पट्टणकोडोली :भगव्याचे राज्य येईल.
दि १३ आॉक्टोंबर, २०२५
पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे ‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं...’च्या जयघोषात व ढोल, कैताळाच्या तालावर भंडारा, खारीक व खोबऱ्याची प्रचंड उधळण करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध प्रदेश व गोवा राज्यांत प्रसिद्ध असलेल्या पट्टणकोडोलीच्या यात्रेस रविवारी भाकणुकीने उत्साहात सुरुवात झाली.
फरांडेबाबांची भाकणूक
पर्जन्य : सात दिवसांत पाऊस पडेल.
बळीराजा : रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा पूर्ण देशात होईल.
धारण : दोन, सव्वा दोन, अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल.
महागाई : मिरची, रसभांडे कडक होईल.
भू माता : भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल.
आशीर्वाद : नवल्या मी होईन आणि हातात काठी घेऊन स्वत: मेंढ्या राखीन.
राजकारण : राजकारणात गोंधळ होऊन उलथापालथ होईल, धर्माचे, भगव्याचे राज्य येईल.
रोगराई : देवाची सेवा करणाऱ्यांची रोगराई दूर होईल.
Tags
भाकणूक