दिल्लीतला मिनी‘कुतुबमिनार’ !
____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
____________________________
. दि. २० जून २०२०
नवी दिल्ली :राजधानी दिल्लीतील कुतुबमिनार जगप्रसिद्धच आहे. मात्र, याच दिल्ली शहरात आणखी एक असाच मिनार आहे हे तुम्हालामाहिती आहे का? हा ‘मिनी कुतुबमिनार’ पश्चिम दिल्लीत असून त्याची उभारणी सतराव्या शतकात झाली होती. कुतुबमिनारची छोटी प्रतिकृतीअसलेला हा मिनार भग्नावस्थेत आहे.
उत्तमनगरच्या हस्तसाल गावात हा मिनार असून त्याच्याकडे दुर्लक्षच झालेले आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, आता दिल्ली सरकारच्या पुरातत्त्व खात्याने इनटॅकच्या दिल्ली विभागाच्या सहकार्याने या जुन्या इमारतीची देखरेख करण्याचे ठरवले आहे. या मिनारची उभारणी बादशाह शाहजहाँ याने केली होती. शिकारीसाठी टेहळणीचे स्थान या हेतूने हा मिनार उभा करण्यात आला होता. एकेकाळी हा मिनार पाच मजली होता; पण आता त्याचे केवळ तीनच मजले शिल्लक आहेत. राजधानीतील कमी प्रसिद्ध असलेल्या इमारतींच्या संरक्षणासाठी दिल्ली सरकारने एक मोहीम आखली असून त्याच्या चौथ्या टप्प्यात या ‘मिनी कुतुबमिनार’चेही रक्षण केले जाणार आहे.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!*_
*🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵*
Tags
माहिती