भारतात असुन देखिल या गावात भारतीय कायदे चालत नाहीत

 हे गाव भारतात असुनदेखिल येथे भारताचे कायदे चालत नाहीत.
बादशहा अकबराची येथे होते पुजा


हिमालयाच्‍या दुर्गम भागातील पायथ्‍याला वसलेल्‍या मलाणा या छोट्या गावाची लिटिल ग्रीस म्‍हणून जगभर ओळख आहे. इथले नैसर्गिक सौंदर्य पाहण्‍यासाठी जगभरातील पर्यटक गावाच्‍या दिशेने येत असतात. याशिवाय उच्च प्रतीचा "गांजा"याच गावात मिळतो. म्हणुन या  गावाला 'मलणा क्रीम' या नावाने ओळखले जाते.
भारतामध्‍ये चरस आणि गांजाची शेती करण्‍यावर बंदी आहे. मात्र या दुर्गम भागातील भौगोलीक परिस्‍थीताचा फायदा घेऊन अंतरराष्‍ट्रीय माफिया चरस आणि आफूची शेती करतात.
या गावात भारताचं संविधान लागू होत नाही. भारतातील कायदे आणि नियम यांच्याशी या गावाला कसलंही देणं-घेणं नाही. मलाना गांव भारतातील सर्वात प्राचीन लोकशाही व्यवस्था असल्याचा या गावातील लोकांचा दावा आहे.या गावाला स्वतची संसद आहे.आपले भारतीय संविधान ते मानत नाहीत. त्यांचे स्वत:चे वेगळे कायदे आहेत. त्यांच्या गावचे कायदे त्यांनी वेगळे बनवले आहेत. ते लोक त्यांच्या गावच्याच कायद्याप्रमाणेच कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेतात.गावातील लोक जमलू नावाच्या देवाची पूजा करतात. ह्या जमलू देवाच्या मंदिराबाहेर अनेक लाकडी भिंती आहे ज्यावर कोरीवकाम काम केलेले आहे.. हिंदू पुराणांमध्ये जमलू देवाला जमदग्नी ऋषि नावाने ओळखले जाते.
या गावात दोन मंदिर असून एक जमलू देवता व दुसरे त्यांची पत्नी रेणूका देवीचे आहे. या मंदिराला बाहेरील व्यक्तीने स्पर्श केल्यास त्याला 3500 रुपये दंड भरावा लागतो.येथील लोक स्वतःला यूनानचा प्रसिद्ध राजा सिंकदरचे वंशज सांगतात. सांगण्यात येते की, जेव्हा सिंकदरने भारतावर हल्ला केला, त्यावेळी त्याचे काही सैनिक येथे थांबले होते. येथील लोक स्वतःला त्याच सैनिकांचे वंशज सांगतात. मात्र अद्याप हे सिद्ध झालेले नाही. सिंकदरच्या काळातील अनेक गोष्टी या गावात सापडल्या आहेत. त्या काळातील एक तलवार देखील मंदिरात ठेवली असल्याचे सांगितले जाते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,मलाणा गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातील असे एकमात्र गाव आहे जिथे मुघल बादशाह अकबराची पूजा केली जाते. ह्यामागे एक कथा सांगितली जाते कि –
एकदा मुघल बादशहा अकबराला स्वतःच्या सत्तेचा आणि शक्तीचा गर्व झाला होता. त्याचा गर्व घालवण्यासाठी जमलू देवाने पूर्ण दिल्ली शहराला बर्फाने गोठवून टाकले होते. त्यानंतर अकबराला स्वतःच्या वृथा अभिमानाची जाणीव झाली आणि त्याने स्वतः मलाणा गावात येऊन जमलू देवाची माफी मागितली होती.म्हणुन अकबराची पूजा मात्र अतिशय गुप्त रित्या केली जाते. आणि ह्या पूजेपासून बाहेरच्या लोकांना लांब ठेवले जाते. हि पूजा बघण्याची बाहेरच्या व्यक्तीला परवानगी नाही.या शिवाय  बाहेरच्या लोकांना हे लोक आपल्या दुकानांमध्ये पायही ठेवू देत नाहीत. आणि बाहेरच्या लोकांना दुकानातील वस्तूंना हात लावायची सुद्धा परवानगी नाही.
जर तुम्हाला काही खरेदी करायचे असेल तर तुम्ही दुकानाबाहेरूनच त्यांना सांगायचे आणि पैसे सुद्धा दुकानाबाहेर ठेवायचे. तुम्हाला तुमच्या विकत घेतलेल्या वस्तू ते बाहेर आणून देतात. तुम्ही या गावात प्रवेश केला की गावातील लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या असल्याचं तुमच्या लक्षात येतं. हे लोक तुमच्यावर लक्ष ठेऊन असतात कारण तुम्ही जर कुठल्याही गोष्टीला स्पर्श केला तर तुम्हाला येथील कायद्यानुसार १००० ते २५०० रुपये दंड भरावा लागू शकतो. तशा पद्धतीचे बोर्ड जागोजागी गावात बघायला मिळतात.
बाहेरून आलेल्या माणसाला राहण्यासाठी ह्या गावात काहीही व्यवस्था नाही. त्यांना त्या गावात राहण्याची परवानगी सुद्धा नाही.पर्यटकांना गावाच्या वेशीबाहेर तंबू टाकून राहावे लागते.गावात मिळणारी ‘मलाना क्रीम’ जगभरात प्रसिद्ध आहे. ही मलाना क्रीम म्हणजे एक प्रकारची चरस असते. या चरसमध्ये उच्च गुणवत्तेचं नैसर्गिक तेल असल्याने ती सर्वोत्तम समजली जाते.येथील हशीश (चरस) खूप प्रसिद्ध आहे. गावातील लोक याची विक्री करतात. येथील लहान मुले देखील याचा व्यवसाय करतात. येथील लोक कनाशी भाषा बोलतात. तेथील लोक या भाषेला पवित्र मानतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही भाषा येथील लोकांव्यतिरिक्त इतर कोणालाच नाही. या भाषेला बाहेरील लोकांना शिकवले जात नाही.
छायाचित्रे गुगलवरून
लेखन : अनिल पाटील, पेठवडगाव.
9890875498
__________________________


भारतात असुनदेखिल येथे भारताचे कायदे चालत नाहीत.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম