व्हायरसमुळे वाढणार कॉम्प्युटरचा वेग !

हा व्हायरस प्रामुख्याने ई-कोली बॅक्टेरियाला संक्रमित करीत असतो. संशोधकांनी सांगितले की, कॉम्प्युटर वेगवान करण्यासाठी त्याच्या मिलीसेकंद टाईम डिलेला कमी करणे गरजेचे आहे. हे टाईम डिले म्हणजेच विलंब होण्याचे कारण रँडम अॅक्सेस मेमरी (रॅम) आणि हार्ड ड्राईव्ह यांच्यामधील डाटा ट्रान्सफर व स्टोरेज. सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईनच्या संशोधकांनी म्हटले आहे की, फेज-चेंज मेमरी या समस्येला दूर करू शकते. ती रॅमप्रमाणे वेगवान असते आणि त्यामध्ये हार्ड ड्राईव्हपेक्षा अधिक डाटा स्टोअर होऊ शकतो. मात्र, या प्रक्रियेत तापमान मोठी समस्या आहे. ‘एम13 बॅक्टिरियोफेज’ व्हायरसच्या मदतीने अतिशय कमी तापमानातच या मटेरियलला वायरमध्ये समाविष्ट करून कॉम्प्युटर चिपमध्ये वापरता येते.
Tags
माहिती