हे मंदिर देते पावसाचे संकेत !
दि. ३० एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3u77rsd
कानपूरच्या जनपथमधील जगन्नाथ देवांचे मंदिर! जे एका अनोख्या विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचे वेगळेपण असे आहे की, हे मंदिर पाऊसयेण्याची सूचना ७ दिवस आधीच देते.तुमचा यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही, पण ही अगदी खरी गोष्ट आहे! ह्या मंदिरात भगवान जगन्नाथ,बलदेव आणि बहिण सुभद्रा यांच्या काळ्या दगडाच्या मूर्ती स्थापन आहेत. तसेच सूर्य आणि पद्मनाभम देवांच्या मूर्ती देखील आहेत.मंदिराच्या भिंती १४ फुट रुंद आहेत. सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. या मंदिरातून तशीच रथयात्रा निघते जशी पुरी उडीसा मधील जगन्नाथ देवांच्या मंदिरातून निघते.मान्सूनचा पाऊस येण्याच्या एक आठवड्यापूर्वी ह्या मंदिराच्या गर्भ ग्रहच्या छतातून मान्सूनी दगडातून घनत्वाकारचे थेंब पडतात, जश्या प्रकारचा पाऊस पडणार आहे अगदी तसे. जसा पाऊस सुरु होतो तसा हा दगड सुकून जातो.
मंदिराचा आकार बौद्ध मठाप्रमाणे आहे. त्यामुळे लोक मानतात की, हे मंदिर सम्राट अशोकाने बनवले असेल,परंतु मंदिराच्या बाहेर असलेल्या मोर आणि चक्र यांच्या आकृती वरून काही लोकांना वाटते किह्या मंदिराचे निर्माण सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात झाले असावे.कधी कानपूरला भेट दिलीत तर नक्कीचया मंदिराचे दर्शन घ्या!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🥇
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Tags
धार्मिक
