फेसबुकवरील मैत्रीण

फेसबुक’वरील मैत्रिण
__________________________
   (क्राईम डायरी)
__________________________
माहिती  सेवा गृप पेठवड़गाव
__________________________
पुणे परिसरात राहणारा पारस नावाचा तरुण पत्नी सोडून गेल्याच्या दुःखात होता.
http://bit.ly/2U7jUPD
वेळ घालवण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर येण्यासाठी तो त्याच्या भावाच्या व्यवसायात मदत करू लागला. या दरम्यान त्याला सोशल मीडियाचा नाद लागला. भावाला व्यवसायात मदत करत असताना त्याने ‘फेसबुक’ हे वेळ घालवण्याचे आणखी साधन तयार केले. ‘फेसबुक’वर स्वतःचे अकाऊंट असल्याने तो तासन् तास त्यावर सर्चिंग, चॅटिंग करत बसायचा. असाच एक दिवस ‘फेसबुक’ पाहत असताना त्याला रोमा नावाच्या मुलीने पारसला ‘फ्रेंडस् रिक्वेस्ट’ पाठवली.♍
पारसने ‘फेसबुक’ सुरू केल्याबरोबर त्याला रोमाची ‘फ्रेंडस् रिक्वेस्ट’ दिसली. त्याने रोमाच्या ‘फेसबुक अकाऊंट’ला जात सगळी माहिती घेतली. रोमाच्या अकाऊंटवर असलेले तिचे सुंदर फोटो पाहून पारस तिच्यावर भाळला. त्याने क्षणार्धात रोमाची ‘रिक्वेस्ट’ स्वीकारली. यामुळे दोघांचे ‘चॅटिंग’ सुरू झाले. ‘चॅटिंग’वर एकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत आपले चांगलेच सूर जुळायला लागले, असा समज पारसचा झाला. त्यामुळे पारस हा संधीची वाट पाहत होता. अगोदरच पत्नी सोडून गेल्याने पारस निराश होता. त्यातच समोरून चालून संधी आल्याने या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा पारसने ठरवले.
अनेक पुरुषांप्रमाणे पारसही समोरच्या सुंदर फोटो ‘अपलोड’ केलेल्या रोमा नावाच्या तरुणीशी गप्पा मारण्यासाठी अधिर झाला होता. असे असताना रोमाने तिचा मोबाईल क्रमांक ‘फेसबुक’वर दिला अन् पारस आनंदाच्या डोहातच बुडाला. आता आपले सूर नक्कीच जुळणार याच भावनेतून तो तिच्यासोबत गप्पा मारू लागला. रोमा आणि पारस दोघे तासन् तास फोनवर गप्पा मारू लागले. पारसला कधी एकदा रोमाला भेटतो असे झाले असतानाच, एके दिवशी स्वतः रोमानेच त्याला भेटण्याची इच्छा दाखवली. भेटण्याचा दिवस आणि वेळ ठरली.
पारस हा ठरलेल्या वेळेला त्या ठिकाणी पोचला आणि समोरून एका स्कुटीवर त्याच्या स्वप्नातील राणी आली. काही वेळ गप्पा मारल्यानंतर मनातून पारस खूप खूश झाला होता. तोच रोमाने मंदिरात जायचे आहे, असे सांगितले. आई आजारी असल्याने तिच्यासाठी देवाकडे मागणे मागण्यासाठी देवाकडे जाऊ, असे म्हणून दोघे तिच्या दुचाकीवरून शहराच्या बाहेर असणार्या एका मंदिराकडे जाण्यास निघाले. शहर सोडून काही अंतरावर गेल्यावर पाठीमागून आलेल्या एका कारने त्यांच्या दुचाकीला अडवले. पारसला मारहाण करून जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि त्याचे अपहरण केले. रोमाच्या स्वप्नात असणार्या पारसला हा काय प्रकार सुरू आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता. दुसर्या दिवशी पारसच्या भावाला एक फोन आला. ‘तुला तुझा भाऊ सुखरूप पाहिजे असल्यास एक कोटी रुपये घेऊन या ठिकाणी यावे लागेल,’ असे सांगण्यात आले. एक कोटी रक्कम पारसच्या भावाला खूप मोठी होती, तरी देखील भावाला सोडविण्यासाठी त्याने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पथक तयार केले. तत्काळ खंडणीखोरांनी ठरवलेल्या ठिकाणी पोलिस पथक रवाना झाले. पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेतली.♍
ठरलेल्या ठिकाणी आणि वेळेला तेथे एक कार आली. त्याच वेळी त्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी असणार्या सर्व रस्त्यांवर दबा धरून पोलिसांपैकी एक स्थानिक पोलिस पुढे सरसावला. पोलिसांचा मागोवा लागल्याने खंडणीखोर पळून जाण्याच्या तयारीत असताना ‘फिल्मी स्टाईल’प्रमाणे स्थानिक पोलिसाने दुचाकीवरून कारवर झेप घेतली. कारचे स्टेअरिंग फिरवल्याने कार चालकाचा ताबा सुटला. कार एका ठिकाणी जाऊन आदळली. त्या वेळी दबा धरून बसलेल्या इतरांनी कारमधील तिघांना ताब्यात घेतले; मात्र त्यांच्यासोबत अपहरण झालेला पारस नव्हता. पोलिसांनी या तिघांना आपला खाक्या दाखवून पारस ठेवलेल्या ठिकाणाचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी छापा टाकून पारसची सुखरूप सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला असता ‘फेसबुक’वर तरुणीच्या नावाचे बनावट अकाऊंट तयार करून, समोरच्या पुरुषाला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा या टोळीचा धंदा असल्याचे स्पष्ट झाले.♍



फेसबुक’वरील मैत्रिण

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম