या मंदिरावर १२ वर्षानी वीज पडते

 या शंकराच्या मंदिरावर दर १२ वर्षानी वीज पडते 
________________________
या शंकराच्या मंदिरावर दर १२ वर्षानी वीज पडते



माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 

हिमाचलप्रदेश मध्ये असे शंकराचे मंदिर आहे. जिथे दर 12 वर्षांनी वीज पडते. भगवान शंकराचे हे रहस्यमय मंदिर आहे. कुल्लू शहरातील व्यास आणि पार्वती नदीच्या संगमाजवळ असणाऱ्या पर्वतावर हे मंदिर असून येथे दर 12 वर्षानी वीज पडते मात्र मंदिराला यत्किंचितही क्षती पोहोचत नाही. ‘अमर उजाला’ने याबाबत वृत्त दिले आहे.
पौराणिक कथा आणि मान्यतेनुसार शंकराचे हे मंदिर ज्या घाटात स्थित आहे ते सापाचे रूप आहे. भगवान शंकराने या सापाचा वध केला होता. याच मंदिरावर दर 12 वर्षांनी आकाशातून वीज पडते. वीज पडल्याने मंदिरातील शिवलिंग खंडित होते आणि पुजारी यावर दह्याचा अभिषेक घालून दाह शांत करतात.
काय आहे पौराणिक कथा?
पौराणिक कथेनुसार या भागात कुलांत नावाचा एक राक्षस राहात होता. हा राक्षस सापाचे रूप धारण करून लोकांना त्रास द्यायचा. एकदा कुलांत राक्षसाने अजगराचे रूप धारण करून मथान गावाजवळून वाहणाऱ्या व्यास नदीत मांड ठोकून बसला. यामुळे नदीचे पाणी रोखले गेले आणि गावात पाणी शिरू लागले. हे पाहून भगवान शंकराला राग आला. भगवान शंकराने माया रचत त्याला शेपटीला आग लागल्याचे सांगितले आणि तो वळताच त्याचा वध केला. पुढे राक्षसाचे मृत शरीर डोंगररुपी झाले. कुलांतच्या वधानंतर भगवान शंकराने इंद्रदेवाला इथे दर 12 वर्षांनी वीज पाडण्यास सांगितले.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম