औरंगाबाद येथील मुघलकालीन जलव्यवस्थापन
गुलाम म्हणून आफ्रिकेतून भारतात येताना मलिक अंबर इराण मधून आला होता आणि इराण मधील क्यानोत हि जलव्यवस्थापन यंत्रणा त्याला माहित होती. त्याने त्याच पद्धतीचा येथे अवलंब करायचे ठरवले. इराण देशात सुद्धा पाण्याचे दुर्भिक्ष आहे. परंतु तरी सुद्धा तुम्हाला इराण मध्ये सर्वत्र उत्कृष्ट बागा, कारंजे यांची रेलचेल दिसेल. बऱ्यापैकी दुष्काळी आणि जवळ जवळ वाळवंट असणाऱ्या प्रदेशातील हा चमत्कार म्हणजे क्यानोत.
क्यानोत म्हणजे काय आणि ते कसे बनवले जातात ?
ज्यावेळी पावसाळ्यात पाउस पडतो त्यावेळी डोंगर रंगांच्या मध्ये एक जल साठवण विहीर तयार केली जाते. विहिरीची खोली ५०० फुट किंव्हा त्या पेक्षा अधिक सुद्धा असू शकते अर्थात जमिनीच्या प्रतीनुसार आणि पाण्याची लागणारी गरज यावर विहिरीची खोली ठरते.त्या विहिरीचे तोंड हे शंखाकृती ठेवले जाते ज्यामुळे सूर्यप्रकाश आत पोचू शकत नाही. कोणताही डोंगर अथवा पर्वतीय भागात नैसर्गिकरित्या उंचावर टेबल land तयार झालेली असते. जो डोंगर विहीर तयार करण्यासाठी निवडला जातो त्याच्या पुढे अजून उंच डोंगरांची रांग असल्याची खात्री केली जाते.. त्या डोंगर रांगेवरील पाणी चर खणून या विहिरीपरेंत पोचवले जाते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नाही आणि पाण्यासह धूप झालेली माती विहिरीत येऊ नये म्हणून सभोवताली असणारी डोंगररांग झाडे लावून हिरवीगार केली जाते. झाडे आणि गवत जमिनीची धूप होऊ देत नाही आणि फक्त पाणीच विहिरीपरेंत वाहात येते. या पावसाच्या पाण्याने ती विहीर तुडुंब भरते. आता विहिरीचा परीघ अन खोली हि ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे तेथील दैनंदिन गरज लक्षात घेऊन सुमारे दीड वर्ष ५०० दिवस सलग तितका पाणी पुरवठा होऊ शकेल या पद्धतीने बनवली जाते. या विहिरीत सुद्धा खाली काही भाग हा डेड स्टोक म्हणून असतो ज्यात वाहत आलेल्या पाण्यातील गाळ साठून राहतो आणि फक्त स्वच्ह पाणीच पुढे प्रवाहित होऊ शकते.
आता डोंगरापासून खेद्यापरेंत एक सरळ रेषा लक्षात घेऊन प्रत्येकी २०० फुट ( ६० मीटर ) अंतरावर खोल खड्डे ( विहिरी पण कमी परिघाच्या ) तयार केले जातात. आता मुख्य विहीर आणि या छोट्या रांगेतील विहिरी एक मेकांना जोडण्यासाठी आत एक बीळ तयार केले जाते. त्या बिळाच्या वरच्या भागात आर्च म्हणजेच मातीच्या भाजून तयार केलेल्या कमानी बसवल्या जातात. या कमानी मातीचा दाब सहन करतात आणि पाण्यात माती मिसळू देत नाहीत. परंतु पृष्ठभाग मात्र मातीचाच असतो त्यामुळे या बिळातून सुद्धा जमिनीत पाणी झिरपत राहते आणि जमिनीखालील पाण्याचा स्तर सुद्धा राखला जातो. आता हि २०० फुटावर असणारी जी छोटी विहीर आहे तिच्या बरोबर खाली सुद्धा डेड स्टोक तयार करतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी २०० फुट अंतरावर पाण्यातील गाळ साठला जातो आणि पुढे अधिकाधिक शुद्ध पाणी प्रवाहित होत राहते. आता हि यंत्रणा खेड्यापरेंत आली कि त्याचे मुख उघडले जाते. आता मुखाचे तोंड हे साधारण २४ तास पाणी वाहत राहील आणि एका दिवसाची गरज भागेल इतके मोठे असते त्यामुळे वर्षभर त्या खेड्याला पाणी पुरवठा होत राहतो. त्यामुळे तुम्ही खेडे वगळता इराण मध्ये फिरलं तर तुम्हाला वाळवंटच दिसणार पण खेड्यात मात्र मुबलक पाणी वापरासाठी आणि शेतीसाठी पण आणि इतकेच काय मस्त बागा आणि कारंजे सुद्धा. हि अफलातून पद्धत सुमारे ४०० -४५० वर्षापूर्वी सुरु झाली आणि त्या काळात बांधलेले क्यानोत अजून सुद्धा उत्तम काम करत आहेत. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,नवीन क्यानोत बनवण्याची इराण मध्ये गरज पडत नाही फक्त जे आहेत त्या क्यानोत ची देखभाल केली जाते. डोंगरातील पाणी सायफन च्या तत्वाने खेड्यात येते वर्षभर पुरते. वीज किंव्हा कशाची सुद्धा गरज नाही.
मलिक अंबर ने हेच तंत्रज्ञान वापरून औरंगाबाद जवळ असणाऱ्या जटवाडा च्या डोंगर रांगातून पाणी आणले अंतर सुमारे ३० किलोमीटर. आणि त्या पाण्याचा पहिला स्त्रोत बेगमपुरा येथे उघडला. त्या पाण्यावर चालणारी पाणचक्की हे एक पर्यटन स्थळ म्हणून औरंगाबाद ला गेलेल्या प्रत्येकाला माहित आहे. या प्रकल्पावर चीफ इंजिनियर ( त्या काळी ) थत्ते म्हणून गृहस्थ होते. त्यांनी त्यांच्या वाड्यात सुद्धा यातील एक लाईन ओढून घेतली. बेगमपुर्यात पाण्याने सतत भरला राहणारा थत्ते हौद सुद्धा तितकाच प्रसिद्ध. हि नहरे अंबरी एकेकाळी सुमारे ४० % औरंगाबाद ला पाणी पुरवत असे ( १९९० परेंत ) परंतु गेल्या काही वर्षात हिची काळजी न घेतल्याने पार वाट लागली आहे आणि मी मध्ये औरंगाबाद ला गेलो त्यावेळी थत्ते हौद कोरडा पडला होता. पाणचक्कीमध्ये तरी सध्या पाणी आहे. किती काल टिकेल माहित नाही. आपण न बांधलेल्या धरणांच्या साठी ७०००० कोटी खर्च करू शकतो पण या अभियांत्रिकी चमत्काराला जिवंत ठेवण्यासाठी आणि सतत पाणी मिळवण्यासाठी काही लाख रुपये दर वर्षी देखभाल दुरुस्तीला खर्च करू शकत नाही हे लज्जास्पद आहे. पैठण ते औरंगाबाद जलवाहिनी बनवली आहे तिच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले. पाणी उपसा करून आणायला कोट्यावधी रुपयाची वीज लागते पण हे फुकट तंत्रज्ञान मात्र आपण वापरत नाहीत. ती जलवाहिनी वर्षातून कमीत कमी दोन वेळेला फुटते आणि आणि औरंगाबाद ला निर्जळी घडते क्यानोत ४०० वर्षांच्या पूर्वी बांधली आज सुद्धा फुकटात काम करते. पण अक्कल शून्य असणारा सिंचन विभाग आणि प्रेताच्या टाळूवरील लोणी चाटत जगणारे पुरातत्व खाते या अनमोल ठेव्याला नष्ट होताना पाहत बसले आहेत. दुर्दैवाने सामान्य माणूस तर निसर्गापासून कायमचा तुटला आहे त्याला या अनमोल ठेव्याची काहीच किंमत नाही.
या पद्धतीच्या यंत्रणा तुम्हाला भारतात सुद्धा इतर ठिकाणी बघायला मिळतील. तुळजापूर ला मंदिरात जाताना गोमुखातून पडणारे पाणी, राजापूर ची प्रकट होणारी आणि गायब होणारी गंगा. लोणार च्या खार्या पाण्याच्या सरोवराजवळील मंदिरातील सतत वाहणारी गोड्या पाण्याची धार. हेच तंत्रज्ञान फक्त विहिरीपरेंत तुम्हाला प्रत्येक लेणी मध्ये वापरलेले दिसेल. हेच तंत्रज्ञान तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावर सुद्धा विहिरीच्या स्वरूपात वापरलेले दिसेल. त्याला टाके म्हणतात. वर्षभर फुकट मिळणारे पाणी. पाउस पडताना साठवून ठेवायचे. किती साधे आणि सोपे निसर्गपूरक तंत्रज्ञान.परंतु आजच्या काळात आपण प्रगत झालो आहोत. आपण डोंगर फोडतो.. जंगले उध्वस्त करतो आणि पावसाचे पाणी वाहून जाऊ देतो. नंतर आपण डोंगराळ भागाला नोवेंबर ते जून टॅंकरनेने पाणी पुरवठा करतो. पैसे खर्च झाले तरी चालतील पण ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची करियर टॅंकरने पाणी पुरवठा होऊन घडणे अधिक महत्वाचे आहे.
इराण मध्ये उन्हाळ्यात लोकांना बाहेर पडणे अशक्य होते. क्यानोत या यंत्रणेचा वापर करून इराण मध्ये त्यांनी खेड्यातील लोकांना दुपारी आराम करण्यासाठी नैसर्गिक रित्या थंड असणाऱ्या खोल्या सुद्धा तयार केलेल्या आहेत.
सोबत फोटो पहा
