घरगुती उपायांनी घालवा त्वचेचं काळेपण
फेसबुक लिंक http://bit.ly/3o30czg
उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी व्हायच्या समस्येनं अनेकांना
ग्रासलेलं आहे. पण काही घरगुती उपाय करून तुम्ही त्वचेचं काळेपण घालवू शकता. 📍काकडी, गुलाब पाणी आणि लिंबाचा रस
काकडी आणि लिंबामुळे त्वचेचा काळेपणा कमी व्हायला मदत होते. लिंबू त्वचेतला काळेपणा कमी करतं, तर काकडी आणि गुलाब पाण्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. हे तिन्ही पदार्थ त्वचेला लावा आणि 10 मिनीटांनंतर थंड पाण्यानी चेहरा धुवा.📍पपई आणि मधाचं फेसपॅक
पपईमध्ये असलेल्या एंजाईम्समुळे चेहऱ्याचा काळेपणा दूर व्हायला मदत होते. पपईमधले एंजाईम्स त्वचेवरचे डाग कमी करतात. तर मध त्वचेला मुलायम बनवते. अर्धा कप पिकलेली पपई कुसकरुन त्यात एक चमचा मध टाका, हे मिश्रण त्वचेला लावा आणि पाण्यानं चेहरा धुवा. 📍टोमॅटो, दही आणि लिंबू रस
लिंबू त्वचेवर असलेले डाग कमी करतं, तर टोमॅटोचा रस त्वचेवर असलेली छिद्र कमी करतो, त्वचेचा तेलकटपणाही टोमॅटोच्या रसानं कमी होतो. दह्यामुळे त्वचेला पोषण मिळतं.तीन मोठे चमचे टोमॅटोचं मिश्रण, एक मोठा चमचा लिंबू रस आणि एक मोठा चमचा दही घ्या. हे तिन्ही पदार्थ एकत्र करून त्वचेला लावा. अर्धा तास चेहऱ्यावर हे मिश्रण तसंच ठेवा, आणि वाळल्यानंतर पाण्यानं चेहरा धुवा.
📍चंदन पावडर आणि नारळ पाणी
चंदन पावडर त्वचा साफ करतं, तसंच चेहऱ्यावर असलेली घाण, डागही यामुळे कमी होतात. एक मोठा चमचा चंदन पावडर नारळ पाण्यामध्ये टाका, यामध्ये बदाम तेलाचे थोडे थेंब टाका आणि चेहऱ्यावर लावा. 20 मिनीटांनंतर चेहरा धुवून घ्या.📍चेहर्यावर डाग असले तर जायफळ व अनंतमुळ चूर्ण सम प्रमाणात घेऊन दुधामध्ये उगाळून ही पेस्ट पंधरा दिवस नियमित चेहर्याला लावावी. चेहर्यावर ताजा लिंबू कापून त्याची फोड घासावी. तसेच काकडी, सफरचंद ,पपई, यांसारख्या फळांचा रस चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते.
📍रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजराचा ज्युस प्यायल्याने चेह-याचा रंग सुधारण्यास मदत होते. तसेच चेहरा आकर्षक दिसतो. झोप पुर्ण न होणे, हार्मोनल बदल यामुळे डार्क सर्कल्स येतात. डार्क सर्कल असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलक्या हाताने मालिश करावी. असे केल्याने डार्क सर्कल्स कमी होतात.
टीप-केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
Tags
आरोग्य