१ कोटीला, १ कमी म्हणुन नाव उनाकोटी

उनाकोटी येथील ९९ लाख, ९९ हजार कोरीव मुर्ती 
-----------------------------
 १ कोटीला, १ कमी म्हणुन नाव उनाकोटी
                          
🇦 आगरतळा : त्रिपुराची राजधानी आगरतळापासून सुमारे 145 किलोमीटरवर उनाकोटी हे ठिकाण आहे. असे म्हटले जाते की याठिकाणी 99 लाख,99 हजार,999 दगडी मूर्ती आहेत. या कोरीव मूर्ती कुणी व कधी बनवल्या याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.
या मूर्तींमुळेच ‘उनाकोटी’ हे नाव पडले. त्याचा अर्थ ‘एक कोटीला एक कमी’. ईशान्य भारतातील रहस्यमय ठिकाणांमध्ये याचा समावेश होतो. अनेक वर्षे या ठिकाणाची माहितीही लोकांना नव्हती. सध्याही अतिशय कमी लोकांना याची माहिती आहे.
उनाकोटी येथील ९९ लाख, ९९ हजार कोरीव मुर्ती

🇦 हा एक डोंगराळ भाग असून तो घनदाट जंगल आणि दलदलीने भरलेला आहे. अशा जंगलाच्या मध्यभागी, अतिशय दुर्गम ठिकाणी या लाखो मूर्ती कशा बनवल्या असतील हे एक कोडेच आहे. यापैकी बहुतांश मूर्ती दगडावर कोरलेल्या असून काही दगडामध्ये घडवलेल्याही आहेत. या स्थानाविषयी स्थानिक लोकांमध्ये अनेक दंतकथा आहेत. त्या सर्व भगवान शिवशंकराशी संबंधित आहेत.
पहाडात दगडाला आकार देऊन, तीस फुटाची शिव प्रतिमा आहे. ‘उना कोटी’ म्हणजे कोटीला एक कमी असणे. याबद्दल येथे अनेक कथा प्रचलित आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,कालुकामार नामक शिवभक्त एका रात्रीतून एक करोड शिव प्रतिमा बनविण्याचा प्रण करतो. परंतु, कोटीला एक कमी असतात त्याच्या मनात येेत की शेवटची प्रतिमा मी शिल्पकार कालुकामारचीच का नाही बनवावी. हा अहंकारी विचारच त्याला स्वतःची प्रतिमा बनविण्यात अयशस्वी ठरवितो. सकाळ झाली असते. पण तेथे आज पार्वती, विष्णू, गणेश व अन्य देवतांच्या असंख्य प्रतिमा आहेत.उनाकोटी येथे सापडलेल्या प्रतिमा दोन प्रकारच्या आहेत: म्हणजे खडकातील कोरीव आकृती आणि दगडी प्रतिमा. खडक-कोरीव कामांपैकी मध्यवर्ती शिव हेड आणि विशाल गणेशाचे विशेष उल्लेख आहेत. उनाकोटिसवारा कल भैरव म्हणून ओळखले जाणारे मध्यवर्ती शिव डोके सुमारे 30 फूट उंच आहे आणि त्यातच स्वतःच 10 फूट उंच असलेल्या भरतकामाच्या हेड-ड्रेसचा समावेश आहे. त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यातील उनाकोटी हे मंदिर आश्चर्यच आहे.      
            -------------------------------------------
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম