आश्चर्य!एकाच कुटुंबातील 140 सदस्यांची बोटे जुळलेली!

आश्चर्य!एकाच कुटुंबातील 140 सदस्यांची बोटे जुळलेली!

तिरुवनंतपुरम :http://bit.ly/3j6ak8d
काही कुटुंबांमध्ये अनुवंशिक विकार दिसून येत असतात.
कुणाच्या हातापायांना अधिक बोटे असतात तर कुणामध्ये रंग, रूपाबाबत काही वेगळेपण असते. केरळमध्ये अलपुजा जिल्ह्यातील कवुंकल येथे राहणार्या एका कुटुंबातील 140 सदस्यांमध्येही असा अनुवंशिक विकार आहे. त्यामुळे त्यांच्या हाताची किंवा पायाची काही बोटे जुळलेली आहेत. त्यांच्यावर उपचारही करता येतो; पण या कुटुंबातील कुणालाही शस्त्रक्रिया करून बोटे वेगळी करण्याची इच्छा नाही.♍ ही जुळलेली बोटे म्हणजे आमच्या घराण्याचे वैशिष्ट्य असून ती परमेश्वराची विशेष कृपा आहे, असे या मंडळींचे म्हणणे आहे.♍ कुटुंबातील 65 वर्षीय महिला जगदम्मा यांनी सांगितले की, जुळलेल्या बोटांचा पंजा हा नागाच्या फण्यासारखा दिसतो. आमच्या घराण्यात पूर्वीपासून नागपूजेची परंपरा आहे. आमच्या वडिलार्जित घराजवळ एक वाटिका आहे व तिथे आम्ही नागपूजा करतो. अर्थात हे लोक याला असे श्रद्धेशी निगडीत विषय बनवत असले तरी त्यांच्या घराण्यातील एका अनुवंशिक कारणामुळेच ही विकृती निर्माण होत आहे हे खरे!♍

आश्चर्य!एकाच कुटुंबातील 140 सदस्यांची बोटे जुळलेली!

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম