आश्चर्य !५७ वर्षांपूर्वीच ठरली होती राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख !
नेपाळ हे भगवान प्रभु श्रीराम यांचे सासर आहे. याच सासरमधून म्हणजेच नेपाळमधून जारी केलेले ५७ वर्षे जुने टपाल तिकीट आता व्हायरल होत आहे. जो एका विलक्षण योगायोग मानला जात आहे.
भगवान श्री राम 22 जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील त्यांच्या नवीन मंदिरात विराजमान होत आहेत.सर्वत्र राम मंदिराची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एक टपाल तिकीट व्हायरल होत आहे. क्रित्येक वर्षापुर्वीचे हे तिकिट असुन त्यावेळी २०२४ मध्ये राममंदिर होणार हे कोणत्या आधारावर नमूद केले होते हे समजत नाही.
टपाल तिकीट श्रीरामाला समर्पित
१९६७ मध्ये जारी केलेले हे टपाल तिकीट भगवान राम आणि सीतेला समर्पित करण्यात आले होते. ज्यामध्ये राम मंदिराच्या अभिषेकाचे वर्ष लिहिले आहे.हे विशेष. या १५ पैशांच्या टपाल तिकिटावर 'राम नवमी २०२४' असे लिहिले आहे. या टपाल तिकिटात भगवान श्री राम धनुष्यबाणांसह दिसत आहेत. माता सीता समोर आहे. हे टपाल तिकीट १८ एप्रिल १९६७ रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर नेपाळ ल सरकारकडून जारी करण्यात आले होते. हे दुर्मिळ टपाल तिकीट अशोक कुमार या लखनौच्या व्यक्तीकडे आहे. ज्याने ते आपल्या “द लिटल म्युझियम” मध्ये जतन केले आहे. हे टपाल तिकीट दुर्मिळ म्हटले जात आहे.अशोककुमार यांनी हे टपाल तिकीट कोणाकडून तरी विकत घेतले आहे.
या व्हायरल नेपाळी पोस्टल स्टॅम्पवर लिहिलेले 'राम नवमी २०२४' इंग्रजी कॅलेंडरमध्ये नसुन ते विक्रम संवतमध्ये लिहिलेले आहे. विक्रम संवत हे इंग्रजी कॅलेंडरपेक्षा ५७ वर्षे पुढे असते.
इतक्या वर्षांपूर्वी जारी केलेल्या या तिकिटावर श्रीराम मंदिर अभिषेकची तारीख आधीच लिहिली गेली होती हे आश्चर्य आहे.हा योगायोग आहे.