येथील देवीचा रंग दिवसातुन तीन वेळा बदलतो



    येथील देवीची मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते, जाणून घ्या कुठे आहे हे अद्भुत मंदिर      



____________________________
   माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
╰──────•◈•──────╯
____________________________
.         दि. ३  जूलै २०२० 
 मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये असलेले पचमठा मंदिर कितीतरी गोष्टींमध्ये वेगळे आहे. या मंदिरामध्ये कितीतरी देवी – देवतांच्या मूर्ती स्थापित आहेत. येथे राधाकृष्णाचा विशेष उत्सव देखील साजरा केला जातो. पण या मंदिराची सर्वात विशेष गोष्ट असलेल्या देवी लक्ष्मीच्या प्राचीन मूर्तीविषयी येथे एक विचित्र कथा प्रचलित आहे. या मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांचे आणि तेथील पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की, येथे स्थित असलेली ही मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते. काही लोक फक्त याचाच अनुभव घेण्यासाठी पचमठा मंदिरामध्ये येतात. दर्शन घेणाऱ्या भक्तांनुसार, सकाळी ही मूर्ती पांढरी, दुपारी पिवळी आणि संध्याकाळी निळ्या रंगाची होते.      
देवी लक्ष्मीचे हे अद्भुत मंदिर गोंडवाना शासनमध्ये राणी दुर्गावतीचे विशेष सेवापती राहिलेले दिवान आधार सिंगच्या नावावर बनवलेल्या अधारताल तलावामध्ये बनवले गेले होते. या मंदिरात अमावस्येच्या रात्री भक्तांची रांग लागते. पचमठा नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर एकेकाळी संपूर्ण देशातील तांत्रिकांसाठी साधनेचे विशेष केंद्र होते. असे देखील म्हटले जाते की, या मंदिराच्या चारही बाजूंना श्रीयंत्राची विशेष रचना करण्यात आलेली आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, मंदिराच्या पुजाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, हे मंदिर जवळपास अकराशे वर्षाआधी तयार करण्यात आले आहे. मंदिराच्या आतील भागामध्ये लावण्यात आलेल्या श्रीयंत्राची विचित्र संरचनेविषयी नेहमीच चर्चा केली जाते. त्याचबरोबर अजून एक खास गोष्ट या मंदिराविषयी प्रचलित आहे, जिच्यानुसार आजही सूर्याची पहिली किरण देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या चरणावर पडते._*
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498
माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव
╰──────•◈•──────╯
🌹.............................................
.       ണคн¡т¡ รεvค*_
.       :::::∴━━━✿━━━∴::::

येथील देवीची मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते, जाणून घ्या कुठे आहे हे अद्भुत मंदिर
.            *༺♥༻​​*
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম