फक्त 1748 च्या पेशव्यांच्या अधिकार्याने पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख आढळतो. पडसाळी येथे झालेले धरण, घनदाट जंगलातील भटकंती यासाठी जर का इकडे वाट वाकडी केली तर अविस्मरणीय आनंदाची प्राप्ती मात्र नक्कीच होते.पन्हाळा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पडसाळी गावानजीक छत्रपती शाहू महाराजांनी शिवारण्य नावाचे राखीव जंगल ठेवले होते. ह्याच शिवारण्याच्या गर्भात मुडागड नावाचा किल्ला दडलेला आहे. चहुबाजूने निबीड अशा जंगलाने वेढलेला मुडगड हा पर्यटक व प्रशासन या दोहोंकडूनही दुर्लक्षीत आहे.
╔══╗
║██║ _💫ⓂⒶⒽⒾⓉⒾ_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_* 𖣘Mahiti seva group, pethvadgaon𖣘_
____________________________
कोल्हापूरहून कोकणात जाण्यासाठी पूर्वीच्या काळी काजीर्डा घाटाचा वापर केला जात असे. ह्या काजीर्डा घाटातून होणाय्रा वाहतूकीवर नजर ठेवण्यासाठी घाटापासून जवळच मुडागड बांधण्यात आला. चहूबाजूने घनदाट जंगल हेच शक्तिस्थान असलेला मुडागड समुद्रसपाटी पासून ६९८ मिटर ऊंचीवर आहे. कोल्हापूरहून मुडागड पाहण्यासाठी आपण दोन मार्गांचा वापर करु शकतो. एक कोल्हापूरहून गगनबावडा रस्त्याला असणारे कोदे गाव गाठून तेथून पुढे गड चढाईस सुरुवात करता येते अन्यथा कोल्हापूर – कळे – बाजारभोगाव वरुन पुढे पडसाळी ह्या गावातून गडास रस्ता आहे. मुळात असा कोणतातरी किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे हे बय्राच लोकांना माहितही नाही.किल्ल्याभोवती असलेल्या घनदाट जंगलाच्या चिलखतामुळे किल्ला नवख्या माणसास सापडणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. दोन्ही पैकी कोणत्याही रस्त्याने गेल्यास गडावर जाण्यास वाटाड्या घेणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. गडावर फारसे कोणी जात नसल्यामुळे गावातील काही मोजक्याच लोकांना गडावर जाण्याची वाट माहित आहे. जेमतेम ४० – ५० उंबरे असणारे पडसाळी हे गाव. गावात धरण झालं म्हणून गावात रस्ता आणि विज तरी आली नाहीतर हे गाव तस दुर्गमच म्हणावे लागेल. गडमाथ्यावरील जंगल अगदीच अस्ताव्यस्त वाढलेले असल्यामुळे गडमाथ्यावर फिरणे फारच कठीण होते. गडाचे सर्व बांधकाम, इमारती उध्वस्त झालेले असून त्यातून मोठमोठे वृक्ष उगवून आलेले आहेत. गडावर सध्या किल्ला असण्याची एकमेव खूण म्हणजे १० ते १५ फुटांची तटबंदी तेवढी पाहता आली. बाकी सर्व किल्ला हा जंगलाने गिळंकृत केला आहे. गडमाथ्यावर झाडीत सर्वत्र गडावरील इमारतींचे दगड विखुरलेले नजरेस आले. तटबंदी सोडता गड असण्याची कोणतीही ओळख माथ्यावर नाही.
गडाच्या तटाला लागूनच एक पायवाट कोदे गावाच्या दिशेने जाते. ह्या पायवटेने काही अंतर चालल्यावर जंगलातील प्राणी खाली गावात जाऊ नयेत म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी खोदलेला चर आपणास पाहता येतो. त्याचबरोबर हत्तींना जलक्रीडा करण्यासाठी करण्या साठी खोदलेला तलाव पाहता येतो. सदयस्थितीत हा चर झाडाझरोट्यांनी पूर्णपणे भरलेला तर तलाव कोरडा पडलेला दिसून येतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, राजर्षी शाहू महाराजांनी हे जंगल शिवारण्य म्हणून राखीव ठेवले होते. ह्या जंगलात महाराजांनी एक अभिनव उपक्रम राबवला तो म्हणजे परदेशातून रानहत्ती आणून त्यांनी ते ह्या जंगलात सोडले. महत्त्वाचे म्हणजे आपल्या नैसर्गिक अधिवासात नसूनसुध्दा त्यातील एका हत्तीणीने पिलाला जन्म दिला. याच अरण्याचा एक भाग म्हणून हे चर व तलाव राजर्षी शाहू महाराजांनी बांधले होते. रयतेबरोबरच निसर्गाचीही इतकी काळजी घेणारा राजा इतिहासात दुसरा झाला नसेल.
वातावरण स्वच्छ असल्यास कोकणाच्या बाजूची दरी, दक्षिणेस गगनगड तर लांबवर विशाळगड देखील पाहता येतो.
🔹इतिहास : हा गड कोणी बांधला हे ज्ञात नाही. पण कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणार्या "काजिर्डा घाटाच्या" रक्षणासाठी मुडागड हा किल्ला बांधण्यात आला होता. १७४८ च्या पेशव्यांच्या कागदपत्रात याचा उल्लेख आढळतो. नानासाहेब पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आले होते. त्यावेळी तुळाजीने हा गड वसविला व या गडाच्या आश्रयाने पन्हाळा प्रांतावर हल्ले केले. त्याला आळा घालण्यासाठी यसाजी आंग्रे व पेशव्यांना मदत करणारे सावंतवाडीकर यांनी एकत्रितपणे मुडागडाला वेढा घातला व गड जिंकून घेतला
पेशव्यांच्या काळात राजापुर, आचरा, देवगड, विजयदुर्ग या बंदरातून करवीरला येणारा माल निरनिराळ्या घाटाने चढविला जाई. त्यापैकी राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातून काजिर्डा घाटाने मालाची ने आण केली जाई. यासाठी नानासाहेब पेशव्यानी सन १७४२ ते १७४७ या दरम्यान करवीरकरांच्या प्रदेशाजवळ मुडागड बांधला असावा.
रामचंद्र बावाजी पेशव्याना मुडागडच्या वेढ्याची व लढाईसंर्दबभात अधिक माहिती देतो,"भगवंतराव व सावंत यांनी मुडागडास वेढा घातला आहे. आंगर्याचे उपराला (मदत) येत होता, त्यावरी याणी जाउन सदिडसे माणूस मारिले. दोन च्यारसे हत्यारे आणिली. दारूगोली हि सापडली. मुड्यावरील लोकही अवसान खात आहेत. हे गड घेतील". मूडागडाच्या आश्रयाने चालविलेली धामधुम करवीरकर व सावंतवाडीकर यांनी मिळून थांबविली. पुढे १७३९ च्या एका पत्रात चोरट्याना धरण्यासाठी काजिर्डा घाटात जोत्याजीराव चव्हाण यांचे १० लोक बंदोबस्तासाठी ठेवल्याची नोंद आहे.
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498 ☜♡☞
‼म҉ ा҉ हित҉ ी҉ स҉ े҉ व҉ ा҉ ग्र҉ ू҉ प҉ ,҉ प҉ े҉ ठ҉ व҉ ड҉ ग҉ ा҉ व҉ ‼
______________________________
Tags
गडकिल्ले
