या ठिकाणी सीतेने अग्निपरीक्षा दिली होती
𖣘 दि. १३ मे २०२१
आपणास रामायण व त्यातील कथा माहिती असेलच,त्यामध्ये रामाने सीतेला अग्निपरीक्षा करण्याची आज्ञा दिलेली असते,सीतेने रामाच्या आज्ञेनुसार जेथे अग्नीपरीक्षा दिली ते ठिकाण बिहारच्या मुंगेर जिल्यात असून मुंगेर पासून ८ किमीवर असलेले सीता कुंड हे ते ठिकाण आहे. असे सांगतात कि जेथे सीतेने अग्नीत प्रवेश केला तेथेच हे कुंड आहे. रावणाच्या ताब्यातून सीतेला सोडवून आणल्यावर सीतेच्या पवित्र्याबाबत एका परिटाने शंका घेतली आणि ती दूर करण्यसाठी रामाने सीतेला अग्निदिव्य करायला सांगितले ही कथा आपल्याला रामायणात वाचायला मिळते. सीतेने रामाच्या इच्छेला होकार देऊन अग्नी प्रवेश केला आणि कोणतीही इजा न होता ती त्यातून सहीसलामत बाहेर पडली.
या सिताकुंडाचे पाणी नेहमी गरम असते आणि त्यामागे काय रहस्य असावे याचा शोध वैज्ञानिक घेऊ शकलेले नाहीत,असे म्हणतात, किं सीतेने अग्नीतून बाहेर आल्यावर या कुंडात स्नान केले आणि तिच्या शरीरातील अग्नीची धग या पाण्यात मिसळली आणि त्यामुळे हे पाणी नेहमी गरम असते. विशेष म्हणजे हे पाणी अतिशय स्वच्छ, पारदर्शी आहे. याच कुंडाजवळ आणखी चार कुंडे आहेत ती अनुक्रमे रामकुंड, लक्ष्मण कुंद, शत्रुघ्न आणि भरत कुंड या नावाने ओळखली जातात आणि ही सर्व गार पाण्याची कुंडे आहेत. सिताकुंडातील पाणी गरम आणि पारदर्शी असणे हा सीतामाईच्या शक्तीचा प्रभाव असल्याची भावना आहे. मुंगेर गॅजेटीअर मध्येही याची नोंद सीतेने अग्नीपरीक्षा दिलेले स्थळ अशीच आहे. इतिहासकार मात्र ही केवळ कल्पना असल्याचे सांगतात. हे कुंड २० फुट लांबरुंद असून त्याची खोली १२ फुट आहे. इंग्रज पर्यटक टायफेन्थर याने या कुंडच्या पाण्याचे परीक्षण केले होते आणि वर्षातील आठ दिवस हे पाणी अतिशय शुद्ध असते असे निरीक्षण नोंदविले होते या ठिकाणी वर्षभर भाविक हजेरी लावतात. त्यातही माघ महिन्यात येथे १ महिना मेळा भरतो. त्यावेळी भाविक येथे स्नान करून शेजारील मंदिरात पूजा अर्चा करतात यामुळे त्याच्या इच्छा पूर्ण होतात असा विश्वास आहे.
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498 ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________