कांदयाचाा चहा प्या व निरोगी रहा

कांदयाचा चहा प्या, आणि निरोगी रहा 


पूर्वीच्या काळात लोक सर्दी खोकल्यावर कांद्याचा काढा प्यायचे कारण कांद्याचा चहा शुगर लेव्हल, हाय बीपी, कॅन्सर, इनसोमिया अॅनिमिया, पोटाचे आजार आणि वजन कमी करण्यासाठी खूप मदत करते.
कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात योगदान देते.
कांदयाचा हा चहा प्यायल्यावर थोडं वेगळे वाटेल पण याचे परिणाम पाहिल्यास तुम्हांला ही तो प्यावासा वाटेल.

कांदयाचा चहाचे फायदे

⚡ कांद्याचा चहा टाइप-२ डायबिटीजमध्ये आराम देण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच कांद्याच्या चहाने फ्री रेडिकल्स नष्ट करण्यासाठी मदत करु शकतात.
⚡ वजन नियत्रिंत करते : कांद्याचा चहा दिवसांतून २ वेळा प्यायल्यास पचनक्रिया चांगली होती. त्यामुळे कॅलेरीज बर्न होण्यासाठी खूप मदत होते. चांगला फायदा हवा असल्यास तुम्हाला कांद्याचा चहा  २ आठवड्यात नियमित प्यावा लागेल.
⚡ शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच  सर्दी खोकला आणि थंडीपासून बचाव होतो.

⚡ वाढलेल्या ब्लड प्रेशरला कंट्रोल करते. हे  एंटीऑक्‍सीडेंट  सर्व रंगाच्या कांद्यामध्ये असते.
⚡ कांद्याचा चहा कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखण्यासही फायदेशीर ठरतो. खासकरुन कोलोन कॅन्सरमध्ये हा चहा फायदेशीर मानला जातो.
⚡ कांद्यात आढळणारे फायबर कोलोन स्वच्छ ठेवण्यात मदत करतात. याने आतड्यातील टॉक्सिन बाहेर निघून जातात आणि कर्करोग सेल्स तयार होण्यापासून बचाव करतात.
⚡ झोप न येण्याची समस्या असल्या कांद्याचा चहा फायदेशीर ठरते.

☕ कांदयाचा चहा करणेची पध्दत☕

एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. त्यात कांदे सोलून बारीक केलेले तुकडे टाका. हे पाणी उकळल्यानंतर एक कप झाल्यावर  गॅस बंद करा. पाणी गाळून घेऊन त्यात ४ थेंब लिंबाचा रस टाका.आपल्या चवीनुसार यात मध टाका.
कांद्याच्या चहाचं सेवन केल्याने हायपरटेंशनपासून बचाव होण्यास मदत मिळते. त्यासोबतच रक्ताच्या गाठी होणे रोखण्यासही याने मदत मिळेल.
तर आजच कांदयाचा चहा पिण्यास सुरूवात करा.

कांदयाचा चहा प्या, आणि निरोगी रहा
 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম