बहादूरवाडी किल्ला

  बहादूरवाडी किल्ला 


सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे निपाणी पासुन व पेठवडगाव पासुन साधारण १८ कि मी अंतरावर बहादूरवाडी फाटा आहे. या गावात अपरिचित भुईकोट आहे. या कोटाची अवस्था पाहता खुद्द गावातल्यांनाही त्याबद्दलची आत्मीयता वाटत नाही हे सहज लक्षात येते. पण प्रथमदर्शनीच हा कोट मोहात पाडतो. १०फूट रुंदीचा व १५ फूट खोलीचा खंदक असून त्याच्या पुढे तटबंदी आहे. या तटबंदीच्या आत अजुन एक तटबंदी असून तिला ८ बुरुज आहेत. जास्तीतजास्त बांधकाम हे भाजीव विटांपासून केलेले दिसते. पहिल्या दरवाजातून आत जाताना शेजारी देवडीत काळ्या पाषाणातील गणपती दिसतो. तिथून आता गेलं की दुसरी तटबंदी लागते. या तटबंदीत चार खोल्या आहेत ज्या बहुधा घोड्यांसाठी आहेत. या तटाच्या आत जाण्यासाठी वक्राकार दरवाजा असून आतमध्ये वाड्याचे अवशेष आणि बांधीव विहीर आहे. किल्ल्यात गवत आणि काटेरी झुडपे यांचे रान माजलेले दिसते.

                                                  इतिहास:- 
                                           बहादुरवाडी किल्ला माधवराव पेशव्यांनी बांधला. नंतर तो पटवर्धनांच्या ताब्यात देऊन कोल्हापूरकरांवर वचक बसवण्यासाठी याचा उपयोग केला गेला. नंतर बहादूरवाडी ची देशमुखी नक्की कुणाची यावर बरेच वाद पुढील काळात झाले. माने, शिंदे, घोरपडे ही तीन घराणी बहादूरवाडी च्या देशमुखी करीता वाद करत होती.१७३६ मध्ये रायाजी व हेगोजी माने यांच्या वाळवा वतनासाठी वाद झाला त्यात शाहू महाराजांनी वाळव्याची विभागणी करून बहादूरवाडी हे वतन हेगोजी मान्याकडे दिले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,तर .ब्रिटीशकालीन गॅझेटियरच्या मताप्रमाणे हा भुईकोट माधवराव पेशव्यांनी कोल्हापुरकर भोसलेंच्या आक्रमणापासुन सातारा गादी व कोल्हापुर गादी यांच्या सीमेवर म्हणजे वारणा नदीकाठी संरक्षणासाठी बांधला आणि तो मिरजकर पटवर्धनांच्या ताब्यात दिला.                                                                                                  
काय पहाल                                           
या कोटाची बांधणी खणखणीत आहे. तटबंदीच्या बाहेर खंदक खोदलेला आहे. कोटाला चार तटबंद्या आहेत. खंदकाला जोडून असलेल्या तटबंदीला १२ बुरुज आहेत. त्याआतील दुसरी तटबंदी पाच मीटर आहे. ती गोलाकार असून, त्याला आठ बुरुज आहेत. अशा एकात एक चार तटबंद्या असून, चौथी मात्र आयताकृती आहे.किल्ल्यामध्ये एक विहीर आणि वाडय़ाचे काही अवशेष आहेत. कोटालगत वेतोबाचे छोटेखानी मंदिर आहे.भुईकोट किल्ला असलेने गड साधारण १ तासात पाहुन होतो.गावात विचारणा केली असता या गडाबद्दल लोकाना इतिहास सांगता येत नाही.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম