दक्षिण कोरियातील शेकडो लोक दर वर्षी अयोध्येला का भेट देतात?
फेसबुक लिंक http://bit.ly/2N1ciuh
अयोध्या हे शहर भारतीयांसाठी अतिशय महत्वाचे व पवित्र शहर आहे. पुराणकाळापासून ह्या शहराला फार महत्व आहे. कारण शरयू नदीच्या तीरावर प्रत्यक्ष मनुने वसवलेल्या ह्या अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम ह्यांचा जन्म झाला होता. म्हणूनच दर वर्षी अनेक भारतीय ह्या पवित्र ठिकाणी भेट देतात.पण तुम्हाला जर सांगितले की दक्षिण कोरियातील शेकडो लोक दर वर्षी अयोध्येत येतात तर तुमचा विश्वास बसेल?दक्षिण कोरियाचा आणि अयोध्येचा खूप जवळचा संबंध आहे.
ते दर वर्षी अयोध्येला येउन त्यांच्या देशात प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या राणीHur Hwang-okला श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात. कारण ह्या शहरात पुराण काळातील एका राजकन्येचे स्मारक आहे जी पुढे जाऊन दक्षिण कोरिया ह्या देशाची पालनकर्ती राणी झाली.,
पौराणिक कथा
एका पौराणिक कथेच्या मते, राणी Hur Hwang-ok जी अयोध्येत राजकन्या सुरीरत्ना ह्या नावाने ओळखली जात असे,ती पूर्वी अयोध्येच्या राजाची कन्या म्हणजेच अयोध्येची राजकन्या होती. त्यानंतर तिने दक्षिण कोरिया पर्यंत प्रवास केला आणिKarakवंशाचा राजाKim Suroशी इसवी सन ४८साली विवाह केला. असे म्हणतात की ही राजकन्या बोटीने प्रवास करून दक्षिण कोरियाला गेली आणिGeumgwan Gaya चा राजा सुरोचीपहिली राणी झाली. गया राज्याची ती पहिली राणी होती आणि जेव्हा तिने राजाशी विवाह केला तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती.ह्या ऐतिहासिक संबंधांचे मूळ इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आहे. कोरियाच्या प्राचीन ऐतिहासिक दस्तऐवजSam Kuk Yusa,मध्ये असे लिहिलेले आहे कीQueen Huh हिचा जन्म अयोध्येत झाला होता.म्हणूनच तिचे स्मारक अयोध्येत आहे आणि ह्याच कारणानेKarakवंशाचे तब्बल ६० लाख लोक अयोध्येला त्यांचे आजोळ मानतात. ह्या स्मारकाचे उद्घाटन २००१ साली झाले. ह्या उद्घाटनाला शंभर पेक्षाही जास्त इतिहासकार व सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. ह्या सगळ्यांसोबत भारतातील उत्तर कोरियाचे प्रतिनिधी सुद्धा ह्या समारंभाला उपस्थित होते.Kimhae Kim clan, Hur clan आणि Incheon Yi clanचे आजचे ७ मिलियन वंशज त्यांचे मूळ ह्या विवाहाद्वारे जोडल्या गेलेल्या दोन देशांशी जोडतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ह्या स्मारकाला भेट दिली तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव ह्यांनी घोषणा केली की अयोध्येत दक्षिण कोरियाच्या राणीचे आणखी मोठे स्मारक बांधण्यात येईल व ते दक्षिण कोरियातील पारंपारिक पद्धतीने बांधले जाईल. ह्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दिलेली आहे. ह्यानेदोन्ही देशांत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होण्यास मदत मिळेल.
तर अश्या प्रकारे जोडली गेली आहे भारतीय आणि दक्षिण कोरियन संस्कृती!
दक्षिण कोरियाच्या प्रथम राणीचा अयोध्येशी संबंध ही बाब मध्यंतरीच्या २००० वर्षात विस्मरणात गेली होती. पण २००१ साली हा संबंध परत जोडला गेला, कारण अयोध्येचे महापौर आणिKim-Haeशहराचे महापौर ह्यांनीSister city bondवर २००१ सालच्या मार्च महिन्यात स्वाक्षरी केली.दक्षिण कोरिया मध्ये राणीची समाधीKimhaeह्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. ह्या ठिकाणी त्या समाधीसमोर एक भव्य दगडी मंदिर सुद्धा बांधले आहे. असे म्हणतात कि ह्या मंदिराची निर्मिती ज्या दगडांपासून केली आहे ते दगड अयोध्येतून आणले आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, ह्या विवाहाच्या मागची कथा अतिशय प्राचीन आहे. त्या कथेत राणी दक्षिण कोरियात का आणि कशी गेली ह्याचे वर्णन केले आहे तसेच तिची तिथल्या राजाशी भेट व त्यांच्या विवाहाची कहाणी सांगितलेली आहे. असे म्हणतात की,राजकन्या सुरीरत्ना हिचे वडील म्हणजेच अयोध्येचे राजे ह्यांच्या स्वप्नात स्वर्गातील देव(Sange Je)आले आणि त्या देवाने त्यांना दृष्टांत दिला की राजकन्येला कोरियाला पाठवण्यात यावे, कारण तिथल्या राजाने अजून त्याची पत्नी व राज्याची भावी राणी हिची निवड केली नाही. मग राणीला तिच्या वडिलांनी बोटीतून कोरियाला पाठवले व राजकन्या तिथे पोचल्यानंतर तिचा व दक्षिण कोरियातील राजाचा विवाह झाला. राजाने नंतर तिचे नाव Hur Hwang-ok असे ठेवले. त्यानंतर राणीने प्रजेचे पुत्रवत पालन केले आणि राणीचे वयाच्या १५७ व्या वर्षी निधन झाले.अयोध्येमध्ये Hur Hwang-ok राणीच्या स्मरणार्थ कोरियन स्टाईलने स्मारक बांधलेले आहे. ह्यात एक तीन मीटर लांब इतका मोठा दगड वापरण्यात आला आहे. त्या दगडाचे वजन जवळजवळ ७५०० किलो आहे. आणि तो दगड खास दक्षिण कोरियातून मागवला आहे. हे स्मारक Kim-Hae-Kim वंशाच्या लोकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे. म्हणून दर वर्षी शेकडो लोक अयोध्येत ह्या स्मारकाला भेट देण्यासाठी येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ह्या स्मारकाला भेट दिली तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव ह्यांनी घोषणा केली की अयोध्येत दक्षिण कोरियाच्या राणीचे आणखी मोठे स्मारक बांधण्यात येईल व ते दक्षिण कोरियातील पारंपारिक पद्धतीने बांधले जाईल. ह्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दिलेली आहे. ह्यानेदोन्ही देशांत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होण्यास मदत मिळेल.
तर अश्या प्रकारे जोडली गेली आहे भारतीय आणि दक्षिण कोरियन संस्कृती!
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰
______________________________
Tags
जनरल नॉलेज