गाढवीच्या दुधाचे महागडे पनीर
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
गाढवाच्या दुधापासून जगातील सर्वात महागडं असं पनीर तयार केलं जातं. जगातील हे सर्वात महागडं असं पनीर युरोपीय देश सार्बियातील एका फार्म हाऊसमध्ये तयार केलं जातं. या एक किलो पनीरची किंमत तब्बल 78 हजार रुपये इतकी आहे. अत्यंत दुर्मीळ असं पनीर मानलं जातं कारण याचं उत्पादन खूपच कमी होतं आणि तेसुद्धा गाढवाच्या एका विशिष्ट प्रजातीपासून मिळालेल्या दुधापासून.
पांढऱ्या रंगाचं, घट्ट आणि फ्लेवर असलेलं हे पनीर सार्बियातील एका फार्म हाउसमध्ये गाढवीनीच्या दूधापासून तयार केलं जातं. फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही ते चांगलं असल्याचा दावा फार्म हाउसकडून केला जातो. उत्तर सार्बियातील या फार्म हाउसचे नाव जैसाविका असं आहे. या ठिकाणी स्लोबोदान सिमिक हे 200 पेक्षा जास्त गाढवांचे पालन करतात. त्यांच्या दुधापासून वेगवेगळ्या प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली जाते.
सिमिक यांनी दावा केला आहे की, सार्बियाती या गाढवांच्या दुधामध्ये आईच्या दुधासारखेच गुण असतात. एका नवजात बाळाला जन्माच्या पहिल्या दिवसापासून हे दूध दिलं जाऊ शकतं.
फार्म हाउसचे मालक सिमिक हे या दुधाला दैवी वरदान असंही म्हणतात. याच्या सेवनाने अस्थमा किंवा ब्राँकाइटिज सारख्या आजारांपासून सुटका होते.
गाढवाच्या या दुधावर अद्याप संशोधन झालेलं नाही. त्यामुळे याच्या फायदे किंवा गुणधर्मांबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. मात्र युनायटेड नेशन्सने या दुधाबद्दल म्हटलं होतं की हे दुध त्या लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना गाईच्या दुधाची अॅलर्जी आहे. या दुधामध्ये प्रोटीनचं प्रमाणही चांगलं असतं.
सिमिक यांनी असाही दावा केला की, त्यांच्या आधी जगात गाढवाच्या दुधापासून कोणीही पनीर तयार केलेलं नाही. या उत्पादनावर ते त्यांचा अधिकार असल्याचं सांगतात. जेव्हा त्यांना गाढवाच्या दुधापासून पनीर तयार कऱण्याची कल्पना सुचली तेव्हा यामध्ये कॅसीनचं प्रमाण कमी असल्याचं आढळलं. जे पनीर तयार करण्यासाठी महत्वाचं असतं. तसंच गाढव एका दिवसात एक लीटर दुधही देत नाही. तर गाय मात्र 40 लीटरपर्यंत दुध देऊ शकते. यामुळेच या पनीरचे उत्पादन कमी होते. वर्षभरात फक्त 6 ते 15 किलो एवढंच पनीर तयार केलं जातं आणि त्याची विक्री केली जाते. यातून त्याला 4 लाखांपासून 12 लाखांपर्यंत पैसे मिळतात.
Tags
माहिती